लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या प्रेयसीची हत्या करून पुरलं; 10 महिन्यांनी थेट जंगलात सांगाडाच सापडला
Crime News: लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या एका महिलेची तिच्या प्रेयसीनं हत्या केल्याचं समोर आलं आहे. त्यानंतर प्रेयसीनं महिलेचा मृतदेह जवळच असलेल्या जंगलात पुरला.
Crime News Updates: दिल्लीतील श्रद्धा वालावलकर हत्याकांडानंतर (Shraddha Walavalkar Case) संपूर्ण देश हादरला. मुळची मुंबईची असलेल्या श्रद्धाला तिच्या लिव्ह इन पार्टनरनं (Live In Relationship) तुकडे तुकडे करुन मारलं. तेव्हापासूनच लिव्ह इन रिलेशनशिपबाबत अनेक प्रश्न उपस्थित केले जात होते. अशातच आता पुन्हा एकदा देश हादरवणारं आणखी एक प्रकरण समोर आलं आहे. छत्तीसगडमधील सूरजपूर जिल्ह्यात लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या एका महिलेची तिच्या प्रेयसीनं हत्या केल्याचं समोर आलं आहे. त्यानंतर प्रेयसीनं महिलेचा मृतदेह जवळच असलेल्या जंगलात पुरला. पण, अखेर 10 महिन्यांनी ही बाब समोर आली आहे. त्यानंतर पोलिसांनी आरोपी प्रेयसीला ताब्यात घेऊन तिनं दाखवलेल्या घटनास्थळावरुन महिलेच्या मृतदेहाचा सांगाडा ताब्यात घेतला.
छत्तीसगढमध्ये राहणारी 35 वर्षांची महिला सीमा पांडो तिच्याच गावातील चंद्रिका प्रसाद राजवाडेसोबत लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत होती. काही दिवसांनी सीमा अचानक बेपत्ता झाल्याची माहिती मिळताच मृत महिलेच्या वडिलांनी खरगवण पोलीस ठाण्यात सीमा बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली. पोलिसांना महिलेची लिव्ह इन पार्टनर चंद्रिका राजवाडे हिच्यावर संशय आला आणि त्यांनी तिला ताब्यात घेऊन चौकशी केली. त्यानंतर तिनं सीमा पांडोची हत्या करून मृतदेह जंगलात पुरल्याचं समोर आलं. अनैतिक संबंधाच्या संशयावरून प्रेयसीनं हा गुन्हा केल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.
मृत महिलेचे वडीलही सात महिन्यांपासून बेपत्ता
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सिमा पांडो नावाची महिला तब्बल 10 महिन्यांपासून बेपत्ता होती. तिच्याच लिव्ह इन पार्टनरनं तिची हत्या केल्याचं समोर आलं आहे. पोलिसांनी आरोपी प्रेयसीला ताब्यात घेतलं असून तिनं सांगितलेल्या घटनास्थळावरुन मृतदेहाचा सांगाडा ताब्यात घेतला आहे. सापडलेला सांगाडा पोस्टमार्टमसाठी पाठवण्यात आला.
सीमा पांडो नावाची महिला 10 महिन्यांपासून बेपत्ता होती पोलिसांनी सांगितलं आहे. तिच्या लिव्ह-इन पार्टनरच्या सांगण्यावरून मृतदेहाचा सांगाडा बाहेर काढून पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आला. एवढंच नाही तर सीमा पांडोचे वडील सोहरलाल पांडो यांनी चंद्रिका प्रसादवर गुन्हा दाखल केल्यापासून बेपत्ता आहेत. सध्या पोलिसांकडून त्यांचाही शोध घेतला जात आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :