Dharashiv crime: आईने गळफास घेतला, दोन छोट्या बाळांची प्रेतं पाण्याच्या बॅरेलमध्ये तरंगताना दिसली, धाराशीवमधील धक्कादायक घटना
Dharashiv crime: महिलेने आत्महत्या केल्याचे समोर आल्या असून तिच्या दोन्ही बाळांचे मृतदेह पाण्याच्या बॅरल मध्ये सापडल्याने खळबळ उडाली आहे.
![Dharashiv crime: आईने गळफास घेतला, दोन छोट्या बाळांची प्रेतं पाण्याच्या बॅरेलमध्ये तरंगताना दिसली, धाराशीवमधील धक्कादायक घटना Dharashiv crime news mother suicide two children dead bodies in water barrel tuljapur gattewadi Maharashtra crime news Dharashiv crime: आईने गळफास घेतला, दोन छोट्या बाळांची प्रेतं पाण्याच्या बॅरेलमध्ये तरंगताना दिसली, धाराशीवमधील धक्कादायक घटना](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/11/26/dee005a3fb5a9d0d47aa907e8ccab56f17325957256161063_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Dharashiv crime: घरातील पत्र्याला गळफास घेऊन एका महिलेने आत्महत्या केली असून घरातील पाण्याच्या बॅरलमध्ये तिच्या दोन्हीही लहान मुलांचा मृतदेह सापडल्याची धक्कादायक घटना धाराशिव जिल्ह्यात घडली आहे. 24 नोव्हेंबरला सायंकाळी ही घटना घडल्याचं सांगितलं जातंय. तुळजापूर तालुक्यातील घट्टेवाडी येथील खळबळजळ घटना घडल्यानंतर पोलिसांनी आकस्मित मृत्यूची नोंद केली आहे. घटना उघडकीस आली तेव्हा दोन छोट्या बाळांचे मृतदेह पाण्यात तरंगताना दिसले. तसेच या दोन्ही बाळांची आई गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळल्याने मोठी खळबळ उडाली होती. मृत्यूचं कारण अद्याप अस्पष्ट असून पोलिसांकडून तपास सुरू आहे.
श्रेया घट्टे, श्रेयस घट्टे अशी या बाळांची नावे असून अवघ्या काही महिन्यांची ही लहानगी होती. राधिका घट्टे (२५) मृत महिलेचे नाव आहे. एकाच घरातील तिघांच्या मृत्यूने परिसरात गोंधळाचे वातावरण असून दोन्ही बाळांना मृत अवस्थेत आणि आईस गळफास घेतलेल्या अवस्थेत पाहून हळहळ व्यक्त केली जात आहे.
नक्की घडले काय?
धाराशिवमधील तुळजापूर तालुक्यातील घट्टेवाडी येथे 25 वर्षीय महिला गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळली. घरातील पाण्याच्या बॅरलमध्ये दोन व पाच महिन्यांची तिची दोन्ही बाळांचे मृतदेह तरंगताना आढळले. घटना उघडकीस आल्यानंतर परिसरात मोठी खळबळ उडाली होती. घटनेची माहिती मिळताच, स्थानिक पोलिसांना घटनेची खबर देण्यात आली. घटनास्थळी पोलिसांचा तपास सुरू असून अध्याप मृत्यूचे कारण अस्पष्ट आहे. घरातील पत्र्याच्या अडूला दोरीने गळफास घेत महिलेने आत्महत्या केल्याची फिर्याद मृत महिलेच्या दिराने नळदुर्ग पोलिसांना दिली. त्यानंतर पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. प्राथमिक आरोग्य केंद्रात महिला व दोन्ही बाळांच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले. एकाच घरातील तिघांचा अशाप्रकारे मृत्यू झाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. घटनेचा तपास सुरू आहे
.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)