एक्स्प्लोर

Dhule News : एसपी श्रीकांत धिवरेंचा मोठा दणका; पोलीस अधिकाऱ्यांना भोवला निष्काळजीपणा

Dhule News : धुळे जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी निष्कळजीपणा करणाऱ्या चार पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारला आहे. यामुळे पोलीस दलात मोठी खळबळ उडाली आहे.

Dhule News धुळे : जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे (Shikant Dhiware) यांनी पुन्हा आपल्या कर्तव्य कठोरतेचे दर्शन घडविले आहे. केंद्रीय आपत्कालीन सेवेला संथ प्रतिसाद देणाऱ्या चार पोलीस ठाण्यांच्या अधिकाऱ्यांना कंट्रोलला जमा करण्यात आले आहे. यामध्ये धुळे शहर, धुळे तालुका, निजामपूर आणि दोंडाईचा पोलीस (Dhule Police) ठाण्यांच्या अधिकाऱ्यांचा समावेश आहे. तर तीन पोलीस कर्मचाऱ्यांवर थेट निलंबनाची कारवाई झाली असून यामुळे पोलीस दलात मोठी खळबळ उडाली आहे.

केंद्राने डायल ११२ ही आपत्कालीन सेवा कार्यान्वित केली आहे. तिथे तक्रारदार किंवा संकटग्रस्त व्यक्तीने कॉल केल्यानंतर पोलीस यंत्रणा, आरोग्य यंत्रणा आदींना मदतीसाठी धावून जावे लागते. विशेष म्हणजे प्रत्येक पोलीस ठाण्यांना ११२ वरील तक्रारीस प्रतिसाद देण्यासाठी एक ठराविक वेळ निर्धारीत करण्यात आली आहे. तितक्या वेळात तक्रारदारांपर्यंत पोलिसांना पोहचावे लागते. शिवाय, तशी माहिती वरील यंत्रणेकडे सुपूर्द करावी लागते. परंतु, जिल्ह्यातील काही पोलीस ठाण्यांकडून ११२ सेवेला नीट प्रतिसाद दिला जात नसल्याचे एसपी श्रीकांत धिवरे यांच्या निदर्शनास आले. 

तीन कर्मचाऱ्यांचे निलंबन

जानेवारी महिन्याच्या डायल ११२ च्या रिपोर्टनुसार धुळे जिल्हा हा सर्वात शेवटच्या नंबरवर असल्यामुळे पोलीस अधीक्षकांना ही कारवाई करावी लागली. कहर म्हणजे आजही धुळे शहर, धुळे तालुका, निजामपूर आणि दोंडाईचा पोलीस ठाण्यांच्या अधिकाऱ्यांना वायरलेसवर ऑनलाईन येण्यास बराच उशीर झाला. त्यामुळे पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे आणखी संतप्त झाले. आज वायरलेसवरच संदेश फिरवत त्यांनी वरील पोलीस ठाण्यांच्या अधिकाऱ्यांना पुढील आदेश येईपर्यंत कंट्रोलला हजर होण्याबाबत सांगितले. तर याच प्रकरणी तीन कर्मचाऱ्यांच्या निलंबनाची घोषणा केली. या पोलीस कर्मचाऱ्यांच्या निलंबनाची ऑर्डर आजच निघणार असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.

पदभार सोडून जावे लागणार पोलीस कंट्रोलला 

पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरेंच्या आदेशामुळे शहर पोलीस निरीक्षक धीरज महाजन, धुळे तालुका पोलीस निरीक्षक प्रमोद पाटील, निजामपूर सहा. पोलीस निरीक्षक हनुमंतराव गायकवाड दोंडाईचा सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश मोरे यांना आपला पदभार सोडून पोलीस कंट्रोलला जावे लागणार आहे. तर प्रभारी ठाण्यांचा चार्ज दुय्यम अधिकाऱ्यांकडे सुपूर्द करण्याचेही पोलिस अधीक्षकांनी आदेश दिले आहे. दरम्यान, श्रीकांत धिवरेंनी आज खेळलेल्या मास्टर स्ट्रोकमुळे पोलीस दलात पुन्हा मोठा भूकंप झाला असून आणखी काही बेशिस्त कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कुऱ्हाड कोसळण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

