एक्स्प्लोर

Khuni Ganpati : धुळ्यातील मानाचा 'खुनी गणपती', हिंदू-मुस्लीम ऐक्याचं प्रतीक, 'खुनी' नाव कसं पडलं? जाणून घ्या रंजक कहाणी

Dhule Khuni Ganpati : धुळे शहरातील इंग्रज काळातील खुनी गणपती हा मानाचा गणपती म्हणून ओळखला जातो. हा गणपती हिंदू- मुस्लिम ऐक्याचे प्रतीक म्हणून प्रसिद्ध आहे.

धुळे : आज राज्यभरात लाडक्या बाप्पाचे (Ganpati Bappa) आगमन मोठ्या थाटामाटात होत आहे. सार्वजनिक मंडळांसह घरोघरी बाप्पा विराजमान झाले आहेत. महाराष्ट्रभर गणपतीची अनेक मंदिरे असून या गणपती मंदिरामागे रंजक इतिहास आहे. धुळे (dhule) शहरातील इंग्रज काळातील खुनी गणपती (Khuni Ganpati) हा मानाचा गणपती म्हणून ओळखला जातो. खुनी गणपती नाव ऐकून आश्चर्य वाटलं ना? हा गणपती हिंदू- मुस्लिम ऐक्याचे प्रतीक म्हणून प्रसिद्ध असून खुनी गणपतीचा नेमका इतिहास काय? जाणून घेऊयात.

1895 मध्ये खांबेटे गुरुजींनी टिळकांच्या प्रेरणेने धुळ्यात सार्वजनीक गणेशोत्सव सुरु केला. त्या गणेशाची विसर्जन मिरवणूक 1000 वर्ष जून्या शाही जामा मशिदीवरुन सायंकाळी प्रार्थनेच्या वेळी पालखीतून जात होती. त्यावेळी या पालखीला विरोध झाला आणि या विरोधाच रुपांतर हाणामारीत झाल्याने ब्रिटीशांनी गोळीबार केला. त्यात बरेच लोक मृत्यूमुखी पडले, अनेक जखमी झाले आणि आहिराणीत "त्या मशिदजवळ खून पडनात", "खुन नी मसिद", गणपतीना वखतले तथा खून झाया" या चर्चांमूळे मशिदीला खुनी मशिद आणि गणपतीला खुनी गणपती नाव प्रचलित झाल्याचे सांगण्यात येते. पुढे ब्रिटीशांनी दोन्ही गटात समेट घडवला आणि एकमेकांच्या धर्माच्या सन्मानासाठी ठोस पाऊल उचलली. ब्रिटीशांकडून 228 रुपये दोन्ही गटांना दिले गेले आणि त्यातून ही ऐतिहासिक प्रथा सुरु झाली.

मशिदीतर्फे होते गणपतीची आरती 

दर अनंत चर्तुदशीला गणपतीची विसर्जन मिरवणूक पालखीतूनच निघते. यावेळी पारंपारीक टाळ-मृदुंगाच्या गजरात तिनपावली, बारापावली नृत्य होत, बरोबर सायंकाळी 5 वाजता, म्हणजेच नमाजची अजान होताना खुनी गणपतीची पालखी खुनी मशिदीच्या दाराच्या एकदम समोर येते, मशिदीतून गणपतीवर पुष्पवृष्टी केली जाते. मशिदीचे मौलाना आरतीचं तबक आणि गुलाबाच्या फुलांचा हार आणून मशिदीतर्फे गणपतीची आरती केली जाते.

हिंदू-मुस्लीम ऐक्याचं प्रतीक

एकीकडे आरती आणि दुसरीकडे अजान सुरु होते. तिथे आरती झाली की, गणपती विसर्जनासाठी मार्गस्थ होतो. याठीकाणी आल्यानंतर पालखी अचानक जड होत असल्याचाही अनुभव भाविक सांगतात. हिंदू मुस्लीम ऐक्याची सुंदर परंपरा इथे आहे. दोन्ही धर्मीयांनी ती आजतागायत जपली आहे. आठ ते दहा लाख लोकसंख्या असलेल्या धुळे महानगरात जुने धुळे परिसर सोडलं तर बाप्पाचं हे आगळं रुप जास्त कुणाला माहित नाही. जुन्या धुळ्यातल्या जुन्या लोकांनी ही प्रथा जपलीय. त्यामुळे याचा इतिहास आणि वेगळेपणाचा इव्हेंट होण्यापासून वाचलाय. 1895-1896 मध्ये होती तशीच तंतोतंत परंपरा आजही पाळली जात आहे. धुळ्यात आल्यानंतर, जुने धुळे विचारलं की, खुनी मशिद हाच बसथांबा आजही आहे. जसं मशिदीच्या प्रशासनाने गणपती जपलाय, तसंच जुन्या धुळ्याने हिंदूबहूल लोकांनी मशिद पावित्र्याने जपली आहे.

