एक्स्प्लोर
भरत जाधवकडून कोल्हापुरात रोप वाटप उपक्रम

कोल्हापूर: 5 जून हा दिवस जागतिक पर्यावरण दिवस म्हणून साजरा केला जातो. पर्यावरणाचं जतन आणि संवर्धन करण्यासाठी या दिवशी अनेक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात येतं. अभिनेता भरत जाधवनेसुद्धा हा दिवस खास उपक्रमाद्वारे साजरा केला. भरत जाधव हा मूळचा कोल्हापूरचा. त्याच कोल्हापुरात रोपवाटपाचा उपक्रम त्याने राबवला. 'टोमॅटो एफएम'ने हा कार्यक्रम आयोजित केला होता.
त्याने घराघरात जाऊन त्याच्या शेजाऱ्यांना रोपवाटप केलं आणि त्याचं जतन आणि संवर्धन करण्याची विनंतीही केली. भरत जाधवच्या या कौतुकास्पद उपक्रमाला कोल्हापूरकरांनीही चांगला प्रतिसाद दिला.
त्याने घराघरात जाऊन त्याच्या शेजाऱ्यांना रोपवाटप केलं आणि त्याचं जतन आणि संवर्धन करण्याची विनंतीही केली. भरत जाधवच्या या कौतुकास्पद उपक्रमाला कोल्हापूरकरांनीही चांगला प्रतिसाद दिला. आणखी वाचा























