मोठी बातमी! हनुमान जयंतीनिमित्य अंजनेरी पर्वतावर जाणाऱ्या भाविकांवर मधमाशांचा हल्ला; अनेक जण जखमी असल्याची माहिती
Hanuman Jayanti 2025 : नाशिक जिल्ह्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. हनुमान जयंतीनिमित्य अंजनेरी पर्वतावर दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांवर मधमाशांनी हल्ला केला आहे.

Nashik News : नाशिक जिल्ह्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. हनुमान जयंतीनिमित्य अंजनेरी पर्वतावर दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांवर मधमाशांनी हल्ला केला आहे. यात 70 ते 80 भाविकांवर मधमाशांनी हल्ला केल्याची माहिती समोर आली आहे. यात काही जण जखमी झाल्याचे सांगितलं जातंय. अंजनेरी पर्वतावर असलेल्या मंदिरात दरवर्षी राज्यभरातून आलेले भाविक दर्शनासाठी जात असतात. अशातच या भाविकांवर अचानक मधमाशांनी हल्ला चढवला आहे. अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे काही काळ भाविकांची एकच धावपळ झाल्याचे बघायला मिळाले आहे.
हनुमंताचे जनस्थळ असलेल्या अंजनेरी येथे भाविकांची मोठी गर्दी
राज्यभर हनुमान जन्मोत्सवाचा सोहळा मोठ्या उत्साहाने साजरा होत आहे. अशातच नाशिकच्या हनुमानाच्या जन्मस्थळ असलेल्या अंजनेरी पर्वतावर मोठी गर्दी जमल्याचे बघायला मिळाले आहे. अंजनेरी गडाच्या पायथ्याशी असलेल्या हनुमान मंदिरात पहाटेपासून भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. पहाटे विधिवत पूजा विधी करून हनुमान जन्मोत्सव साजरा झाला. यावेळी हनुमंतरायांच्या मूर्तीला विविध आभूषणे परिधान करण्यात आले आहे. मूर्तीला फेटा बांधून फुलांची आरास देखील करण्यात आली आहे. विद्युत रोषणाईसह संपूर्ण मंदिराला आकर्षक सजावट करण्यात आली आहे. फळांचा भोग दाखवत महाआरती करण्यात आली आहे.
नांदुरा येथील जगातील सर्वात उंच विशालकाय हनुमानाच्या मूर्तीला जलाभिषेक
हनुमानाचा जन्मोत्सव बुलढाणा जिल्ह्यात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत आहे. जिल्ह्यातील नांदुरा येथील जगातील सर्वात उंच अशी 107 फूट विशालकाय हनुमानाच्या मूर्तीला सकाळी जलाभिषेक करून हनुमान जन्मोत्सवाच्या कार्यक्रमांना सुरुवात झाली . राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावर नांदुरा शहराजवळच असलेल्या 107 फूट उंच हनुमानाच्या मूर्तीचे दर्शन घेण्यासाठी जिल्हाभरातूनच नव्हे तर शेजारील जिल्ह्यातही भाविक सकाळपासूनच गर्दी करत आहे. अतिशय विशाल काय अशी ही मूर्ती असून राज्यभरात प्रसिद्ध आहे.
संकट मोचक म्हणून ज्यांची प्रचिती संपूर्ण विश्वाला आहे. असे राम भक्त हनुमान जी यांचा जन्मोत्सव देशभरात मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. अशात गोंदिया शहरातील सिव्हिल लाईन येथील हनुमान मंदिरात आज पहाटे 5 वाजता हनुमान जी चे पंचामृत स्नान करून अभिषेक करण्यात आला. सकाळी पहाटे पाच वाजेपासून भक्तांच्या अभिषेक करण्याकरता रांगा लागल्या होत्या. प्रभू श्रीरामाचे नामाचे स्मरण करत सकाळपासून गर्दी दिसून आली.
हे ही वाचा























