एक्स्प्लोर

Cyber Crime : सायबर फसवणुकीला बळी पडलेल्या कुटुंबाने केली आत्माहत्या

 कर्जाच्या आणि सायबर क्राईमच्या जाळ्यात अडकून एक संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त झाले. कर्जामुळे 8 वर्षांचा मुलगा, तीन वर्षांची मुलगी आणि पती-पत्नी या तिघांना जीव गमवावा लागला.

Bhopal Cyber Crime : दिवसेंदिवस वाढता संगणक आणि इंटरनेटचा (Internet) वापर आणि त्या अनुषंगाने सायबर गुन्ह्यांमध्ये होणारी वाढ ही अतिशय चिंताजनक बाब आहे. या गुन्ह्यांना तरुणांबरोबरच प्रौढ व्यक्तीदेखील कळत-नकळत बळी पडत आहेत. अशीच एक घटना समोर आली आहे. कर्ज आणि सायबर फसवणुकीला बळी पडलेल्या कुटुंबाने आत्माहत्या केली आहे. हे प्रकरण आहे मध्य प्रदेशातील भोपाळमधील. आत्माहत्येपूर्वी त्या व्यक्तीने एक सुसाई़़ड नोटही लिहून ठेवली होती. ज्यात त्याने लिहिले होते की, आपण कशा पद्धतीने फसवणूकीच्या जाळ्यात अडकलो.

कर्जाच्या जाळ्यात अडकून एक संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त झाले. कर्जामुळे 8 वर्षांचा मुलगा, तीन वर्षांची मुलगी आणि पती-पत्नी यांना जीव गमवावा लागला. मात्र हे प्रकरण केवळ कर्जाचे नाही तर  Cyber Crime  आणि कर्जाच्या ओझ्याखाली दबलेल्या या कुटुंबासाठी कोणताही मार्ग शिल्लक नसल्यामुळे त्यांनी हे पाऊल उचलले. 

कर्ज आणि Cyber Crime च्या जाळ्यात अडकलेल्या व्यक्तीने आत्महत्येचा मार्ग निवडण्याची ही पहिलीच घटना नाही. कोरोनाच्या काळात अशी अनेक प्रकरणे समोर आली आहेत. ज्यामुळे गुगल आणि अॅपलनेही त्यांच्या अॅप स्टोअरमधून अनेक अॅप काढून टाकले आहेत. इंटरनेटच्या जगात लोन अॅप्स आणि फसवणुकीच्या जाळ्याने अनेक कुटुंबांचा आनंद हिरावून घेतला आहे.

भोपाळ प्रकरणात फसवण्याची सुरूवात वर्क फ्रॉम होम (Work From Home) जॉब ऑफरने झाली होती. भूपेंद्र विश्वकर्मा यांनी त्यांच्या सुसाइड नोटमध्ये स्पष्टपणे सांगितले की, त्यांच्या व्हॉट्सअॅपवर एक मेसेज आला होता, ज्यामध्ये ऑनलाइन काम करण्याची ऑफर होती. या प्रकारच्या कामात फसवणूक करणारे अनेकदा लोकांना मनी फॉर लाईक सारख्या नोकऱ्या देतात. YouTube व्हिडिओ लाइक करण्यासाठी तुम्हाला पैसे मिळतील. किंवा तुम्हाला इन्स्टाग्रामवर रील शेअर करण्यासाठी पैसे मिळतील. या प्रकारच्या कामात वापरकर्त्यांना सुरूवातीच्या दिवसात काही पैसे मिळतात. यानंतर घोटाळेबाज लोकांना पैशाचे अमिष दाखवतात आणि फसवतात. जेव्हा एखादा वापरकर्ता अधिक पैशाच्या लालसेमध्ये पडतो, तेव्हा घोटाळेबाज त्याला अनेक प्रकारच्या प्रोजेक्ट्समध्ये जोडण्यास सुरवात करतात. त्यानंतर त्यांना विविध मार्गांनी पैसे गुंतवण्यास सांगितले जाते. जेव्हा एखाद्या व्यक्तीला त्याचे गुंतवलेले पैसे काढायचे असतात, तेव्हा त्याला अधिक पैसे गुंतवण्यास सांगितले जाते. असाच काहीसा प्रकार या प्रकरणातही घडला आहे. 

आपल्या सुसाईड नोटमध्ये मृताने स्पष्ट लिहिले आहे की, आपल्याला कंपनीने कर्ज देऊ केले होते. अशा वेळी अनेक वेळा फसवणूक करणारेच कर्ज देतात.  सोशल मीडियावर अशी अनेक इन्स्टंट लोन अॅप्सही तुमची जाहिरात करताना दिसतील. हे अॅप्स तुम्हाला बाजारापेक्षा कितीतरी पट जास्त व्याजदराने कर्ज देतात.  पण त्यांचा खेळ इथेच संपत नाही. उलट त्यांचा खेळ इथूनच सुरू होतो. जेव्हा एखादी व्यक्ती या प्लॅटफॉर्मवरून कर्ज घेण्यासाठी हे अॅप्स डाउनलोड करते तेव्हा ते वापरकर्त्यांकडून सर्व प्रकारच्या परवानग्या घेतात. कर्ज घेणारी व्यक्ती या मुद्द्यांकडे लक्ष देत नाही. जेव्हा एखादी व्यक्ती कर्जाची परतफेड करू शकत नाही, तेव्हा ते त्या व्यक्तीला कॉल करून किंवा व्हॉट्सअॅप द्वारे धमक्या द्यायला सुरूवात करतात.

