Diabetes Symptoms : मधुमेहाचं नवं धोकादायक लक्षण, जाणवल्यास लगेचच करा तपासणी
Diabetes Warning Signs : तुमच्या तोडांतून दुर्गंधी येत असल्यास हे मधुमेहाचं लक्षण असून शकतं. त्यामुळे याकडे दुर्लक्ष करु नका आणि लक्षण दिसल्यास लगेचच तपासणी करुन घ्या.
Diabetes Symptoms : अलिकडच्या काळात मधुमेहाचा (Diabetes) धोका वाढताना दिसत आहे. भारतातही मधुमेहाच्या रुग्णांमध्ये वाढ होत आहे. मधुमेहाचं लक्षणं ओळखणं फार कठीण होऊ शकतं. आता मधुमेहाचं आणखी एक धोकादायक लक्षण समोर आलं आहे. याकडे सहजा आपण दुर्लक्ष करतो एका संशोधनात दावा करण्यात आला आहे की, तुमच्या तोडांतून दुर्गंधी येत असल्यास हे मधुमेहाचं लक्षण असून शकतं. त्यामुळे याकडे दुर्लक्ष करु नका आणि लक्षण दिसल्यास लगेचच तपासणी करुन घ्या.
मधुमेहाचं नवं धोकादायक लक्षण
मधुमेहाचं या लक्षणाचा संशोधक आणि डॉक्टरांनी आधीच शोध लागला होता. पण बहुतेक जणांना याबाबत माहिती नव्हती. सध्या हे लक्षण चर्चेत आल्यामुळे हे नवं मधुमेहाचं नवीन लक्षण असल्याचं म्हटलं जात आहे. या मधुमेहाच्या या लक्षणाला कीटोअॅसिडोसिस असं म्हटलं जातं.
डायबेटिक कीटोअॅसिडोसिस म्हणजे काय?
डायबेटिक कीटोअॅसिडोसिस ही शरीरातील एक प्रक्रिया आहे. यामध्ये इंसुलिनच्या कमतरतेमुळे रक्तामध्ये हानिकारक केटोन्स तयार होतात. हे मधुमेहाचं असामान्य लक्षण आहे. हे मधुमेहाचं सुरुवातीचं लक्षण असल्याचा दावा केला जात आहे. या दाव्यानुसार, मधुमेहामुळे श्वासाला दुर्गंधी देखील येऊ शकते कारण, या स्थितीमुळे तोंडातील ग्लुकोजचं प्रमाण वाढू शकतं. जीवाणू या साखरेचा अन्न म्हणून वापर करतात ज्यामुळे नंतर संसर्ग आणि हिरड्यांचे आजार होतात. हिरड्यांचा आजार हे हॅलिटोसिसचे सर्वात सामान्य कारणांपैकी एक आहे ज्यामध्ये हॅलिटोसिस होतो.
अत्यंत धोकादायक स्थिती
इन्सुलिन हार्मोन शरीरातील रक्तातील साखर नियंत्रित करते. अमेरिकेच्या रोग नियंत्रण आणि प्रतिबंध केंद्राच्या (CDC) माहितीनुसार, डायबेटिक केटोआसिडोसिस ही एक धोकादायक स्थिती आहे, ही जीवघेणी ठरू शकते. यामध्ये इन्सुलिन खूप कमी होते आणि शरीरात केटोन्स तयार होऊ लागतात. हे केटोन्स शरीरासाठी विषारी असतात. डायबेटिक केटोआसिडोसिसची हे मधुमेहाच्या माहित नसलेल्या लक्षणांपैकी एक आहे. यामुळे केटोन्सची पातळी खूप वाढते आणि श्वासाला दुर्गंधी येऊ लागते.
ताबडतोब डॉक्टरांचा सल्ला घ्या
CDC नुसार, तुम्ही स्वतः केटोन्सची पातळी तपासू शकता. यासाठी तुम्हाला केटोन टेस्ट किट आणावे लागेल. या किटच्या साहाय्याने तुम्ही लघवीद्वारे केटोन्सची पातळी तपासू शकतात. तुमच्या रक्तात केटोन्स जास्त असल्यास आणि श्वासात दुर्गंधी येत असल्यास दुर्लक्ष करु नका, ताबडतोब डॉक्टरांचा सल्ला घ्या.
डायबेटिक केटोआसिडोसिससाठी उपचार
- इन्सुलिन नियंत्रित करण्यासाठी औषध दिले जातात.
- नसा, स्नायू, हृदय आणि मेंदूसाठी लागणारे इलेक्ट्रोलाइट्स वाढवावे लागतात.
- इन्सुलिनची इंजेक्शन्स दिली जाऊ शकतात.
- डायबेटिक केटोअॅसिडोसिसवर औषधे घेतली जाऊ शकतात.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.
Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )