एक्स्प्लोर

Horoscope Today 30 September 2024 : आज आठवड्यातील पहिला दिवस सर्व 12 राशींसाठी कसा असणार? वाचा आजचे राशीभविष्य

Horoscope Today 30 September 2024 : सर्व राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस व्यवसाय, आरोग्य, नातेसंबंध आणि प्रेमासाठी किती खास असणार आहे? आजचे राशीभविष्य (Horoscope Today) जाणून घ्या...

Horoscope Today 30 September 2024 : आजचा दिवस काही लोकांसाठी चांगले, तर काहींसाठी वाईट परिणाम आणू शकतो. आज तुमचे ग्रह तुमच्यासाठी अनुकूल आहेत की नाही? आज तुम्हाला कोणत्या आव्हानांना तोंड द्यावे लागेल किंवा तुम्हाला कोणत्या प्रकारच्या संधी मिळू शकतात? सर्व 12 राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस व्यवसाय, आरोग्य, नातेसंबंध आणि प्रेमासाठी किती खास असणार आहे? आजचे राशीभविष्य (Horoscope Today) जाणून घ्या.

मेष रास (Aries Horoscope Today)

नोकरी (Job) -  नोकरीच्या बाबतीत सांगायचं झाल्यास, कामाच्या ठिकाणी प्रसन्न वातावरण असेल. सहकाऱ्यांचा तुम्हाला चांगला पाठिंबा मिळेल.  

व्यापार (Business) - व्यापारी वर्गातील लोकांना कामाच्या ठिकाणी नवीन ऑर्डर्स मिळू शकतात. तुमचा व्यवसाय चांगला चालण्यास मदत होईल.  

तरूण (Youth) - तरुण वर्गातील लोकांबद्दल बोलायचं झाल्यास, जे तरुण अनेक दिवसांपासून नोकरीच्या शोधात आहेत त्यांना लवकरच नवीन नोकरीची संधी मिळू शकते.  

आरोग्य (Health) - तुमच्या आरोग्याच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर तुम्ही आरोग्याच्या दृष्टीने फार सतर्क असणं गरजेचं आहे. तसेच, वेळोवेळी औषधं गोळ्या घ्या. 

वृषभ रास (Taurus Horoscope Today)

नोकरी (Job) - आजच्या दिवशी असं कोणतंच काम करू नका ज्यामुळे तुमच्या नोकरीमध्ये अडचण निर्माण होऊ शकते. 

व्यापार (Business) - आज तुमची रखडलेली जी काही कामं असतील तर ती वेळीच पूर्ण करण्याचा प्रयत्न करा.

तरूण (Youth) - आज तुमचे भरपूर पैसे खर्च होऊ शकतात. तुमच्या पार्टनरवर तुम्ही जास्त पैसे खर्च करू शकता. यासाठी खर्चावर नियंत्रण ठेवा. 

आरोग्य (Health) - आज तुम्हाला एसिडीटीचा त्रास होऊ शकतो. यासाठी बाहेरचे तेलकट, तिखट पदार्थ खाऊ नका. 

मिथुन रास (Gemini Horoscope Today)

नोकरी (Job) - आज तुम्हाला कामाच्या ठिकाणी फार कंटाळवाणं वातावरण वाटेल. सतत झोप येत राहील.  

व्यापार (Business) - आज व्यापाराच्या ठिकाणी कोणाबरोबरच उधारीचा व्यवहार करू नका. तुमचे पैसे काढून घेण्यासाठी तुम्हाला खूप मेहनत करावी लागेल.

तरूण (Youth) - आज तुमचा भूतकाळ कदाचित तुमच्या समोर येऊ शकतो. यामुळे तुम्ही विचलित होऊ शकता. मात्र, तुम्ही ठाम राहणं गरजेचं आहे.  

आरोग्य (Health) - आरोग्याच्या बाबतीत बोलायचं झाल्यास तुम्हाला ताप, सर्दी आणि खोकला यांसारख्या छोट्या तक्रारी जाणवू शकतात.

कर्क रास (Cancer Today Horoscope)

नोकरी (Job) -  नोकरदार वर्गातली लोकांबद्दल बोलायचं झाल्यास, आज कामाच्या ठिकाणी काम करण्याचा तुमचा मूड नसेल.  सोमवार असल्या कारणाने तुम्हाला प्रसन्न वाटणार नाही.  

व्यवसाय (Business) -  व्यापारी वर्गातील लोक आज आपल्या मेहनतीने दुसरा व्यवसाय उभारण्याचा प्रयत्न करतील. ज्यामध्ये तुम्हाला नक्कीच यश मिळू शकतं.  