आपण काय करावे? 

आपण अशा कोणत्याही जाळ्यात अडकू नये. इंस्टंट लोन अॅप्स किंवा वन टच लोन अॅप्सवर दाखवलेल्या ऑफर आकर्षक वाटत असल्या तरी, तुम्ही कोणत्याही अनोळखी कर्ज अॅप्सवर विश्वास ठेवू नये. कोणत्याही प्लॅटफॉर्मवरून कर्ज घेण्यापूर्वी, त्या बदल्यात ते तुमच्याकडून काय मागत आहेत ते पाहा. सर्वप्रथम तुम्ही पोलिसांशी संपर्क साधावा. कोणत्याही प्रकारच्या धमकीला घाबरू नये. संपूर्ण प्रकरणाची माहिती देऊन पोलिसांत तक्रार दाखल करा.  

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sharad Pawar : आता कुणी दम दिला तर मला कळवा, तुमच्यासह त्यांच्या घरी येतो, मग चेअरमन असो की कोणी असो, शरद पवारांचा थेट इशारा
मला या रस्त्यानं जायचं नाही, माणसं आपली आहेत, त्यांना कुणीतरी दम दिला असेल, त्यांना एक सांगणं.. : शरद पवार
Kolhapur : सतेज पाटलांच्या समोर शाहू महाराजांची घोषणा, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला
सतेज पाटलांच्या समोर शाहू महाराजांची घोषणा, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला
Eknath Shinde: लाडक्या बहि‍णींना महिन्याला 2100, वीज बिलात 30 टक्के सूट; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
लाडक्या बहि‍णींना महिन्याला 2100, वीज बिलात 30 टक्के सूट; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
महायुतीच्या सुनिल शेळकेंचं टेन्शन वाढलं, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा; मावळ पॅटर्न सुस्साट
महायुतीच्या सुनिल शेळकेंचं टेन्शन वाढलं, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा; मावळ पॅटर्न सुस्साट
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Vidhan Sabha Election : राज्यात 157 बंडखोर रिंगणात, पक्षांकडून बंडखोरांवर धडक कारवाईKolhapur Vidhan Sabha Election : कोल्हापुरातली नामुष्की काँग्रेस कशी पुसून टाकणार? Special ReportSharad Pawar Retirement : पवारांचे पुन्हा निवृत्तीचे संकेत, बारामतीकरांसमोर सहानुभूती कार्डचा वापर?Vidhan sabha Superfast :  महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज : 5 नोव्हेंबर 2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sharad Pawar : आता कुणी दम दिला तर मला कळवा, तुमच्यासह त्यांच्या घरी येतो, मग चेअरमन असो की कोणी असो, शरद पवारांचा थेट इशारा
मला या रस्त्यानं जायचं नाही, माणसं आपली आहेत, त्यांना कुणीतरी दम दिला असेल, त्यांना एक सांगणं.. : शरद पवार
Kolhapur : सतेज पाटलांच्या समोर शाहू महाराजांची घोषणा, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला
सतेज पाटलांच्या समोर शाहू महाराजांची घोषणा, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला
Eknath Shinde: लाडक्या बहि‍णींना महिन्याला 2100, वीज बिलात 30 टक्के सूट; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
लाडक्या बहि‍णींना महिन्याला 2100, वीज बिलात 30 टक्के सूट; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
महायुतीच्या सुनिल शेळकेंचं टेन्शन वाढलं, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा; मावळ पॅटर्न सुस्साट
महायुतीच्या सुनिल शेळकेंचं टेन्शन वाढलं, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा; मावळ पॅटर्न सुस्साट
निवडणुकांच्या रणधुमाळीत पोलिसांनी नाक्यावर पकडली कार; 2.30 कोटीचं घबाड, भरारी पथकाकडून जप्त
निवडणुकांच्या रणधुमाळीत पोलिसांनी नाक्यावर पकडली कार; 2.30 कोटीचं घबाड, भरारी पथकाकडून जप्त
Eknath Shinde: लाडक्या बहि‍णींसाठी 100 वेळा तुरुंगात जायला तयार; मुख्यमंत्री शिंदेंचा विरोधकांवर नेत्यांवर पलटवार
लाडक्या बहि‍णींसाठी 100 वेळा तुरुंगात जायला तयार; मुख्यमंत्री शिंदेंचा विरोधकांवर नेत्यांवर पलटवार
कारमध्ये गॅस भरताना भीषण स्फोट, ओमिनी जळून खाक; 4 जण जखमी, रुग्णालयात दाखल
कारमध्ये गॅस भरताना भीषण स्फोट, ओमिनी जळून खाक; 4 जण जखमी, रुग्णालयात दाखल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 5 नोव्हेंबर 2024 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 5 नोव्हेंबर 2024 | मंगळवार
Embed widget