एक्स्प्लोर

नांदेडमध्ये दोन आयएएस अधिकाऱ्यांसह सहा अधिकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल

हा गुन्हा अत्यंत गंभीर स्वरूपाचा असल्याने स्वतः डीवायएसपी अभिजित फस्के या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. आज हा गुन्हा दाखल झाल्यानंतर नांदेडच्या जिल्हापरिषदेत खळबळ उडाली असून परिसरात शुकशुकाट पसरला होता.

नांदेड : नांदेडच्या जिल्हा परिषदेच्या एकूण सहा बड्या अधिकाऱ्यावर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. जिल्हा परिषदेचे दोन सीईओ आणि अन्य चार अधिकाऱ्यांवर हे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. विभागीय आयुक्तांच्या परवानगीने गटशिक्षणाधिकारी परमेश्वर गोणारे यांच्या तक्रारीनंतर हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. खोटी कागदपत्रे तयार करून ती खरी असल्याचे दाखवण्यात आल्याचे या प्रकरणात उघड झालं आहे. याप्रकरणी गटशिक्षणाधिकारी गोणारे यांच्या तक्रारीवरून वजीराबाद पोलिसांनी दाखल केला आहे. हा गुन्हा अत्यंत गंभीर स्वरूपाचा असल्याने स्वतः डीवायएसपी अभिजित फस्के या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. आज हा गुन्हा दाखल झाल्यानंतर नांदेडच्या जिल्हापरिषदेत खळबळ उडाली असून परिसरात शुकशुकाट पसरला होता. माहितीनुसार, नांदेड जिल्हा परिषदेत कार्यरत असलेल्या तत्कालीन दोन आयएएस अधिकाऱ्यांसह एकूण सहा अधिकाऱ्यांच्या विरोधात नांदेडच्या वजिराबाद पोलीस स्थानकात विविध कलमान्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. नांदेड जिल्हा परिषदेअंतर्गत परमेश्वर गोणारे हे शिक्षण विस्तार अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. 2015-2016 साली शहरातील फैजल उलूम प्राथमिक  उर्दू शाळेत शालेय पोषण आहार देण्यात आला होता. शिक्षण विस्तार अधिकाऱ्याने वेळोवेळी शाळेला भेटी देऊन शालेय पोषण आहार अन विद्यार्थ्यांची उपस्थिती तपासणे आवश्यक असते. हा विभाग परमेश्वर गोणारे यांच्या कार्यक्षेत्रात येतो. गोणारे यांनी फैजल उलूम उर्दू प्राथमिक शाळेला वेळोवेळी भेटी देऊन तपासणी केली नाही. त्यामुळे पोषण आहारात काही अनियमितता झाल्याचा आरोप करत गोणारे यांच्याकडून 50 हजार रुपये वसुलीची नोटीस काढण्यात आली. हा प्रकार तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी अभिमन्यू काळे यांच्या कार्यकाळात झाला. पुढे त्यांची बदली झाली आणि त्यांच्या जागेवर अशोक शिनगारे रुजू झाले. दरम्यान गोणारे यांनी आर्थिक दंड वसुलीच्या नोटिसीला अप्पर विभागीय आयुक्तांकडे अपील केले. शिनगारे यांनी खोटी माहिती असलेली कागदपत्रे या अपिलाच्या बचावात दाखल केली. या खोट्या कागदपत्रांवरून गोणारे यांचे अपील नामंजूर करून गोणारे यांच्या विरोधात गुन्हा नोंदवण्याचे मत नोंदवले. यावर गोणारे यांनी पुनर्विलोकन याचिका अप्पर विभागीय आयुक्तांच्या न्यायालयात दाखल केली. यावर सुनावणी करताना अप्पर विभागीय आयुक्तांनी गोणारे यांना दोषमुक्त करून आयएएस अधिकारी अभिमन्यू काळे, अशोक शिनगारे, तत्कालीन शिक्षण अधिकारी संदीप सोनटक्के, उपशिक्षण अधिकारी शिवाजी खुडे, शालेय पोषण आहार लेखाधिकारी पटेल, कारकून तर्के यांच्या विरोधात गुन्हे दाखल करण्याची विनंती मान्य केली. या प्रकरणी परमेश्वर गोणारे यांच्या तक्रारीवरून वजिराबाद पोलीस स्थानकात उपरोक्त अधिकाऱ्यांविरोधात भारतीय दंड संहितेच्या विविध कलमांसह अॅट्रॉसिटी अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन तपस पोलीस उपाधीक्षक अभिजित फस्के हे करत आहेत.

