एक्स्प्लोर

Dhule News : आज धुळ्यात शासन आपल्या दारी कार्यक्रम, मुख्यमंत्र्यांसह उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित, फडणवीसांची मात्र दांडी

Dhule News : धुळे शहरात (Dhule) मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत शासन आपल्या दारी कार्यक्रम आज होत आहे.

Nashik Dhule News : धुळे शहरात (Dhule) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत शासन आपल्या दारी (Shasan Apalya Dari) हा कार्यक्रम आज होत आहे. दुपारी अडीच वाजता मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत एसआरपीएफ मैदान येथे होत आहे. मात्र उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे उपस्थित राहणार नाहीत, मुंबईत पोलिस परिषदेचे आयोजन करण्यात आल्याने ते धुळे येथील कार्यक्रमाला उपस्थित राहणार नसल्याचे सांगण्यात आले आहे. 

शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांचा लाभ लाभार्थ्यांना मिळावा, तसेच या योजना लाभार्थ्यांपर्यंत पोहोचाव्यात या उद्देशाने शासन आपल्या दारी हा उपक्रम घेतला जात आहे. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) हे सध्या राज्याच्या दौऱ्यावर आहेत. विविध ठिकाणी शासन आपल्या दारीचा कार्यक्रम पार पडत आहे. आज धुळे शहरातील सुरत नागपूर महामार्गावर असलेल्या राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक सहाच्या मैदानावर शासन आपल्या दारीचा उपक्रम संपन्न होणार आहे. या कार्यक्रमासाठी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, आणि नवनिर्वाचित उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) हे दुपारी पोहचत आहेत.  या ठिकाणी उपस्थित नागरिक व लाभार्थ्यांना शासनाच्या विविध योजनांची माहिती देण्यासाठी शासनाच्या विविध 19 विभागांचे माहितीपूर्ण 34 स्टॉल लावण्यात आले असल्याची माहिती जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी दिली आहे.

दरम्यान शासन आपल्या दारी कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांना निवेदन, अर्ज द्यायचे असतील, त्यांचे निवेदन स्वीकारून पोहोच देण्यासाठी मुख्यमंत्री सचिवालय कक्ष तसेच कार्यक्रमाला येणाऱ्या महिलांसाठी हिरकणी कक्ष असेल. जिल्हा कौशल्य व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, महसूल विभाग, आरोग्य विभाग, जिल्हा परिषद, कृषी, आदिवासी विकास, महिला व बाल विकास विभाग जिल्हा परिषद व राज्यस्तर, शिक्षण विभाग (माध्यमिक/प्राथमिक), समाज कल्याण विभाग जिल्हा परिषद पशुसंवर्धन विभाग जिल्हा परिषद, स्वच्छ भारत मिशन कक्ष जिल्हा परिषद, भूमी अभिलेख विभाग, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, जिल्हा उद्योग केंद्र, महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ, जिल्हा मत्स्यव्यवसाय विभाग, महानगरपालिका, नगरविकास याप्रमाणे स्टॉल असतील. शासनाच्या विविध योजनांची माहिती घेण्यासाठी या स्टॉलला भेट देण्याचे आवाहन जिल्हाभरातील नागरीकांना जिल्हाधिकारी यांनी केले आहे.

271 बसेसची व्यवस्था, वॉटरप्रूफ टेन्टची बांधणी

दरम्यान कार्यक्रमासाठी लाभाथ्यांची ने-आण करण्यासाठी एसटी महामंडळाच्या 271 बसेस उपलब्ध करून दिल्या आहेत. त्यात साक्री तालुक्यासाठी 64, शिरपूर 66, धुळे ग्रामीण 68 शिवखेडा 44 तसेच धुळे मनपा 29 अशी बसेसची सुविधा उपलब्ध आहेत. पावसाळ्याचे दिवस असल्याने सहभागींची त्रेधातिरपीट उडू नये म्हणून वॉटरप्रूफ टेन्टची उभारणी करण्यात आली आहे. यासाठी मोठ्याप्रमाणावर मनुष्यबळ कार्यरत आहे. सभास्थळी साउंड सिस्टीम लावण्यात अली असून बैठक व्यवस्था अशी सर्व काही सज्जता ठेवण्यात आली आहे. 

