एक्स्प्लोर

Gadchiroli News:  आणि घडले माणुसकीचे दर्शन, ज्यांना मारण्याचा होता कट त्यांनीच वाचवला जीव, नेमकं काय घडलं?

Gadchiroli News:  छत्तीसगढ राज्याच्या कांकेर जिल्ह्यातील बारगाव परिसरात नक्षलवादी आणि BSFच्या जवानांमध्ये शुक्रवारी रात्री चमकमक झाली. यामध्ये एक नक्षली महिला तर दोन जवान जखमी झाले आहेत.

Gadchiroli News:  छत्तीसगढ राज्याच्या कांकेर जिल्ह्यातील बारगाव परिसरात 26 मे रोजी रात्री BSF जवान आणि नक्षलवाद्यांमध्ये (naxalite) मोठी चकमक झाली. या चकमकीत एक महिला नक्षलवादी गंभीर जखमी झाली,  तर दोन लष्कराचे जवान देखील जखमी झाले. मात्र यादरम्यान जखमी झालेल्या त्या नक्षली महिलेचे प्राण लष्कराच्या जवानांनी वाचवले आहेत. लष्कराचे जवान या महिलेसाठी देवदूत बनून गेल्याचं चित्र यावेळी पाहायला मिळालं. ज्यावेळी ती महिला जखमी झाली त्यावेळी तिचा नवरा आणि तिचे साथीदार तिला सोडून गेले. मात्र ज्या जवनांना मारण्याचा कट या नक्षलवाद्यांनी रचला होता त्याच लष्कराच्या जवांनांनी मदतीचा हात पुढे करत माणुसकीचे दर्शन घडवून दिले आहे. 

नेमकं काय घडलं?

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, बीएसएफ जवानांची एक तुकडी नक्षलवाद्यांच्या तळावर गेली होती.  उपंजूर गावाजवळ नक्षलवाद्यांनी जवानांवर हल्ला केला. तेव्हा जवानांनी देखील नक्षलवाद्यांना चोख प्रत्युत्तर दिल्याने नक्षलवाद्यांनी मात्र तेथून पळ काढला. रात्रभर शोधमोहिम केल्यानंतर आणि परिसरात गस्त घातल्यानंतर जवान नक्षलवाद्यांच्या तळावर पोहचले.  तेव्हा डीआरजीने देखील शोधमोहीम राबवली. त्यावेळी एक नक्षलवादी महिला जखमी अवस्थेत आढळून आली. ती जखमी अवस्थेत असल्याने तिच्यावर तात्काळ उपचार करण्याची  गरज होती.  जवानांनी कुठलाही विलंब न करता तिला खाटेच्या साहाय्याने खांद्यावर उचलून घेतले. जंगलातून वाट काढत जवानांनी तिला गाडीपर्यंत आणले. त्यानंतर बीएसएफच्या जवानांनी तिच्यावर गाडीतच उपचार करण्यास सुरुवात केली.

नक्षलवाद्यांनी जवानांवर हल्ला करण्याचा कट रचला. त्यावेळी झालेल्या गोळीबारात ती महिलाच जखमी झाली होती. त्यावेळी तिच्या नवऱ्याने आणि इतर साथीदारांनी देखील तिची साथ सोडली. त्यावेळेस तिला एकटं पाडून या सर्वांनी तिथून पळ काढला. परंतु जवानांनी तिला मदतीचा हात देत तिच्यावर योग्य ते उपचार देखील केले. 

जखमी नक्षली महिलेने पोलिसांना सांगितले की,  नक्षल कमांडर आणि तिचा पती विनोद गावडे हे देखील चकमकीच्या वेळी उपस्थित होते. तिला गोळी लागली तेव्हा तिचा नवरा त्यांच्या साथीदारांसह तिला तिथेच सोडून पळून गेला. त्यांनी तिच्याकडून तिची रायफल देखील हिसकावून घेतली.  पोलीस आता त्या महिलेवर उपचार करत असून, चौकशीदरम्यान पोलिसांना महत्त्वाची माहिती मिळण्याची शक्यता आहे.

या चकमकीदरम्यान दोन जवान देखील जखमी झाले. या जवानांना चांगल्या उपचारांसाठी रायपूरला पाठवण्यात आले आहे. या ठिकाणाहून  मोठ्या प्रमाणात नक्षल साहित्य देखील जप्त करण्यात आले आहे.  पोलीस अधीक्षक शलभ सिन्हा यांनी सांगितले की, 'नक्षल कमांडर विनोदसह दोन ते तीन नक्षलवादी चकमकीत जखमी झाल्याची माहिती आहे. तसेच जवानांचे पथक अजूनही या परिसरात शोध मोहीम करत आहे.  गावाजवळच्या जंगलात ते एका घरात होते आणि त्यांनी घराजवळून जवानांवर हल्ला केला होता.'

