एक्स्प्लोर
शेतकरी संपाचा दिल्लीत आवाज, शरद पवार मोदींच्या भेटीला!

संग्रहित फोटो
नवी दिल्ली: राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. महाराष्ट्रातील शेतकरी संप आणि कर्जमाफीच्या मुद्द्यावरुन ही भेट घेतल्याचं कळतंय. सत्ताधारी पक्षाने तेही केंद्र आणि राज्य अशा दोन्हीमध्ये सत्तेत असलेल्या पक्षाने एका राज्यात कर्जमाफीचा निर्णय घेतल्यावर इतर राज्यात मागणी होणं साहजिक आहे, असं शरद पवार मोदींना म्हणाले. तसंच महाराष्ट्रातलं शेतकरी आंदोलन हे राजकीय आंदोलन नसल्याचंही पवारांनी नमूद केलं. केंद्राचे हात वर पंतप्रधान मोदींनी शरद पवारांचं म्हणणं ऐकून घेतलं, पण केंद्रानं याबाबतीत पुन्हा हात वर केले. हा निर्णय राज्यांनीच करायचा ही भूमिका कायम असल्याचं केंद्राने स्पष्ट केलं. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या कोर्टात बॉल टोलवल्याचं चित्र आहे. पवार मोदींना नेमकं काय म्हणाले?
- "देशभरात दरवर्षी 12 हजार आत्महत्या होतात अशी सरकारची सुप्रीम कोर्टातील आकडेवारी सांगते. महाराष्ट्र, तेलंगणा, कर्नाटक या तीन राज्यांत ही आकडेवारी सगळ्यात जास्त आहे. या तीन राज्यांमध्ये कर्जमाफीची गरज जास्त आहे. म्हणून तुम्ही हा प्रश्न गांभीर्याने घ्या"- शरद पवार
- "ज्या मागण्यांसाठी विरोधात असताना तुम्ही आंदोलन करत होता, त्याच मागण्यांसाठी शेतकरी उद्वेग करत रस्त्यावर आला, तर त्यासाठी पोलीस बळ वापरण्याची काय गरज. हे गुन्हे तातडीनं मागे घ्यावेत" - शरद पवार
आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
विश्व
निवडणूक
व्यापार-उद्योग























