एक्स्प्लोर

शेतकऱ्यांचा महाराष्ट्र बंद, दिवसभरात कुठे काय घडलं?

मुंबई : शेतकरी संपाच्या पाचव्या दिवशी शेतकऱ्यांनी आक्रमक होत महाराष्ट्र बंदची हाक दिली. या महाराष्ट्र बंदला राज्यभरातून उत्स्फुर्त प्रतिसाद पाहायला मिळाला. राज्यातील बहुतांश भागांमध्ये कडकडीत बंद पाळण्यात आला. राज्यभरात विविध शेतकरी संघटनांकडून आंदोलनं करण्यात आली. यामध्ये काही ठिकाणी राजकीय पक्षांचाही शिरकाव दिसून आला. अनेक राजकीय कार्यकर्त्यांनी आंदोलनं केल्याच्या घटना घडल्या. दिवसभरात कुठे काय घडलं? सोलापूर – अखिल भारतीय किसान सभेकडून दक्षिण तहसील कार्यालयात आंदोलन करण्यात आलं. शेतकऱ्यांच्या मागण्यांची दखल घेण्यासाटी यावेळी कार्यकर्त्यांनी तहसील कार्यालयात घुसून गोंधळ घातला. नागपूर - शेतकरी संपादरम्यान रामटेक बंदला काहीसं हिंसक वळण मिळालं. दुकानं बंद करण्याच्या मुद्द्यावर शिवसेना-भाजप कार्यकर्त्यांमध्ये यावेळी बाचाबाची झाली. मात्र पोलिसांनी वेळीच जमाव पांगवला. मुंबई : ही शेतकरी लढ्याची सुरुवात आहे, उद्धव ठाकरे यांचा संपाला पूर्ण पाठिंबा आहे, शेवटची मागणी मान्य होईपर्यंत शिवसेना शेतकऱ्यांसोबत आहे, असं म्हणत शिवसेनेने शेतकऱ्यांच्या संपाला पाठिंबा दिला. सरकारला पाठिंबा दिल्याचा पश्चाताप होतोय, लवकरच राज्य कार्यकारिणीची बैठक घेऊन सरकारमधून बाहेर पडण्याचा विचार करु, असं वक्तव्य स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी यांनी केलं. कर्जमाफी, हमीभावाबाबत सरकार सकारात्मक आहे. संप मागे घ्या, असं आवाहन सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी केलं. सोलापूर - आंदोलक आणि पोलिसात बाचाबाची झाल्याची घटना घडली. सोलापूर -पुणे महामार्गावर आंदोलन करण्यास पोलिसांनी मज्जाव केला. त्यामुळे आंदोलक आक्रमक झाले. नाशिक - बंदचं आवाहन करणाऱ्या 50 शिवसैनिकांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. मेनरोड, शालिमार, सीबीएस परिसरात बंद करण्यासाठी शिवसैनिक फिरत होते. सोलापूर -पुणे महामार्गावर लांबोटीजवळ रास्ता रोको करुन शेतकऱ्यांनी महामार्ग अडवला लातूर- निलंगा शहरात 100 टक्के बंद पाळण्यात आला. शेतकरी आंदोलनाची 21 जणांची नवी सुकाणू समिती जाहीर करण्यात आली. 1. राजू शेट्टी 2. अजित नवले 3. रघुनाथदादा पाटील 4. संतोष वाडेकर 5. संजय पाटील 6. बच्चू कडू, प्रहार 7. विजय जवंधिया 8. राजू देसले 9. गणेश काका जगताप 10. चंद्रकांत बनकर 11. एकनाथ बनकर 12. शिवाजी नाना नानखिले 13. डॉ.बुधाजीराव मुळीक 14. डॉ. गिरीधर पाटील 15. गणेश कदम 16. करण गायकर आणि इतर कोल्हापूर - महामार्ग रोखणाऱ्या 100 हून अधिक शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं नंदुरबार- नवापूर तालुक्यात कडकडीट बंद पाळण्यात आला. कोल्हापूर, सांगली आणि सातारा या जिल्ह्यातील सात दूध संघातून मुंबईकडे टँकर रवाना करण्यात आले. एकूण 27 दुधाचे टँकर असून, पोलिसांच्या पाच वाहनांची सुरक्षा त्यांना देण्यात आली आहे. मुंबईसह नवी मुंबई आणि अन्य भागात हे दूध दुपारपर्यंत पोहचविण्यात येणार आहे. पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावरून निघालेल्या दूध टँकरला झेड सुरक्षा देण्यात आली. पोलिसांच्या ताफ्यात दुधाचे टँकर मुंबईच्या दिशेने रवाना करण्यात आले. हिंगोली - शेतकरी कर्जमाफीसाठी हिंगोली येथे मराठा शिवसैनिक सेनेच्यावतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं. तात्काळ कर्जमाफी करावी,स्वामीनाथन आयोगाच्या शिफारसी लागू कराव्यात, अशा मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आले. यावेळी संतापलेल्या शेतकाऱ्यांनी रिसाला बाजार येथे रस्त्यावर दूध आणि टोमेटो फेकून सरकारचा निषेध केला. कोल्हापूर- वडगावात तीव्र आंदोलन करण्यात आलं. शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांची व्यापाऱ्यांशी झटापट झाली. महाराष्ट्र बंद असताना व्यापार सुरु ठेवल्याने कार्यकर्ते आक्रमक झाले. पुणे- शिरुर तालुक्यातील वडगाव रासाई,मांडवगण फराटा,ईनामगाव या गावांतील आठवडी बाजार आणि बाजारपेठा बंद होत्या. नाशिक : अंबासन फाट्यावर मालेगाव सुरत महामार्गावर शेतकऱ्यांनी रास्ता रोको केला. महाराष्ट्र बंदची हाक देत शेतीपिकाला हमीभाव आणि कर्जमुक्तीसाठी शेतकरी रस्त्यावर उतरले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांनी कृषीराज्यमंत्री सदाभाऊ खोत यांचा वापर करून शेतकऱ्यांत फूट पाडण्याचा कुटील डाव रचला. शेतकऱ्यावर गुन्हे दाखल करण्याचे काम सुरू केले आहे, असा आरोप शेतकऱ्यांनी केला. याचा निषेध म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आले. तसेच रस्त्यावर टायर टाकत पेटवून दिले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी यावेळी करण्यात आली. एसटी बसेस सुरू असल्याने काही अनुचित प्रकार घडल्यास त्यास शासन जबाबदार राहील असा इशाराही देण्यात आला. नागपूर-तुळजापूर राज्यमार्गावर शेतकऱ्यांनी चक्काजाम केला. यामुळे वाहतूक ठप्प झाली होती. नाशिक : निफाड - चांदवड मार्गावर उगावला शेतकऱ्यांनी बैलगाडीसह रस्त्यावर येत बंदमध्ये सहभाग नोंदविला. नाशिक - शेतकऱ्यांच्या संपाचा आज पाचवा दिवस असून, आज जिल्ह्यातील अनेक ठिकाणी आंदोलन सुरु आहे. येवला तालुक्यातील सायगाव येथील ग्रामस्थांनी गेले चार दिवस विविध आंदोलने केली. आज गावात बंद पाळण्यात येत असून सरकारचा निषेध करत ग्रामस्थांनी कांदा फेक आंदोलन केले. नाशिक - शेतकरी संपाच्या पाचव्या दिवशी चांदवड तालुक्यातील दुगाव येथे बंद पाळण्यात येवून, शेतकरी रस्त्यावर उतरले आहेत. शेतकऱ्यांनी मनमाड-चांदवड रस्त्यावर रास्ता रोको आंदोलन करत, रस्त्यावर दूध आणि कांदा फेकला. अहमदनगर : संगमनेरमधील कोल्हेवाडी शेतकऱ्यांकडून मुख्यमंत्र्यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचं दहन करण्यात आलं. आज लग्नाचे मुहूर्त आहेत, त्यामुळे वाहतुकीस रास्ता रोको करु नका, फक्त कडकडीत बंद पाळा, असं आवाहन खासदार राजू शेट्टी यांनी केलं. कोल्हापूर : महाराष्ट्र बंदमुळे आज सकाळी आणि संध्याकाळी होणारं गोकुळ दूध संघाचं संकलन बंद राहणार. गोकूळ दूध संघात दररोज 11 लाख लिटर दुधाचं संकलन होतं. एसटी चालक वाहकांना एसटी प्रशासनाकडून सूचना : नुकसान होऊ नये म्हणून आंदोलन सुरु असलेल्या ठिकाणापासून काही अंतरावर एसटी बस थांबवावी. परिस्थितीचं गांभीर्य पाहून तात्काळ पोलिसांना तसंच वरिष्ठांना माहिती द्यावी. धुळे : कृषी उत्पन्न बाजार समितीत भाजीपाला विक्री सुरळीत सुरु होती. नाशिक जिल्ह्यातून भाजीपाल्याची मोठी आवक झाल्याने विक्री सुरळीत झाली. नाशिक : मनमाड, मालेगाव, चांदवडमध्ये महाराष्ट्र बंदला उत्तम प्रतिसाद मिळाला. सर्व बाजार समित्या बंद होत्या. नवी मुंबई – वाशी एपीएमसीमध्ये भाजीपाल्याच्या 450 गाड्यांची आवक झाली. पुणे : कात्रज सहकारी दूध संघाचं संकलन स्थानिक पातळीवर होत असलं तरी डेअरीपर्यंत वाहतूक बंद होती. अहमदनगर : ज्या पुणतांब्यात शेतकरी संपाची ठिणगी पडली, त्या पुणतांबाकरांनी संपाला जोरदार पाठिंबा दिला. सकाळपासून पुणतांबा बंद होता.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Pune Car Accident Accused Rap Song : पश्चाताप नाहीच, उलट पैशांचा माज, बिल्डर पुत्रानं म्हटला रॅप
पश्चाताप नाहीच, उलट पैशांचा माज, दोघांना चिरडल्यानंतर बिल्डर पुत्रानं म्हटला रॅप
Pune Car Accident Ketaki Chitale :  पुणे अपघात प्रकरणावर केतकी चितळेचा संताप; पोलिसांचा तो प्लान...
