एक्स्प्लोर

Gondia News : आंघोळीसाठी तलावात उतरले अन्.... गोंदियातील कोचिंग क्लासमधील तीन शिक्षकांचा छत्तीसगडमध्ये बुडून मृत्यू

Gondia News : फिरायला गेलेल्या कोचिंग क्लासमधील तीन शिक्षकांचा तलावात बुडून मृत्यू झाल्याची घटना छत्तीसगडमध्ये घडली आहे. तीनही मृत शिक्षक हे गोंदियात एका कोचिंग क्लासमध्ये शिकवत होते.

गोंदिया : फिरायला गेलेल्या कोचिंग क्लासमधील तीन शिक्षकांचा (Teacher) तलावात बुडून मृत्यू झाल्याची घटना छत्तीसगडमध्ये (Chhattisgarh) घडली आहे. ही घटना छत्तीसगडमधील सोमणी पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या मनगट्टा गावात घडली आहे. तीनही मृत शिक्षक हे गोंदियात (Gondia) एका कोचिंग क्लासमध्ये शिकवत होते. तिन्ही मृत शिक्षक हे नागपूर, भिलाई आणि उत्तर प्रदेश येथील रहिवासी असल्याचे सांगण्यात येत आहे. तिघांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत.

आंघोळीसाठी तलावात उतरले अन्....

हे शिक्षक गोंदियातील सिद्धिविनायक कोचिंग क्लासमध्ये JEE आणि NEET ची कोचिंग घेत होते. काल (15 ऑगस्ट) स्वातंत्र्यदिनाची सुट्टी असल्याने  कोचिंग क्लासमधील तीन शिक्षकांसह चार जण फिरायला छत्तीसगड राज्यात गेले होते. दरम्यान त्यापैकी तिघेही एका तलावात आंघोळीसाठी उतरले. मात्र त्यांच्यासोबत असलेले नारायण साळवे हे तलावाच्या बाहेरच राहिले. खूप वेळपर्यंत ते तिघेही पाण्याबाहेर न आल्याने बाहेर असलेल्या नारायण साळवे यांनी मदतीसाठी आरडाओरडा केला. त्यामुळे तिथे नागरिकांची गर्दी झाली. यानंतर या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. 

रात्री एक मृतदेह सापडला, दोन मृतदेह सकाळी सापडले

घटनेची माहिती मिळाल्यानंतर छत्तीसगड पोलीस घटनास्थळी पोहोचल्यानंतर शोधकार्य आणि बचावकार्य सुरु करण्यात आले. रात्री उशिरापर्यंत शोधकार्य सुरु होते. रात्रीपर्यंत एक मृतदेह हाती लागला होता. अंधार पडल्याने शोध आणि बचावकार्य थांबवण्यात आलं होतं. त्यानंतर आज सकाळी सकाळी पुन्हा शोधकार्य सुरु केल्यानंतर अन्य दोन मृतदेह सापडले. 

तिन्ही शिक्षकांच्या मृत्यूनंतर गोंदियात हळहळ

एन. मिश्रा (रा. भिलाई), अरविंद सर (रा. उत्तर प्रदेश) आणि अतुल कडू (रा. नागपूर) अशी मृत शिक्षकांची नावं आहेत. रात्री एक तर आज सकाळी अन्य 2 मृतदेह गवसले असून राजनांदगाव इथे शवविच्छेदन करता पाठवण्यात आले आहे. गोंदियातील सिद्धिविनायक कोचिंग क्लासमध्ये शिक्षक असलेले चार शिक्षक सुट्टी असल्याने फिरायला गेले. परंतु पिकनिकदरम्यान अशी दुर्घटना होईल अशी कोणालाही कल्पना नसावी. चार पैकी तीन शिक्षकांच्या मृत्यूनंतर गोंदियात सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

हेही वाचा

महत्त्वाच्या बातम्या

Pune Junnar Crime News: 'चल तुला सायकल शिकवतो' म्हणत घरापासून दूर ऊसाच्या शेतात नेलं; जुन्नरमधील चिमुरडीवर अत्याचार झालेलं ठिकाण अंगावर काटा आणणारं, व्हिडीओ समोर
'चल तुला सायकल शिकवतो' म्हणत घरापासून दूर ऊसाच्या शेतात नेलं; जुन्नरमधील चिमुरडीवर अत्याचार झालेलं ठिकाण अंगावर काटा आणणारं, व्हिडीओ समोर
Rahul Gandhi Chhatron ki Goonj: राहुल गांधींच्या पुण्यातील कार्यक्रमाला अद्याप पोलिसांची परवानगी नाही, प्रशांत जगताप दंड थोपटत म्हणाले....
राहुल गांधींच्या पुण्यातील कार्यक्रमाला अद्याप पोलिसांची परवानगी नाही, प्रशांत जगताप दंड थोपटत म्हणाले....
Asim Sarode on Rahul Narvekar: 'शाश्वत शब्दाचा अर्थ तरी कळतो का? राहुल नार्वेकर स्वतः वकील, त्यांना माझे जाहीर आव्हान आहे..' असीम सरोदेंकडून चॅलेंज
'शाश्वत शब्दाचा अर्थ तरी कळतो का? राहुल नार्वेकर स्वतः वकील, त्यांना माझे जाहीर आव्हान आहे..' असीम सरोदेंकडून चॅलेंज
Narendra Modi: मला मोदींचा अभिमान वाटतो, ते चांगलं काम करतात; युगेंद्र पवारांकडून कौतुक, बारामती दौऱ्याबाबतही भाष्य
मला मोदींचा अभिमान वाटतो, ते चांगलं काम करतात; युगेंद्र पवारांकडून कौतुक, बारामती दौऱ्याबाबतही भाष्य

