Health Tips : हिवाळ्यात रोज रात्री गरम पाणी प्यायल्याने होतात 'हे' फायदे
Health Tips : गरम पाणी पिणे आरोग्यासाठी फायदेशीर आहे.
Benefits of Drinking Hot Water : सकाळी गरम पाणी पिणे आरोग्यासाठी फायदेशीर असते. यामुळे रोग प्रतिकारशक्ती देखील सुधारते. तसेच रात्री झोपण्यापूर्वी गरम पाणी पिणे देखील आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे.
पचनक्रिया सुधारते -
रात्री झोपण्यापूर्वी गरम पाण्याचे सेवन केल्यास पचनक्रिया सुधारते. गरम पाणी केवळ आतड्यांसाठी उपयुक्त नाही तर पोटाशी संबंधित समस्या जसे की बद्धकोष्ठता, गॅस इत्यादी दूर करण्यासाठी देखील फायदेशीर ठरू शकते. याशिवाय रात्री गरम पाणी प्यायल्याने अन्न लवकर पचते.
मानसिक आरोग्य चांगले राहते -
जर तुम्ही दररोज रात्री झोपण्यापूर्वी गरम पाण्याचे सेवन करत असाल तर असे केल्याने तुम्हाला नैराश्याच्या समस्येपासूनही आराम मिळू शकतो. त्याचबरोबर गरम पाणी प्यायल्याने तुमचा मूडही फ्रेश राहतो.
चांगली झोप -
रात्री झोपण्यापूर्वी गरम पाण्याचे सेवन केल्याने झोपेची समस्या दूर होते. गरम पाणी पिल्याने नैराश्य आणि तणाव या दोन्हीपासून दूर राहता येते. त्यामुळे माणसाला चांगली झोप येऊ शकते.
वजन कमी करण्यासाठी उपयुक्त -
रोज रात्री झोपण्यापूर्वी गरम पाण्याचे सेवन केले तर शरीरातील अतिरिक्त चरबी कमी होऊ शकते. तसेच पचनसंस्थादेखील निरोगी राहते.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.
संबंधित बातम्या
Protein Benefits : वजन कमी करण्यासाठी आणि शरीराला मजबूत करण्यासाठी प्रोटीन अत्यावश्यक
Skin Care Tips For Winter : 'या' गोष्टी वापरा, चेहरा बनेल तरूण आणि चमकदार
Majha Impact : बापासाठी 'धावणाऱ्या' जिगरबाज लेकी! पारनेरच्या भगिनींना दत्ता मेघेंकडून मदतीचा हात
Immunity Booster : हिवाळ्यात अशी वाढवा रोगप्रतिकारशक्ती, 'या' फळांमधून शरीराला मिळतील सर्व आवश्यक व्हिटामिन्स
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha
Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )