(Source: ECI/ABP News/ABP Majha)
छत्तीसगड- बरेगुडा येथील जंगलातून माओवाद्यांचे तळ उद्ध्वस्त, अर्धा तास पोलीस आणि माओवाद्यांमध्ये चकमक
महाराष्ट्र गडचिरोली येथील सी-60, पातागुडेम आणि भोपाळपट्टणम पोलीस स्टेशन येथील डीआरजी पथकाने संयुक्त विरोधी कारवाई केली आहे.
गडचिरोली : गडचिरोली (Gadchiroli News) जिल्ह्यात माओवादी विरोधी मोहिम राबवण्यात येत आहे. पातागुडेम आणि भोपाळपट्टणम पोलीस स्टेशन येथील डीआरजी पथकाच्या संयुक्त विरोधी कारवाईत माओवाद्यांचं तळ उद्ध्वस्त करण्यात आलंय. तब्बल अर्धातास पोलीस आणि माओवाद्यांमध्ये चकमक झाली होती. राष्ट्रीय उद्यान क्षेत्र समितीमध्ये 20 ते 25 सशस्त्र माओवादी सक्रिय असल्याच्या गुप्त माहितीवरुन ही कारवाई करण्यात आली. घटनास्थळावरून स्फोटके, जिलेटिनच्या कांड्या, तंबूचे साहित्य आणि इतर दैनंदिन वापराचे साहित्य जप्त करण्यात आलंय.
सी 60 छत्तीसगड पोलिसांच्या संयुक्त कारवाईत माओवाद्यांचा तळ उद्ध्वस्त झाला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार राष्ट्रीय उद्यान क्षेत्र समितीमध्ये 20-25 सशस्त्र माओवादी सक्रिय असल्याच्या गुप्त माहितीवरून ही कारवाई करण्यात आली आहे. महाराष्ट्र गडचिरोली येथील सी-60, पातागुडेम आणि भोपाळपट्टणम पोलीस स्टेशन येथील डीआरजी पथकाने संयुक्त विरोधी कारवाई केली आहे. डम्मूर, बरेगुडा भागात ही कारवाई करण्यात आली आहे. बुधवारी सायंकाळी 5.30 वाजता बरेगुडा जंगलात अर्धा तास पोलिस आणि माओवाद्यांमध्ये चकमक झाली. घटनास्थळावरून स्फोटके, माओवादी साहित्य आणि माओवादी साहित्य जप्त करण्यात आले.
मंगळवारी भोपाळपट्टणम अंतर्गत दाम्मूर, बरेगुडा येथील जंगलात नॅशनल पार्क एरिया कमिटीचे 20-25 सक्रिय माओवादी असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांना मिळालेल्या माहितीवरून डी.आर.जी. भोपाळपट्टणम आणि महाराष्ट्र गडचिरोली, पातागुडेम पोलीस स्टेशन येथून C-60 चे एकत्रित पथक डम्मूर, बरेगुडा येथे गेले होते. मंगळवारी सायंकाळी 05.30 वाजता बरेगुडाच्या जंगलात पोलिस पथकाची माहिती माओवाद्यांना मिळाली. माओवाद्यांनी पोलीस दलावर स्वयंचलित शस्त्रांनी अंदाधुंद गोळीबार सुरू केला. पोलीस दलाने माओवाद्यांना आत्मसमर्पण करण्यासाठी देखील सूचना केली. तरी देखील माओवाद्यांनी गोळीबार सुरू ठेवला. पोलीस दलाने सुरक्षित कवच घेत स्वसंरक्षणार्थ प्रत्युत्तर दिले. 15-20 मिनिटांनंतर पोलिसांचा ताफा खवळलेला पाहून माओवादी जंगलातून पळून गेले. घटनास्थळाची झडती घेतली असता घटनास्थळावरून स्फोटके, डिटोनेटर्स, जिलेटिनच्या काठ्या, माओवादी साहित्य, पिट्टू पिशव्या, तंबूचे साहित्य आणि इतर दैनंदिन वापराचे साहित्य जप्त करण्यात आले.
इतिहासात पहिल्यांदाच नक्षलवादी सुरक्षा यंत्रेणेपुढे हतबल
गेल्या सत्तर वर्षांमध्ये पहिल्यांदाच माओवादीची केंद्रीय समिती ही भारतीय सुरक्षा यंत्रेणेपुढे हतबल होताना दिलस आहे. तसेच आपल्याला लक्ष्य करत संपवून टाकण्याची भिती आता मओवाद्यांना वाटायला लागली आहे. त्यामुळे नक्षलवाद्यांना टॉप कमांडरसाठी अनेक सूचना मिळत असल्याचं पाहायला मिळत आहे. टॉप कमांडरनी आधुनिक उपकरणांचा वापर न करता ह्युमन इंटेलीजन्सवर भर द्यावा, तसेच घनदाट जंगलात टेक्निकल इंटेलिजन्सचा वापर न करता काम करावे अशा सूचना त्यांना देण्यात आल्या आहेत.
हे ही वाचा :