कुटुंब (Family) - आज तुमच्या कुटुंबातील वातावरण फार प्रसन्न असणार आहे. घरातील ज्येष्ठ व्यक्तींची काळजी घ्या. 

आरोग्य (Health) - तुमचे आरोग्य एकदम उत्तम असेल. फक्त कोणाच्याही बोलण्यावर विश्वास ठेवू नका.  

सिंह रास (Leo Today Horoscope)

नोकरी (Job) -  सिंह राशीच्या लोकांनी कामाच्या ठिकाणी अतिरेकीपणा करु नये. अन्यथा तुम्ही वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या नजरेत येऊ शकता.  

व्यवसाय (Business) -  आज तुम्हाला कामाच्या निमित्ताने परदेशात जाण्याची संधी मिळू शकते. या संधीचा तुम्ही लाभ घ्या. 

विद्यार्थी (Student) -  विद्यार्थी वर्गातील लोकांबद्दल बोलायचं झाल्यास आज तुमचं अभ्यासात चांगलं मन रमणार आहे. स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करायला सुरुवात करा. 

आरोग्य (Health) - आज कुटुंबातील ज्येष्ठ व्यक्तीच्या आरोग्याबाबत तुम्हाला सतत चिंता जाणवू शकते. अशा वेळी गोंधळून न जाता वेळीच डॉक्टरांचा सल्ला घ्या.

कन्या रास (Virgo Today Horoscope)

नोकरी (Job) - नोकरदार वर्गातील लोकांच्या बाबतीत बोलायचं झाल्यास आज कामाच्या ठिकाणी नवीन लोकांशी तुमच्या गाठीभेटी होतील. 

व्यवसाय (Business) - तुमचा एकंदरीत करिअरचा आलेख पाहता प्रगतीची हवा तुमच्या डोक्यात जाण्याची शक्यता आहे. तर, असे अजिबात होऊ देऊ नका. 

कुटुंब (Family) - तुमच्या कुटुंबात आजचं वातावरण फार धार्मिक असणार आहे. शेजारच्या मंदिराला जाऊन भेट द्या. . 

आरोग्य (Health) - तुमच्या आरोग्याच्या बाबतीत बोलायचं झाल्यास आरोग्य एकदम चांगलं असणार आहे. फक्त जंक फूड खाणं टाळा.   

तूळ (Libra Today Horoscope) 

नोकरी (Job) - आजचा दिवस चांगला जाईल. नोकरी करणाऱ्या लोकांबद्दल बोलायचं झालं तर, तूळ राशीच्या लोकांना आज नोकरीत मोठं पद मिळाल्यास ते खूश दिसतील.

व्यवसाय (Business) - व्यवसाय करणाऱ्या लोकांबद्दल बोलायचं झालं तर, व्यवसायात नफा मिळेल, तुम्ही काही गुंतवणुकीची योजना करू शकता.

विद्यार्थी (Student) - कुटुंबात काही वाद निर्माण होऊ शकतो, ज्यामध्ये तुम्ही शांत राहाल. तुमच्या पालकांनी तुम्हाला काही सल्ला दिल्यास तुम्ही त्यावर कृती केली पाहिजे.

आरोग्य (Health) - तुमच्या आरोग्याविषयी बोलायचं झालं तर, आज कसरतीची कामं करू नका, धडपडू शकता. तुम्हाला कोणतीही मोठी जोखीम घेणं टाळावं लागेल.

वृश्चिक ( Scorpio Today Horoscope) 

नोकरी (Job) - आजचा दिवस खूप चांगला जाईल. नोकरदार लोकांबद्दल बोलायचं तर, वृश्चिक राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चिंताजनक असणार आहे. तुमचा कामातील हलगर्जीपणा तुम्हाला अडचणीत आणू शकतो.

व्यवसाय (Business) - व्यवसायात थोडी मंदी पाहायला मिळेल, थोड्या दिवसांनी पुन्हा उभारी दिसेल.

विद्यार्थी (Student) - भावंडांबाबत तक्रार करू नका, त्यांच्या वागण्याकडे दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न करा, तरच नात्यात गोडवा राहील, अन्यथा दुरावा निर्माण होण्याची शक्यता आहे.

आरोग्य (Health) - तुमच्या काही शारीरिक समस्या उद्भवण्याची शक्यता आहे. वाहन जपून चालवा, अन्यथा जखमी होण्याचा धोका आहे.

