एक्स्प्लोर
Vastu Tips : 2025 सुरु होण्याआधी घरातून 'या' वस्तूंना करा 'बाय बाय'; घरात येईल दारिद्र्य
Vastu Tips : नवीन वर्षात सुख-समृद्धी आणि धन-संपत्तीत वाढावी यासाठी संकल्प केला जातो. पण, त्याआधी आपण घरातून काही गोष्टींना बाहेर काढणं गरजेचं आहे. यामुळे घरात नकारात्मकता येते.

Vastu Tips
1/7

लवकरच नवीन वर्षाची सुरुवात होणार आहे. घरात आनंद टिकून राहावा आणि नवीन वर्ष सुखात जावं यासाठी वास्तूनुसार काही वस्तू घरातून बाहेर काढणं गरजेचं आहे. या वस्तू कोणत्या ते जाणून घेऊयात.
2/7

नवीन वर्ष सुरु होण्याआधी घरातून सर्वात आधी सुकलेली, ओली आणि बेकार फुलं घराबाहेर फेकून द्या. तसेच, तडा गेलेली फुलदाणी घरात ठेवू नका. रोपांना सुख-शांतीचं प्रतीक मानण्यात आलं आहे. यामुळे घरात नकारात्मक ऊर्जा येते.
3/7

तसेच, तुमच्या कपाटातील सर्व जुने कपडे बाहेर काढून ठेवा. वास्तूशास्त्रानुसार, फाटलेले कपडे घरात ठेवल्याने घरात दारिद्र्य येते.
4/7

जर तुमच्या घरात बंद पडलेलं घड्याळ असेल तर ते लगेच दुरुस्त करुन घ्या. घड्याळाचा संबंध माणसाच्या नशिबाशी संबंधित आहे. वास्तूशास्त्रानुसार, बंद पडलेलं घड्याळ घरात ठेवल्याने घरात तणावाचं वातावरण निर्माण होतं.
5/7

नवीन वर्ष सुरु होण्याआधी घरातून तुटलेल्या काचा बाहेर काढा. जर तुमच्या घरात एखादं ग्लास किंवा तुटलेला आरसा असेल तर तो लगेच बाहेर काढा. वास्तूशास्त्रानुसार, यामुळे घरात दारिद्र्य येते.
6/7

नवीन वर्ष सुरु होण्याआधी घरात मोठं कपाट, तुटलेलं सामान जर ठेवलं असेल तर ते लगेच बाहेर काढा. वाईट सामान घरात नकारात्मक ऊर्जा निर्माण करतं. यासाठी नवीन वर्ष सुरु होण्याआधी हे काम नक्की करा.
7/7

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
Published at : 29 Dec 2024 03:19 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
भारत
राजकारण
विश्व
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