व्हिडीओ

Nashik Crime : लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या प्रेयसीकडून हत्या Special Report
Vinod Tawde UP incharge : विनोद तावडेंची कामगिरी, उत्तर प्रदेशची जबाबदारी Special Report
Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Laxman Hake PC : ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय
Devendra Fadnavis On Tukaram Mundhe FDA: तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईवर फडणवीस पहिल्यांदाच बोलले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune Junnar Crime News: 'चल तुला सायकल शिकवतो' म्हणत घरापासून दूर ऊसाच्या शेतात नेलं; जुन्नरमधील चिमुरडीवर अत्याचार झालेलं ठिकाण अंगावर काटा आणणारं, व्हिडीओ समोर
'चल तुला सायकल शिकवतो' म्हणत घरापासून दूर ऊसाच्या शेतात नेलं; जुन्नरमधील चिमुरडीवर अत्याचार झालेलं ठिकाण अंगावर काटा आणणारं, व्हिडीओ समोर
Rahul Gandhi Chhatron ki Goonj: राहुल गांधींच्या पुण्यातील कार्यक्रमाला अद्याप पोलिसांची परवानगी नाही, प्रशांत जगताप दंड थोपटत म्हणाले....
राहुल गांधींच्या पुण्यातील कार्यक्रमाला अद्याप पोलिसांची परवानगी नाही, प्रशांत जगताप दंड थोपटत म्हणाले....
Asim Sarode on Rahul Narvekar: 'शाश्वत शब्दाचा अर्थ तरी कळतो का? राहुल नार्वेकर स्वतः वकील, त्यांना माझे जाहीर आव्हान आहे..' असीम सरोदेंकडून चॅलेंज
'शाश्वत शब्दाचा अर्थ तरी कळतो का? राहुल नार्वेकर स्वतः वकील, त्यांना माझे जाहीर आव्हान आहे..' असीम सरोदेंकडून चॅलेंज
Narendra Modi: मला मोदींचा अभिमान वाटतो, ते चांगलं काम करतात; युगेंद्र पवारांकडून कौतुक, बारामती दौऱ्याबाबतही भाष्य
मला मोदींचा अभिमान वाटतो, ते चांगलं काम करतात; युगेंद्र पवारांकडून कौतुक, बारामती दौऱ्याबाबतही भाष्य
Sanjay Raut : इकडल्या बंगल्यातून दिल्लीच्या बंगल्यात जायचंय, मोठा बंगला मिळेल, वहिनीसाहेबांनी मानसिकता करावी, संजय राऊतांचा खोचक टोला
इकडल्या बंगल्यातून दिल्लीच्या बंगल्यात जायचंय, मोठा बंगला मिळेल, वहिनीसाहेबांनी मानसिकता करावी, संजय राऊतांचा खोचक टोला
Sameer Wankhede on Tukaram Mundhe: बेधडक तुकाराम मुंढेंच्या धडाडीने अवघ्या देशात चर्चा, पण समीर वानखेडेंच्या प्रतिक्रियेनं सर्वांच्याच भूवया उंचावल्या! नेमकं म्हणाले तरी काय
बेधडक तुकाराम मुंढेंच्या धडाडीने अवघ्या देशात चर्चा, पण समीर वानखेडेंच्या प्रतिक्रियेनं सर्वांच्याच भूवया उंचावल्या! नेमकं म्हणाले तरी काय
Ganesh Naik: डेटा सेंटरला वीज, पाणी लागतं, नॉइज पोल्युशन होतं, डेटा सेंटर हवं, पंतप्रधानांनी सांगितलं पण या सेंटरला माझा वैयक्तिक विरोध, गणेश नाईक नेमकं काय म्हणाले?
डेटा सेंटरला वीज, पाणी लागतं, नॉइज पोल्युशन होतं, डेटा सेंटर हवं, पंतप्रधानांनी सांगितलं पण या सेंटरला माझा वैयक्तिक विरोध, गणेश नाईक नेमकं काय म्हणाले?
Baba Ramdev on Kangana Ranaut: शिक्षण काय, तारुण्य कसं गेलं, तिचे पहिले कारनामे काय काय होते? ही बिघडलेल्या डोक्याची लक्षणे..' बाबा रामदेव खासदार कंगनावर का भडकले??
शिक्षण काय, तारुण्य कसं गेलं, तिचे पहिले कारनामे काय काय होते? ही बिघडलेल्या डोक्याची लक्षणे..' बाबा रामदेव खासदार कंगनावर का भडकले??
Embed widget