महत्त्वाच्या इतर बातम्या :

Pune Crime News : दादागिरी कधी थांबणार? मित्राच्या खिशातून न विचारता मोबाईल काढला, मित्रानेच दगडाने ठेचून केली हत्या

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Saif Ali Khan : गंभीर जखमी झालेला सैफ अली खान सहा दिवसात फिट कसा? काय आहे सैफच्या फिटनेसचं रहस्य? 
गंभीर जखमी झालेला सैफ अली खान सहा दिवसात फिट कसा? काय आहे सैफच्या फिटनेसचं रहस्य? 
Jalgaon Train Accident : जळगाव रेल्वे अपघातात 13 मृत्यू, अपघात नेमका कसा घडला? त्याला कोण जबाबदार? 
जळगाव रेल्वे अपघातात 13 मृत्यू, अपघात नेमका कसा घडला? त्याला कोण जबाबदार? 
'छावा'चा दमदार ट्रेलर; विकी कौशल संभाजी महाराज, रश्मिका महाराणी येसूबाई, औरगजेबच्या भूमिकेत खन्ना, पाहा फोटो
'छावा'चा दमदार ट्रेलर; विकी कौशल संभाजी महाराज, रश्मिका महाराणी येसूबाई, औरगजेबच्या भूमिकेत खन्ना, पाहा फोटो
कुठल्याही रस्त्यावर चक्कर मारा, अख्खा चेहरा धुळीने माखणार; म्हणे, जगात जर्मनी अन् भारतात परभणी
कुठल्याही रस्त्यावर चक्कर मारा, अख्खा चेहरा धुळीने माखणार; म्हणे, जगात जर्मनी अन् भारतात परभणी
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 11 PM : एबीपी माझा हेडलाईन्स : 22 Jan 2025 : ABP MajhaCentral Department On Bangladeshiबांगलादेशी घुसखोरांविरोधात कठोर कारवाईचे महाराष्ट्र सरकारला आदेशBird flu Maharashtra | राज्यात बर्ड फ्ल्यूने पोल्ट्री व्यावसायिकांचं वाढवलं टेंशन Special ReportSpecial Report Walmik Karadवाल्मिक कराडला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी; न्यायालयीन कोठडीचा अर्थ काय?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Saif Ali Khan : गंभीर जखमी झालेला सैफ अली खान सहा दिवसात फिट कसा? काय आहे सैफच्या फिटनेसचं रहस्य? 
गंभीर जखमी झालेला सैफ अली खान सहा दिवसात फिट कसा? काय आहे सैफच्या फिटनेसचं रहस्य? 
Jalgaon Train Accident : जळगाव रेल्वे अपघातात 13 मृत्यू, अपघात नेमका कसा घडला? त्याला कोण जबाबदार? 
जळगाव रेल्वे अपघातात 13 मृत्यू, अपघात नेमका कसा घडला? त्याला कोण जबाबदार? 
'छावा'चा दमदार ट्रेलर; विकी कौशल संभाजी महाराज, रश्मिका महाराणी येसूबाई, औरगजेबच्या भूमिकेत खन्ना, पाहा फोटो
'छावा'चा दमदार ट्रेलर; विकी कौशल संभाजी महाराज, रश्मिका महाराणी येसूबाई, औरगजेबच्या भूमिकेत खन्ना, पाहा फोटो
कुठल्याही रस्त्यावर चक्कर मारा, अख्खा चेहरा धुळीने माखणार; म्हणे, जगात जर्मनी अन् भारतात परभणी
कुठल्याही रस्त्यावर चक्कर मारा, अख्खा चेहरा धुळीने माखणार; म्हणे, जगात जर्मनी अन् भारतात परभणी
Jalgaon Train Accident : जळगावमध्ये मोठी रेल्वे दुर्घटना, आगीच्या भीतीने प्रवाशांनी उड्या मारल्या, दुसऱ्या ट्रेनने सात ते आठ लोकांना चिरडले
जळगावमध्ये मोठी रेल्वे दुर्घटना, आगीच्या भीतीने प्रवाशांनी उड्या मारल्या, दुसऱ्या ट्रेनने सात ते आठ लोकांना चिरडले
लाडक्या बहिणीचे पैसे परत घेतले तर याद राखा, गाठ आमच्याशी; खडसेंची आदिती तटकरेंवर बोचरी टीका
लाडक्या बहिणीचे पैसे परत घेतले तर याद राखा, गाठ आमच्याशी; खडसेंची आदिती तटकरेंवर बोचरी टीका
Jalgaon train accident अफवेनं घात केला, क्षणात होत्याचं नव्हतं झालं; जळगाव रेल्वे अपघाताने 8 ते 9 कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर
अफवेनं घात केला, क्षणात होत्याचं नव्हतं झालं; जळगाव रेल्वे अपघाताने 8 ते 9 कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर
बांगलादेशी घुसखोरांविरोधात केंद्रीय गृहमंत्रालयाकडून दखल; मुख्य सचिव, पोलीस महासंचालकांना कारवाईचे निर्देश
बांगलादेशी घुसखोरांविरोधात केंद्रीय गृहमंत्रालयाकडून मोठा निर्णय; मुख्य सचिव, पोलीस महासंचालकांना लेखी निर्देश
Embed widget