Eknath Shinde Submits Resignation to Governer : मुख्यमंत्री पदाचा एकनाथ शिंदेंकडून राजीनामा! फडणवीस-अजित पवार राजभवनात उपस्थित
Eknath Shinde Submits Resignation to Governer : मुख्यमंत्री पदाचा एकनाथ शिंदेंकडून राजीनामा! फडणवीस-अजित पवार राजभवनात उपस्थित
Eknath Shinde Resigned मुंबई: एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत राज्यपाल सी.पी.राधाकृष्णन यांच्याकडे एकनाथ शिंदेंनी आज राजीनामा (Eknath Shinde Resigned) सुपूर्द केला. तर शपथविधीपर्यंत काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून काम पाहण्याची राज्यपालांची एकनाथ शिंदेंना सूचना केली आहे. महाराष्ट्र विधानसभेचा कार्यकाळ आज संपत असल्याने एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला. मुख्यमंत्र्यांचा राजीनामा हा संपूर्ण मंत्रिमंडळाचा राजीनामा असतो. त्यामुळे मुख्यमंत्री यांनी राजीनामा दिल्यानंतर सर्व मंत्रीमंडळाचा राजीनामा घटनेनुसार मानला जातो.
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक निकाल 2024 (Maharashtra Vidhan Sabha Election 2024) जाहीर झाला आहे. महाराष्ट्रातील मतदारांनी भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी यांच्या महायुतीला एकतर्फी बहुमत दिलं आहे. महायुतीने 236 जागांवर विजय मिळवला. विधानसभेच्या निकालानंतर आता मुख्यमंत्री कोणा होणार, याची चर्चा रंगली आहे. याचदरम्यान भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने देवेंद्र फडणवीस यांचं नाव मुख्यमंत्रिपदासाठी निश्चित केल्याचं सूत्रांच्या हवाल्यानं सांगण्यात येत आहे.
30 जून 2022 रोजी मुख्यमंत्रिपदाची घेतली होती शपथ-
शिवसेना पक्षातील ऐतिहासिक फुटीनंतर एकनाथ शिंदे हे शिवसेनेच्या 40 आमदारांना सोबत घेऊन सत्तेत सामील झाले होते. 20 जून रोजी विधानपरिषदेची निवडणूक पार पडल्यानंतर शिंदे नॉट रिचेबल झाले होते. विधानसभेतून ठाणे, मग सुरत, त्यानंतर गुवाहाटी असा प्रवास करत ते मुंबईत परतले होते. यानंतर त्यांनी उपमुख्यमंत्रीपद मिळेल, अशी चर्चा सुरु असताना महायुतीने एकनाथ शिंदे यांना अचानक मुख्यमंत्रीपदी बसवत सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला होता. एकनाथ शिंदे यांनी 30 जून 2022 रोजी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली होती.