पुणे अपघात प्रकरणावर केतकी चितळेचा संताप; पोलिसांचा तो प्लान...
नाशिकपाठोपाठ नगरमध्ये ठेवींचा अपहार उघड, तब्बल पाच कोटींची फसवणूक, ठेवीदारांचे धाबे दणाणले
नाशिकपाठोपाठ नगरमध्ये ठेवींचा अपहार उघड, तब्बल पाच कोटींची फसवणूक, ठेवीदारांचे धाबे दणाणले
माजोरड्या मुलाचा संतापजनक रॅप, कुठलाही पश्चाताप नाही; व्हिडिओ व्हायरल होताच नेटीझन्स भडकले
माजोरड्या मुलाचा संतापजनक रॅप, कुठलाही पश्चाताप नाही; व्हिडिओ व्हायरल होताच नेटीझन्स भडकले
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

TOP 25 : टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 25 न्यूज : 06 PM : 23 May 2024: ABP MajhaABP Majha Headlines : 06 PM : 23 May 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सPune Car Accident Rap Song : पैसे मेरे बाप के...दोघांना चिरडल्यानंतर आरोपीचं रॅप साँगPune Car Accident Accused Rap Song : पश्चाताप नाहीच, उलट पैशांचा माज, बिल्डर पुत्रानं म्हटला रॅप

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune Car Accident Accused Rap Song : पश्चाताप नाहीच, उलट पैशांचा माज, बिल्डर पुत्रानं म्हटला रॅप
पश्चाताप नाहीच, उलट पैशांचा माज, दोघांना चिरडल्यानंतर बिल्डर पुत्रानं म्हटला रॅप
Pune Car Accident Ketaki Chitale :  पुणे अपघात प्रकरणावर केतकी चितळेचा संताप; पोलिसांचा तो प्लान...
पुणे अपघात प्रकरणावर केतकी चितळेचा संताप; पोलिसांचा तो प्लान...
नाशिकपाठोपाठ नगरमध्ये ठेवींचा अपहार उघड, तब्बल पाच कोटींची फसवणूक, ठेवीदारांचे धाबे दणाणले
नाशिकपाठोपाठ नगरमध्ये ठेवींचा अपहार उघड, तब्बल पाच कोटींची फसवणूक, ठेवीदारांचे धाबे दणाणले
माजोरड्या मुलाचा संतापजनक रॅप, कुठलाही पश्चाताप नाही; व्हिडिओ व्हायरल होताच नेटीझन्स भडकले
माजोरड्या मुलाचा संतापजनक रॅप, कुठलाही पश्चाताप नाही; व्हिडिओ व्हायरल होताच नेटीझन्स भडकले
Nashik News : बंधाऱ्यात पोहण्यासाठी गेलेल्या दोन चुलत भावंडांचा बुडून मृत्यू, एकाच आठवड्यातील तिसऱ्या घटनेनं नाशिक हादरलं
बंधाऱ्यात पोहण्यासाठी गेलेल्या दोन चुलत भावंडांचा बुडून मृत्यू, एकाच आठवड्यातील तिसऱ्या घटनेनं नाशिक हादरलं
बुमराहकडे बर्फाच्या खेळपट्टीवरही भेदक मारा करण्याची क्षमता, ब्रेट लीकडून कौतुकाची थाप
बुमराहकडे बर्फाच्या खेळपट्टीवरही भेदक मारा करण्याची क्षमता, ब्रेट लीकडून कौतुकाची थाप
Laapataa Ladies Animal Movie : किरण रावच्या 'लापता लेडिज'ने संदीप वांगा रेड्डीच्या 'अॅनिमल'ला पछाडले
किरण रावच्या 'लापता लेडिज'ने संदीप वांगा रेड्डीच्या 'अॅनिमल'ला पछाडले
आख्ख्यं गाव उपाशी, दोन दिवसापासून चूल पेटली नाही, उजनी बोट दुर्घटनेनंतर झरे गाव स्तब्ध
आख्ख्यं गाव उपाशी, दोन दिवसापासून चूल पेटली नाही, उजनी बोट दुर्घटनेनंतर झरे गाव स्तब्ध
Embed widget