धनु (Sagittarius Today Horoscope)

नोकरी (Job) - आजचा दिवस चांगला जाईल. नोकरी करणाऱ्या लोकांबद्दल बोलताना, धनु राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस सामान्य असणार आहे. कामाच्या ठिकाणी तुमचे शत्रू तुमच्या कामात अडथळे निर्माण करण्याचा प्रयत्न करतील आणि तुमच्यावर काही अनावश्यक कामाचा ताण येऊ शकतो. कार्यालयात तुमच्या अधिकाऱ्यांशी तुमचे वाद होण्याची शक्यता आहे.

व्यवसाय (Business) - व्यवसाय करणाऱ्या लोकांबद्दल बोलायचं झालं तर, व्यवसायात जोखीम घेणं टाळा. सर्व डील नीट हाताळा.

विद्यार्थी (Student) - मित्रांकडून पूर्ण सहकार्य मिळेल, दिवस मजेत घालवाल.

आरोग्य (Health) - तुमच्या आरोग्याविषयी बोलायचं झालं तर, आरोग्याची काळजी घ्या, संसर्गजन्य आजार बळावण्याची भीती आहे.

मकर (Capricorn Today Horoscope)

नोकरी (Job) - आजचा दिवस चांगला जाईल. नोकरदार लोकांबद्दल बोलायचं तर, मकर राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस खास असेल. नोकरीत जर तुम्हाला काही तणावाचा सामना करावा लागला तर तो वरिष्ठ सदस्यांच्या मदतीने दूर होईल.

व्यवसाय (Business) - व्यवसाय करणाऱ्या लोकांबद्दल बोलायचं तर, व्यवसायात तुम्हाला काही कामानिमित्त प्रवासाला जावं लागेल आणि तुमची आर्थिक स्थिती पूर्वीपेक्षा चांगली होईल.

विद्यार्थी (Student) - विद्यार्थ्यांबद्दल सांगायचं तर, तुमचे हरवलेले पैसे मिळाल्याने तुम्हाला आनंद होईल.

आरोग्य (Health) - तुमच्या तब्येतीबद्दल बोलताना, आज आरोग्याबाबत जास्त काळजी घेण्याची गरज नाही, आरोग्य ठणठणीत राहील.

कुंभ (Aquarius Today Horoscope)

नोकरी (Job) - कुंभ राशीच्या लोकांचा आजचा दिवस सकारात्मक असेल. अतिरिक्त ऊर्जेमुळे तुम्ही सर्व कामं सहजपणे पार पाडाल. काही कामानिमित्त बाहेर जावं लागत असेल तर थोडी काळजी घ्या.

व्यवसाय (Business) - व्यवसाय करणाऱ्या लोकांबद्दल बोलायचं तर, व्यावसायिकांना आज चांगला नफा मिळेल, तुमची कामं नीट पार पडतील.

कौटुंबिक (Family) - तुमची प्रलंबित कामं पूर्ण होण्याची शक्यता आहे. आज रागावर नियंत्रण ठेवा.

आरोग्य (Health) - तुमच्या आरोग्याविषयी बोलायचं तर, बाहेरील खाण्यापिण्यावर थोडं कंट्रोल ठेवावं लागेल. तुमचं आरोग्य बिघडू शकतं.

मीन (Pisces Today Horoscope)

नोकरी (Job) - जर आपण नोकरी करणाऱ्या लोकांबद्दल बोललो तर, नोकरदारांचा आज काम करण्याचा मूड नसेल, तरीही काम कसंबसं काम करावं लागेल.

व्यवसाय (Business) - मीन राशीच्या लोकांनी थोडी सावधगिरी बाळगावी, कारण जर तुम्हाला काही नुकसान झालं तर त्याचा तुमच्या आर्थिक स्थितीवर परिणाम होईल, त्यामुळे तुम्ही व्यवसायातही कोणत्याही अनोळखी व्यक्तीवर विश्वास ठेवणं टाळावं, तो तुमचा विश्वासघात करू शकतो.

विद्यार्थी (Student) - विद्यार्थ्यांबद्दल सांगायचं तर, तुमच्या कुटुंबातील काही अनावश्यक भांडणांमुळे तुमचं मन अस्वस्थ होईल, याचा तुमच्या कौटुंबिक जीवनावरही परिणाम होईल.

आरोग्य (Health) - आज तुमची मानसिक स्थिती चांगली नसेल, तुम्हाला आरामाची गरज भासेल.

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.) 