Devendra Fadnavis : धुळ्यात शासन आपल्या दारी कार्यक्रम, मात्र फडणवीस उपस्थित राहणार नाहीत

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

IPL 2025 बाबत मोठी अपडेट, 10 संघाची बीसीसीआयकडे मोठी मागणी, खेळाडूंना होणार फायदा
IPL 2025 बाबत मोठी अपडेट, 10 संघाची बीसीसीआयकडे मोठी मागणी, खेळाडूंना होणार फायदा
IND vs ZIM: ध्रुव जुरेल की जितेश शर्मा... संजू सॅमसनच्या जागी विकेटकीपर कोण?
IND vs ZIM: ध्रुव जुरेल की जितेश शर्मा... संजू सॅमसनच्या जागी विकेटकीपर कोण?
जिम्बाब्वे दौऱ्यासाठी टीम इंडिया रवाना, पाहा फोटो
जिम्बाब्वे दौऱ्यासाठी टीम इंडिया रवाना, पाहा फोटो
Photos: शाहिद कपूर ते युवराज सिंह... लग्नाआधी सानियाचं नाव कुणा कुणासोबत जोडलं?
Photos: शाहिद कपूर ते युवराज सिंह... लग्नाआधी सानियाचं नाव कुणा कुणासोबत जोडलं?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Nawab Malik at Ajit Pawar : अजित पवार यांच्या घरी डिनर डिप्लोमसी, नवाब मलिकांची खास उपस्थिती!Deekshabhoomi Underground Parking Issue : नागपूर दीक्षाभूमी आंदोलन कुणी भडकवलं? Spcial ReportTop 25 : रात्रीच्या राज्यातील 25 बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट : 02 July 2024 : ABP MajhaVidhan Parishad Election Special Report : घेणार माघार की होणार घोडेबाजार? विधानपरिषदेत कुणाचा गेम?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
IPL 2025 बाबत मोठी अपडेट, 10 संघाची बीसीसीआयकडे मोठी मागणी, खेळाडूंना होणार फायदा
IPL 2025 बाबत मोठी अपडेट, 10 संघाची बीसीसीआयकडे मोठी मागणी, खेळाडूंना होणार फायदा
IND vs ZIM: ध्रुव जुरेल की जितेश शर्मा... संजू सॅमसनच्या जागी विकेटकीपर कोण?
IND vs ZIM: ध्रुव जुरेल की जितेश शर्मा... संजू सॅमसनच्या जागी विकेटकीपर कोण?
जिम्बाब्वे दौऱ्यासाठी टीम इंडिया रवाना, पाहा फोटो
जिम्बाब्वे दौऱ्यासाठी टीम इंडिया रवाना, पाहा फोटो
Photos: शाहिद कपूर ते युवराज सिंह... लग्नाआधी सानियाचं नाव कुणा कुणासोबत जोडलं?
Photos: शाहिद कपूर ते युवराज सिंह... लग्नाआधी सानियाचं नाव कुणा कुणासोबत जोडलं?
उत्पन्नची अट ते मुदतवाढ, लाडकी बहिण योजनेत महत्वाचे 7 मोठे बदल
उत्पन्नची अट ते मुदतवाढ, लाडकी बहिण योजनेत महत्वाचे 7 मोठे बदल
पुणे-सोलापूर महामार्गावर टायर फुटल्यानं भीषण अपघात, 4 जणांचा जागीच मृत्यू
पुणे-सोलापूर महामार्गावर टायर फुटल्यानं भीषण अपघात, 4 जणांचा जागीच मृत्यू
आषाढीसाठी पंढरी सज्ज, भंडीशेगावपासून पंढरपूरपर्यंत होणार आकर्षक विद्युत रोषणाई  
आषाढीसाठी पंढरी सज्ज, भंडीशेगावपासून पंढरपूरपर्यंत होणार आकर्षक विद्युत रोषणाई  
Pune Metro : धक्कादायक! पुणे मेट्रो स्थानकात सरकत्या जिन्यावरून उतरताना खाली पडून प्रवाशाचा मृत्यू
धक्कादायक! पुणे मेट्रो स्थानकात सरकत्या जिन्यावरून उतरताना खाली पडून प्रवाशाचा मृत्यू
Embed widget