आणखी वाचा 

'गोदावरीच्या राजा'ला यंदा ब्रेक, गोदावरी एक्स्प्रेसमधील गणेशोत्सवाची 27 वर्षांची परंपरा खंडित, प्रवाशांनी व्यक्त केली नाराजी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 सप्टेंबर 2024 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 सप्टेंबर 2024 | सोमवार
Nana Patole : शिंदेजी, वाचाळवीर संजय गायकवाडांना वेळीच आवरा, नाहीतर...; नाना पटोलेंचा इशारा
शिंदेजी, वाचाळवीर संजय गायकवाडांना वेळीच आवरा, नाहीतर...; नाना पटोलेंचा इशारा
मोठी बातमी! पुण्यातील वनराज आंदेकर प्रकरण;आरोपींवर मोक्कांतर्गत कारवाई; काय आहे शिक्षा?
मोठी बातमी! पुण्यातील वनराज आंदेकर प्रकरण;आरोपींवर मोक्कांतर्गत कारवाई; काय आहे शिक्षा?
women Health: मासिक पाळीदरम्यान हे व्यायाम चुकुनही करू नका, रक्तस्राव अधिक होऊन थकवा येण्याचा वाढताे धोका
मासिक पाळीदरम्यान हे व्यायाम चुकुनही करू नका, रक्तस्राव अधिक होऊन थकवा येण्याचा वाढताे धोका
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Nana Patekar Ganpati Bappa : देवेंद्र फडणवीस - अजित पवार नाना पाटेकरांच्या फार्महाऊसवर ABP MAJHAABP Majha Headlines : 05 PM : 16 September 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सKolhapur Truck Accident : पुणे बंगळुरू हायवेवर भीषण अपघात, तिघे जागीच दगावलेAmbernath Truck Bike Accident : घाई करणं भोवलं, दुचाकी थेट ट्रक खाली, मृत्यू अक्षरश: कट मारून गेला

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 सप्टेंबर 2024 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 सप्टेंबर 2024 | सोमवार
Nana Patole : शिंदेजी, वाचाळवीर संजय गायकवाडांना वेळीच आवरा, नाहीतर...; नाना पटोलेंचा इशारा
शिंदेजी, वाचाळवीर संजय गायकवाडांना वेळीच आवरा, नाहीतर...; नाना पटोलेंचा इशारा
मोठी बातमी! पुण्यातील वनराज आंदेकर प्रकरण;आरोपींवर मोक्कांतर्गत कारवाई; काय आहे शिक्षा?
मोठी बातमी! पुण्यातील वनराज आंदेकर प्रकरण;आरोपींवर मोक्कांतर्गत कारवाई; काय आहे शिक्षा?
women Health: मासिक पाळीदरम्यान हे व्यायाम चुकुनही करू नका, रक्तस्राव अधिक होऊन थकवा येण्याचा वाढताे धोका
मासिक पाळीदरम्यान हे व्यायाम चुकुनही करू नका, रक्तस्राव अधिक होऊन थकवा येण्याचा वाढताे धोका
आमदाराला निवडून येणं महत्त्वाचं, पक्ष नाही; अजित पवारांच्या आमदारांबाबत बच्चू कडूंचं मोठं वक्तव्य
आमदाराला निवडून येणं महत्त्वाचं, पक्ष नाही; अजित पवारांच्या आमदारांबाबत बच्चू कडूंचं मोठं वक्तव्य
Twice Born Baby: दोनवेळा जन्माला आलेलं जगातलं पहिलं बाळ! आईच्या गर्भातून काढून पुन्हा ठेवलं गर्भात, विज्ञानाच्या चमत्काराची जगभर चर्चा
दोनवेळा जन्माला आलेलं जगातलं पहिलं बाळ! आईच्या गर्भातून काढून पुन्हा ठेवलं गर्भात, विज्ञानाच्या चमत्काराची जगभर चर्चा
धनगर-धनगड एकच, महायुतीत खडाजंगी, झिरवाळांनंतर अजितदादांच्या आणखी एका आमदाराचा सरकारला घरचा आहेर
धनगर-धनगड एकच, महायुतीत खडाजंगी, झिरवाळांनंतर अजितदादांच्या आणखी एका आमदाराचा सरकारला घरचा आहेर
Sadabhau Khot VIDEO : संजय राऊत घरकोंबडा, महाविकास आघाडीचे नेते वळू-रेडे, त्यांना चाबकाने फोडून काढणार : सदाभाऊ खोत
संजय राऊत घरकोंबडा, महाविकास आघाडीचे नेते वळू-रेडे, त्यांना चाबकाने फोडून काढणार : सदाभाऊ खोत
Embed widget