एक्स्प्लोर

Maharashtra Politics: गोंदिया जिल्ह्यात भाजपला मोठं खिंडार! दोन महिन्यात दुसरा राजीनामा, माजी आमदार काँग्रेसमध्ये घरवापसी करणार

Maharashtra Politics: गोंदिया जिल्ह्यात भाजपला मोठा धक्का बसला आहे. माजी आमदार गोपालदास अग्रवाल हे काँग्रेसमध्ये घरवापसी करणार आहेत.

गोंदिया: आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने राज्याच्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडत असल्याचं चित्र आहे. अनेक आमदार, नेते घरवापसी करत असल्याचं चित्र आहे, अशातच गोंदिया जिल्ह्यात भाजपला मोठा धक्का बसला आहे.  माजी आमदार गोपालदास अग्रवाल (Gopaldas Agrawal) हे काँग्रेसमध्ये घरवापसी करणार आहेत. त्यांनी आज एबीपी माझाशी बोलताना भाजप सोडण्याचं कारण देखील सांगितलं आहे.

मी भाजपमध्ये असताना भाजपचे नेते मला सोडून अपक्ष आमदार विनोद अग्रवाल यांना अधिक महत्व देत असल्याने मला भाजप सोडण्याचा निर्णय घ्यावा लागल्याचे गोपालदास अग्रवाल (Gopaldas Agrawal) यांनी सांगितले आहे. त्यामुळे आता गोंदिया विधानसभेत काँग्रेसचे गोपालदास अग्रवाल (Gopaldas Agrawal) विरुद्ध भाजपचे विनोद अग्रवाल अशी लढत होण्याची शक्यता राजकीय वर्तुळात वर्तवली जात आहे. या पार्श्वभूमीवर प्रफुल्ल पटेल यांच्या बालेकिल्ल्यात आज काँग्रेस शक्तीप्रदर्शन करून गोपालदास अग्रवाल यांचा पक्षप्रवेश करून घेत आह. एकप्रकारे काँग्रेसच्या प्रचाराची सुरुवात करत आहे, अशी चर्चा वर्तवली आहे.

भाजपमध्ये असलेले माजी आमदार गोपाल अग्रवाल (Gopaldas Agrawal) यांनी भाजपच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता. आज (13 सप्टेंबरला) काँग्रेसमध्ये घरवापसी करणार असल्याची माहिती स्वत: गोपाल अग्रवाल यांनी दिली होती. गोपालदास अग्रवाल (Gopaldas Agarwal) 2019 च्या विधानसभा निवडणुकी दरम्यान भाजपमध्ये दाखल झाले होते. 

भाजपला खिंडार; दोन महिन्यात आणखी एका माजी आमदाराचा राजीनामा

विधानसभा निवडणुकीपुर्वी माजी आमदार रमेश कुथे यांनी भाजपमधून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केला आहे. त्यानंतर पुन्हा एक माजी आमदार आणि भाजपला सोडचिठ्ठी दिल्याने पूर्व विदर्भात भाजपला मोठा धक्का दिला आहे. विशेष म्हणजे गोपाल अग्रवाल यांच्या पत्रकार परिषदेमध्ये काँग्रेसचे आमदार सहसराम कोरोटे, काँग्रेस जिल्हा अध्यक्ष दिलीप बनसोड, काँग्रेस पदाधिकारी यांची उपस्थिती असल्याने ते काँग्रेसमध्ये प्रवेश करणार हे मात्र निश्चित झाले आहे. त्यामुळे गोंदिया जिल्ह्यामध्ये भाजपाला पुन्हा एक मोठा धक्का बसला आहे.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

निवडणुकांमुळे राज्यातील शाळांना 18, 19 नोव्हेंबरला सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांचं स्पष्टीकरण
मोठी बातमी! निवडणुकांमुळे राज्यातील शाळांना 18, 19 नोव्हेंबरला सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांचं स्पष्टीकरण
Varsha Gaikwad : ‘एक हैं तो सेफ हैं’चा नारा देणाऱ्या मोदींच्या राज्यात मुंबईकर अनसेफ, फक्त लाडका उद्योगपतीच सेफ
‘एक हैं तो सेफ हैं’चा नारा देणाऱ्या मोदींच्या राज्यात मुंबईकर अनसेफ, फक्त लाडका उद्योगपतीच सेफ
ज्यांचे हात बरबटलेले, भ्रष्टाचाराने माखलेले असतात त्यांनाच भीती; ईडी आणि जेलच्या भीतीने सगळा उद्योग केला; अजित पवार गटावर शरद पवारांचा हल्लाबोल
ज्यांचे हात बरबटलेले, भ्रष्टाचाराने माखलेले असतात त्यांनाच भीती; ईडी आणि जेलच्या भीतीने सगळा उद्योग केला; अजित पवार गटावर शरद पवारांचा हल्लाबोल
Nashik Election : प्रचाराची स्लिप वाटण्यावरून ठाकरे गट-भाजपमध्ये राडा, बाचाबाचीनंतर थेट तुफान हाणामारी
प्रचाराची स्लिप वाटण्यावरून ठाकरे गट-भाजपमध्ये राडा, बाचाबाचीनंतर थेट तुफान हाणामारी
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