महत्त्वाच्या बातम्या

500 रुपयांपासून सुरुवात! आज 5 कोटी रुपयांचा व्यवसाय, संघर्षातून घडलेल्या महिलेची यशोगाथा 
500 रुपयांपासून सुरुवात! आज 5 कोटी रुपयांचा व्यवसाय, संघर्षातून घडलेल्या महिलेची यशोगाथा 
रेती माफियांच्या हैदोस! वाहतुकीस विरोध करणाऱ्या शेतकऱ्या अंगावर घातला डंपर, शेतकऱ्याचा मृत्यू, विधानभवनात मंत्र्यांना जाब विचारणार असल्याची आमदार अनिल पाटलांची माहिती 
रेती माफियांच्या हैदोस! वाहतुकीस विरोध करणाऱ्या शेतकऱ्या अंगावर घातला डंपर, शेतकऱ्याचा मृत्यू, विधानभवनात मंत्र्यांना जाब विचारणार असल्याची आमदार अनिल पाटलांची माहिती 
देशातील सर्वोतकृष्ट मुख्यमंत्री कोण? योगी आदित्यनाथ ते देवेंद्र फडणवीस? सर्वेक्षणातून महत्वाची माहिती समोर 
देशातील सर्वोतकृष्ट मुख्यमंत्री कोण? योगी आदित्यनाथ ते देवेंद्र फडणवीस? सर्वेक्षणातून महत्वाची माहिती समोर 
अर्णबनंतर आता बंगालच्या उपसागरात मुरासू चक्रीवादळ तयार; 3 नोव्हेंबरला आंध्र किनारपट्टीवर धडकणार; एका आठवड्यात दुसरं चक्रीवादळ
अर्णबनंतर आता बंगालच्या उपसागरात मुरासू चक्रीवादळ तयार; 3 नोव्हेंबरला आंध्र किनारपट्टीवर धडकणार; एका आठवड्यात दुसरं चक्रीवादळ

व्हिडीओ

Coffee With Kaushik Sandeep Tamgadge : चीनची घुसखोरी ते म्यानमारमधील तस्करी, भिडणारा अधिकारी
India Alliance Vs BJP : 'इंडिया' आघाडीचा महामोर्चा, भाजपच्या देशभरात पदयात्रा Special Report
Inflation Diwali : दिवाळीपूर्वीच महागाईचा दणका...CNG चे दर वाढले, जेट इंधनातही भाववाढ Special Report
Sanjay Raut Delhi PC : रावणलीला' संपवण्यासाठीच रामलीला मैदानावर आंदोलन! संजय राऊतांचा घणाघात
Mann Suddha Tujha Season 3 : सोबत | मन सुद्ध तुझं | Episode 5 | ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
अर्णबनंतर आता बंगालच्या उपसागरात मुरासू चक्रीवादळ तयार; 3 नोव्हेंबरला आंध्र किनारपट्टीवर धडकणार; एका आठवड्यात दुसरं चक्रीवादळ
अर्णबनंतर आता बंगालच्या उपसागरात मुरासू चक्रीवादळ तयार; 3 नोव्हेंबरला आंध्र किनारपट्टीवर धडकणार; एका आठवड्यात दुसरं चक्रीवादळ
EPFOची व्हॉट्सॲप सेवा सुरू, पीएफ बॅलन्स पासबुक अन् 5 नवीन व्यवहारांपर्यंतची माहिती उपलब्ध होणार
EPFOची व्हॉट्सॲप सेवा सुरू, पीएफ बॅलन्स पासबुक अन् 5 नवीन व्यवहारांपर्यंतची माहिती उपलब्ध होणार
अनाथ, दिव्यांग अन् वृ्द्धांसाठी रिलायन्सकडून मायेचा निवारा; कर्जतमध्ये 100 एकरवर 'अनंत आश्रय' टाऊनशीप, नीता अंबानींची घोषणा
अनाथ, दिव्यांग अन् वृ्द्धांसाठी रिलायन्सकडून मायेचा निवारा; कर्जतमध्ये 100 एकरवर 'अनंत आश्रय' टाऊनशीप, नीता अंबानींची घोषणा
हिंजवडी आयटी पार्क परिसरात पावसाची जोरदार हजेरी, रस्ते जलमय
हिंजवडी आयटी पार्क परिसरात पावसाची जोरदार हजेरी, रस्ते जलमय
Mumbai Accident: रेल्वे, बेस्ट ते रस्त्यांपर्यंत, मुंबईत चिरडून मरणं अगदी स्वस्त झालंय; कांदिवलीत फक्त 30 मिनिटात रस्त्यावरील ऑईलमुळे 14 दुचाकी फरफटत गेल्या, अनेक जखमी
रेल्वे, बेस्ट ते रस्त्यांपर्यंत, मुंबईत चिरडून मरणं अगदी स्वस्त झालंय; कांदिवलीत फक्त 30 मिनिटात रस्त्यावरील ऑईलमुळे 14 दुचाकी फरफटत गेल्या, अनेक जखमी
शरद पवार शेतकऱ्यांच्या बांधावर, तुळशी गावात भेट; 50 लाखांची मदतही दिली, दुष्काळ परिस्थितीबाबत मोदींना सांगणार
शरद पवार शेतकऱ्यांच्या बांधावर, तुळशी गावात भेट; 50 लाखांची मदतही दिली, दुष्काळ परिस्थितीबाबत मोदींना सांगणार
Satara Bank Election: सातारा जिल्हा बँक निवडणुकीत विक्रमी 97.92 टक्के मतदान; कोरेगाव, खंडाळा आणि वाईमध्ये 100 टक्के प्रतिसाद
सातारा जिल्हा बँक निवडणुकीत विक्रमी 97.92 टक्के मतदान; कोरेगाव, खंडाळा आणि वाईमध्ये 100 टक्के प्रतिसाद
वेतनवाढीच्या मागणीसाठी बांगलादेशात वस्त्रोद्योग कामगारांचे आंदोलन, तीन ठिकाणी हिंसाचार; आंदोलकांची पोलिसांवर दगडफेक, वाहने जाळली
वेतनवाढीच्या मागणीसाठी बांगलादेशात वस्त्रोद्योग कामगारांचे आंदोलन, तीन ठिकाणी हिंसाचार; आंदोलकांची पोलिसांवर दगडफेक, वाहने जाळली
Embed widget