हेही वाचा :

Guru Vakri 2024 : तब्बल 12 वर्षांनंतर नवरात्रीत गुरु ग्रह वक्री; 'या' राशींना येणार सोन्याचे दिवस, उत्पन्नाचे नवे स्रोत होणार खुले

 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Eknath Shinde - Vinod Tawde : आधी कुजबूज, नंतर टाळी दिली! शिंदे-तावडेंमध्ये काय चर्चा?
Eknath Shinde - Vinod Tawde : आधी कुजबूज, नंतर टाळी दिली! शिंदे-तावडेंमध्ये काय चर्चा?
पेट्रोलचा टँकर पलटी झाला, फोंडा घाटाचा रस्ता सरसर वणव्यासारखा पेटत गेला अन्...
पेट्रोलचा टँकर पलटी झाला, फोंडा घाटाचा रस्ता सरसर वणव्यासारखा पेटत गेला अन्...
Devendra Fadnavis Chief Minister : देवेंद्र फडणवीसांची झंझावाती कारकीर्द, कमबॅकची कहाणी माझा वर
Devendra Fadnavis Chief Minister : देवेंद्र फडणवीसांची झंझावाती कारकीर्द, कमबॅकची कहाणी माझा वर
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 डिसेंबर 2024 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 डिसेंबर 2024 | बुधवार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Zero Hour : शपथविधीआधी देवेंद्र फडणवीसांसमोर सर्वात मोठी आव्हानं, एकनाथ शिंदेच्या नाराजीचा अर्थ काय?Special Report on Devendra Fadnavis : सर्वसमावेशक अनुमोदन, देवेंद्र फडणवीस भाजप विधिमंडळ पक्षनेतेपदीSudhir Mungantiwar on Oath Ceremony : उद्या फक्त 3 जण शपथ घेतील, सुधीर मुनगंटीवारांची मोठी माहितीEknath Shinde - Vinod Tawde : आधी कुजबूज, नंतर टाळी दिली! शिंदे-तावडेंमध्ये काय चर्चा?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Eknath Shinde - Vinod Tawde : आधी कुजबूज, नंतर टाळी दिली! शिंदे-तावडेंमध्ये काय चर्चा?
Eknath Shinde - Vinod Tawde : आधी कुजबूज, नंतर टाळी दिली! शिंदे-तावडेंमध्ये काय चर्चा?
पेट्रोलचा टँकर पलटी झाला, फोंडा घाटाचा रस्ता सरसर वणव्यासारखा पेटत गेला अन्...
पेट्रोलचा टँकर पलटी झाला, फोंडा घाटाचा रस्ता सरसर वणव्यासारखा पेटत गेला अन्...
Devendra Fadnavis Chief Minister : देवेंद्र फडणवीसांची झंझावाती कारकीर्द, कमबॅकची कहाणी माझा वर
Devendra Fadnavis Chief Minister : देवेंद्र फडणवीसांची झंझावाती कारकीर्द, कमबॅकची कहाणी माझा वर
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 डिसेंबर 2024 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 डिसेंबर 2024 | बुधवार
Maharashtra CM : शपथ विधिबाबत एकनाथ शिंदेंचा सस्पेन्स कायम; समजूत काढण्यासाठी शिवसेनेचे आमदार वर्षावर
शपथ विधिबाबत एकनाथ शिंदेंचा सस्पेन्स कायम; समजूत काढण्यासाठी शिवसेनेचे आमदार वर्षावर
Eknath Shinde : देवेंद्र फडणवीस यांची विनंती अन् उपमुख्यमंत्रिपदाबाबतचा प्रश्न, एकनाथ शिंदे पत्रकार परिषदेत काय म्हणाले?
देवेंद्रजींनी मुख्यमंत्री व्हावं असं पाठिंब्याचं पत्र सेनेनं दिलं, एकनाथ शिंदेंनी सांगितला अडीच वर्षांपूर्वीचा प्रसंग
Devendra Fadnavis : Eknath Shinde मंत्रिमंडळात राहणार नाही? फडणवीसांचं मोठं वक्तव्य
Devendra Fadnavis : Eknath Shinde मंत्रिमंडळात राहणार नाही? फडणवीसांचं मोठं वक्तव्य
Rahul Narwekar : राहुल नार्वेकर पुन्हा विधानसभा अध्यक्ष होणार, सूत्रांची माहिती, विशेष अधिवेशनाच्या तारखा समोर
राहुल नार्वेकर पुन्हा विधानसभा अध्यक्ष होणार, सूत्रांची माहिती, विशेष अधिवेशनाच्या तारखा समोर
Embed widget