एक्स्प्लोर

Gondia News : आजी-माजी आमदारांच्या लढाईत विद्यमान आमदार ठरले वरचढ, सहसराम कोरोटे यांच्या हस्ते देवरी ग्रामीण रुग्णालयाचे लोकार्पण

Gondia : गोंदियातील देवरी इथल्या ग्रामीण रुग्णालयाच्या नवीन इमारतीवरुन काँग्रेसचे विद्यमान आमदार सहसराम कोरोटे आणि भाजपचे माजी आमदार संजय पुराम यांच्यातील वादाला अखेर पूर्णविराम मिळाला आहे.

गोंदिया : गोंदियातील (Gondia) देवरी इथल्या ग्रामीण रुग्णालयाच्या नवीन इमारतीवरुन काँग्रेसचे विद्यमान आमदार सहसराम कोरोटे (Sahasram Korote) आणि भाजपचे माजी आमदार संजय पुराम (Sanjay Puram) यांच्यात चांगलाच कलगीतुरा रंगला होता. या वादाला अखेर पूर्णविराम मिळाला आहे. स्वातंत्र्यदिनाचे (Independence Day) औचित्य साधून काँग्रेसचे आमदार सहसराम कोरोटे यांनी या इमारतीचे लोकार्पण केले आहे.

स्वातंत्र्यदिनाचे औचित साधून रुग्णालयाचे लोकार्पण

देवरी इथे 12 कोटी 50 लाख रुपये खर्च करुन ग्रामीण रुग्णालयाची इमारत (Rural Hospital Building)  तयार करण्यात आली. पण या इमारतीत फर्निचरची कामे होण्यास दोन महिने लागणार आहेत. त्यामुळे ही कामे झाल्यावरच ग्रामीण रुग्णालयाचे लोकार्पण करु देणार, अशी भूमिका भाजपचे माजी आ. संजय पुराम यांनी घेतली होती. तर ग्रामीण रुग्णालयाची जुनी इमारत जीर्ण झाली असून या इमारतीतून कारभार चालवणे म्हणजे रुग्णांच्या जीवाशी खेळ करणे असे आहे. नवीन इमारत बनली असून या इमारतीचे लोकार्पण 15 ऑगस्ट 2023 रोजी करुन रुग्णांची गैरसोय दूर करणार असल्याची भूमिका आमदार सहषराम कोरोटे यांनी घेतली. अखेर काल स्वातंत्र्यदिनाचे औचित साधून आमदार कोरोटे यांनी या रुग्णालयाचे लोकार्पण केले. आरोग्यमंत्र्यांना भेटून लवकरच या रुग्णालयात रुग्णांना उपचार देण्याची सुविधा उपलब्ध करुन देणार असल्याचे आश्वासन आमदार कोरोटे यांनी दिले आहे. 

आजी-माजी आमदारांच्या लढाईत विद्यमान आमदार ठरले वरचढ 

आदिवासी बहुल जिल्हा म्हणून गोंदिया जिल्ह्याची ओळख आहे. त्यातच देवरी तालुका हा आदिवासी बहुल, अतिदुर्गम आणि नक्षलदृष्ट्या संवेदनशील तालुका म्हणून जिल्ह्यात ओळखला जातो. मोठ्या प्रमाणात आदिवासी बांधव या तालुक्यात आहेत. ग्रामीण भागात आरोग्याच्या अपुऱ्या सोयी सुविधांमुळे तालुकास्तरावर रुग्णांना आरोग्याच्या सोयी सुविधा घ्यायला यावे लागते. मात्र देवरी ग्रामीण रुग्णालयाची आरोग्य व्यवस्था हे व्हेंटिलेटरवर असून इमारत पूर्णतः जीर्ण झाली आहे. पावसाळ्याच्या दिवसात छत गळत असून रुग्णांना व रुग्णांच्या नातेवाईकांना जीव मुठीत घेऊन दिवस काढावे लागत आहेत. याचीच दखल घेत आमदार सहसराम कोरोटे यांनी कुठलाही मुहूर्त न बघता इमारतीचे लोकार्पण केलं आहे. लवकरच आरोग्यमंत्र्यांशी बोलून नव्या इमारतीत आरोग्य सुविधा द्यायला सुरुवात करु असं आश्वासन आमदार कोरोटे यांनी दिलं आहे.