1 Min 1 Constituency : 1 मिनिट 1 मतदारसंघ : 15 Nov 2024 : Vidhan Sabha : Maharashtra ElectionRaj Thackeray Bhiwandi : महिला कार्यकर्ता पाया पडली, राज ठाकरे म्हणले, हे नाही आवडत मलाNashik-BJP Sena Rada : भाजपच्या गणेश गीतेंच्या वाहनावर हल्ला,  नाशिकमध्ये भाजप-सेनेचा राडाShreya Yogesh Kadam Ratnagiri : 6 महिने मुलांपासून दूर; प्रचारादरम्यान योगेश कदमांच्या पत्नी भावूक

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
निवडणुकांमुळे राज्यातील शाळांना 18, 19 नोव्हेंबरला सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांचं स्पष्टीकरण
मोठी बातमी! निवडणुकांमुळे राज्यातील शाळांना 18, 19 नोव्हेंबरला सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांचं स्पष्टीकरण
Varsha Gaikwad : ‘एक हैं तो सेफ हैं’चा नारा देणाऱ्या मोदींच्या राज्यात मुंबईकर अनसेफ, फक्त लाडका उद्योगपतीच सेफ
‘एक हैं तो सेफ हैं’चा नारा देणाऱ्या मोदींच्या राज्यात मुंबईकर अनसेफ, फक्त लाडका उद्योगपतीच सेफ
ज्यांचे हात बरबटलेले, भ्रष्टाचाराने माखलेले असतात त्यांनाच भीती; ईडी आणि जेलच्या भीतीने सगळा उद्योग केला; अजित पवार गटावर शरद पवारांचा हल्लाबोल
ज्यांचे हात बरबटलेले, भ्रष्टाचाराने माखलेले असतात त्यांनाच भीती; ईडी आणि जेलच्या भीतीने सगळा उद्योग केला; अजित पवार गटावर शरद पवारांचा हल्लाबोल
Nashik Election : प्रचाराची स्लिप वाटण्यावरून ठाकरे गट-भाजपमध्ये राडा, बाचाबाचीनंतर थेट तुफान हाणामारी
प्रचाराची स्लिप वाटण्यावरून ठाकरे गट-भाजपमध्ये राडा, बाचाबाचीनंतर थेट तुफान हाणामारी
Shahu Maharaj : समरजित घाटगेंच्या प्रचारात छत्रपती घराणं सक्रिय; शाहू महाराज म्हणाले, समरजित हे स्वतः सीए आहेत, त्यांना गणित चांगलं कळतं!
समरजित घाटगेंच्या प्रचारात छत्रपती घराणं सक्रिय; शाहू महाराज म्हणाले, समरजित हे स्वतः सीए आहेत, त्यांना गणित चांगलं कळतं!
भरारी पथकाची कारवाई, 546 कोटींची मालमत्ता जप्त; रोकड, मौल्यवान वस्तूंसह सोने-चांदी ताब्यात
मोठी बातमी! भरारी पथकाची कारवाई, 546 कोटींची मालमत्ता जप्त; रोकड, मौल्यवान वस्तूंसह सोने-चांदी ताब्यात
Sharad Pawar : शरद पवारांनी दिलीप वळसेंच्या विरोधात देवदत्त निकमांना उभं 'का' केलं? काय आहे मोठं कारण, जाणून घ्या सविस्तर
शरद पवारांनी दिलीप वळसेंच्या विरोधात देवदत्त निकमांना उभं 'का' केलं? काय आहे मोठं कारण, जाणून घ्या सविस्तर
Palus Kadegaon Sabha Constituency : विश्वजीत कदम दबदबा कायम ठेवणार की भाजप गड फोडणार? पलूस कडेगावमध्ये कोण बाजी मारणार? 
विश्वजीत कदम दबदबा कायम ठेवणार की भाजप गड फोडणार? पलूस कडेगावमध्ये कोण बाजी मारणार? 
Embed widget