एक्स्प्लोर
कृषी विमा लाटण्यासाठी बोगसगिरी, 178 कोटी रुपये रोखले

उस्मानाबाद : सरकारने दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी राष्ट्रीय कृषी विम्याची योजना सुरु केली खरी, मात्र योजनेचे फायदे पदरात पाडून घेण्यासाठी अनेकांनी बनावट दस्तावेज दाखवल्याचं उघड झालं आहे. त्यामुळे राज्यातील 5 लाख 7 हजरा 656 शेतकऱ्यांची 178 कोटी 39 लाख रुपयांची विमा रक्कम रोखण्यात आली आहे. यामध्ये बीड जिल्ह्यातील सर्वाधिक साडे चार लाख शेतकऱ्यांचा समावेश आहे. त्या खालोखाल 23 हजार 108 शेतकऱ्यांचा समावेश असलेल्या उस्मानाबादचा नंबर आहे. अनेकांनी शेतजमीन नसतानाही विम्याचे पैसे भरले आहेत. तर काही महाभागांनी असलेल्या क्षेत्रापेक्षा जास्त क्षेत्र दाखलं आहे. काही ठगांनी तर एकाच क्षेत्राची नोंदणी अनेक बँकांमध्ये केली आहे. त्यामुळे आता गावनिहाय तपासणी सुरु झाली आहे.
आणखी वाचा