हेही वाचा

Gondia News : आंघोळीसाठी तलावात उतरले अन्.... गोंदियातील कोचिंग क्लासमधील तीन शिक्षकांचा छत्तीसगडमध्ये बुडून मृत्यू

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Team India: टीम इंडियावर दुहेरी संकट, अभिषेक शर्मा आजारी आता ईशान किशन दुखापतग्रस्त, धक्कादायक अपडेट समोर
बुमराहच्या यॉर्करवर ईशान किशन दुखापतग्रस्त, टीम इंडियासमोर दुहेरी संकट, सूर्याचं टेन्शन वाढलं
धक्कादायक! घरातील फ्रीजचा स्फोट, घरगुती साहित्याची राखरांगोळी; इमारतीच्या उंच मजल्यापर्यंत धुराचे लोट
धक्कादायक! घरातील फ्रीजचा स्फोट, घरगुती साहित्याची राखरांगोळी; इमारतीच्या उंच मजल्यापर्यंत धुराचे लोट
बदलापुरातील धक्कादायक प्रकार, रिक्षाचालकाने अल्पवयीन मुलीचा हात धरला, मैत्रिणीमुळे झाली सुटका; आरोपीला अटक
बदलापुरातील धक्कादायक प्रकार, रिक्षाचालकाने अल्पवयीन मुलीचा हात धरला, मैत्रिणीमुळे झाली सुटका; आरोपीला अटक
पुन्हा स्टँप घोटाळा, तेलगीची आठवण; मुंबई पोलिसांकडून 5 जणांना अटक, दिल्लीत 14 दिवस लावला सापळा
पुन्हा स्टँप घोटाळा, तेलगीची आठवण; मुंबई पोलिसांकडून 5 जणांना अटक, दिल्लीत 14 दिवस लावला सापळा

व्हिडीओ

Sambhajinagar Phulambri : इंग्रजी शाळेतलं भयंकर कृत्य, संभाजीनगर हादरलं Special Report
Mumbai Mayor : रितू तावडेंनी स्वीकारला महापौरपदाचा पदभार Special Report
Rohit Pawar on Ajit Pawar : रोहित पवारांच्या आरोपांतील 'तो' नेता कोण? Special Report
Chandrapur Shivsena- BJP : चंद्रपुरात ठाकरेंच्या शिवसेनेचा काँग्रेसला डच्चू Special Report
Solapur Ram Satpute : राम सातपुतेंच्या जीवाला धोका? Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Team India: टीम इंडियावर दुहेरी संकट, अभिषेक शर्मा आजारी आता ईशान किशन दुखापतग्रस्त, धक्कादायक अपडेट समोर
बुमराहच्या यॉर्करवर ईशान किशन दुखापतग्रस्त, टीम इंडियासमोर दुहेरी संकट, सूर्याचं टेन्शन वाढलं
धक्कादायक! घरातील फ्रीजचा स्फोट, घरगुती साहित्याची राखरांगोळी; इमारतीच्या उंच मजल्यापर्यंत धुराचे लोट
धक्कादायक! घरातील फ्रीजचा स्फोट, घरगुती साहित्याची राखरांगोळी; इमारतीच्या उंच मजल्यापर्यंत धुराचे लोट
बदलापुरातील धक्कादायक प्रकार, रिक्षाचालकाने अल्पवयीन मुलीचा हात धरला, मैत्रिणीमुळे झाली सुटका; आरोपीला अटक
बदलापुरातील धक्कादायक प्रकार, रिक्षाचालकाने अल्पवयीन मुलीचा हात धरला, मैत्रिणीमुळे झाली सुटका; आरोपीला अटक
पुन्हा स्टँप घोटाळा, तेलगीची आठवण; मुंबई पोलिसांकडून 5 जणांना अटक, दिल्लीत 14 दिवस लावला सापळा
पुन्हा स्टँप घोटाळा, तेलगीची आठवण; मुंबई पोलिसांकडून 5 जणांना अटक, दिल्लीत 14 दिवस लावला सापळा
मोठी बातमी! शेअर मार्केट गुंतवणुकीतून 22 कोटींना फसवले, पुण्यात 85 वर्षीय वृद्धास मोठ्या परताव्याचे आमिष
मोठी बातमी! शेअर मार्केट गुंतवणुकीतून 22 कोटींना फसवले, पुण्यात 85 वर्षीय वृद्धास मोठ्या परताव्याचे आमिष
Mutual Fund : सलग दुसऱ्या महिन्यात इक्विटी म्युच्युअल फंडमधील गुंतवणूक घटली, आकडेवारी समोर, जाणून घ्या कारणं
सलग दुसऱ्या महिन्यात इक्विटी म्युच्युअल फंडमधील गुंतवणूक घटली, जाणून घ्या कारणं  
मोठी बातमी! कोल्हापूरमध्ये होणाऱ्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमला अजित पवार यांचं नाव दिलं जाणार, नियोजन समितीच्या बैठकीत निर्णय
मोठी बातमी! कोल्हापूरमध्ये होणाऱ्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमला अजित पवार यांचं नाव दिलं जाणार, नियोजन समितीच्या बैठकीत निर्णय
12 वीच्या परीक्षेत कॉप्यांचा सुळसुळाट; शिक्षणमंत्री संतापले, म्हणाले, केंद्र प्रमुख अन् पर्यवेक्षकांवर कारवाई
12 वीच्या परीक्षेत कॉप्यांचा सुळसुळाट; शिक्षणमंत्री संतापले, म्हणाले, केंद्र प्रमुख अन् पर्यवेक्षकांवर कारवाई
Embed widget