आणखी वाचा

नाशिकमध्ये पालकमंत्र्यांनी बोलावलेल्या बैठकीला भाजपासह राष्ट्रवादीच्या आमदारांची दांडी, राजकीय चर्चांना उधाण

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Aditi Tatkare : राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात अहिल्याभवन उभे करण्यास गती द्यावी : अदिती तटकरे
राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात अहिल्याभवन उभे करण्यास गती द्यावी : अदिती तटकरे
वक्फ सुधारणा विधेयकात जेपीसीमधील विरोधी खासदारांच्या सुचनांना कात्रजचा घाट! सत्ताधाऱ्यांच्या दुरस्त्या मात्र स्वीकारल्या! ओवैसी म्हणाले, एका रात्रीत 655 पाने कशी वाचायची?
वक्फ सुधारणा विधेयकात जेपीसीमधील विरोधी खासदारांच्या सुचनांना कात्रजचा घाट! सत्ताधाऱ्यांच्या दुरस्त्या मात्र स्वीकारल्या!
Nashik : नाशिकमध्ये 776 गावांमध्ये भूजल पातळी खालावली, पाण्याच्या आणीबाणीची शक्यता, विहीर खोदण्यास बंदी
नाशिकमध्ये 776 गावांमध्ये भूजल पातळी खालावली, पाण्याच्या आणीबाणीची शक्यता, विहीर खोदण्यास बंदी
IND vs ENG 4th T20I : भारत-इंग्लंड चौथ्या टी-20 मॅचवर जीबीएसचे सावट; पुण्यातील एमसीएचे मैदानावर कोणती खबरदारी घेतली जात आहे?
भारत-इंग्लंड चौथ्या टी-20 मॅचवर जीबीएसचे सावट; पुण्यातील एमसीएचे मैदानावर कोणती खबरदारी घेतली जात आहे?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 11 PM : 29 जानेवारी 2025 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सEknath Shinde vs Ganesh Naik : शिंदेंच्या बालेकिल्ल्यात भाजपची 'डरकाळी' Rajkiya Shole Special ReportDhananjay Munde :राजीनाम्याचा फैसला कुणाच्या कोर्टात?दिल्लीत काय झालं? Rajkiya Shole Special ReportZero Hour : Nanded Corporation : महापालिकेचे महामुद्दे : नांदेडकरांच्या समस्या कोणत्या?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Aditi Tatkare : राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात अहिल्याभवन उभे करण्यास गती द्यावी : अदिती तटकरे
राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात अहिल्याभवन उभे करण्यास गती द्यावी : अदिती तटकरे
वक्फ सुधारणा विधेयकात जेपीसीमधील विरोधी खासदारांच्या सुचनांना कात्रजचा घाट! सत्ताधाऱ्यांच्या दुरस्त्या मात्र स्वीकारल्या! ओवैसी म्हणाले, एका रात्रीत 655 पाने कशी वाचायची?
वक्फ सुधारणा विधेयकात जेपीसीमधील विरोधी खासदारांच्या सुचनांना कात्रजचा घाट! सत्ताधाऱ्यांच्या दुरस्त्या मात्र स्वीकारल्या!
Nashik : नाशिकमध्ये 776 गावांमध्ये भूजल पातळी खालावली, पाण्याच्या आणीबाणीची शक्यता, विहीर खोदण्यास बंदी
नाशिकमध्ये 776 गावांमध्ये भूजल पातळी खालावली, पाण्याच्या आणीबाणीची शक्यता, विहीर खोदण्यास बंदी
IND vs ENG 4th T20I : भारत-इंग्लंड चौथ्या टी-20 मॅचवर जीबीएसचे सावट; पुण्यातील एमसीएचे मैदानावर कोणती खबरदारी घेतली जात आहे?
भारत-इंग्लंड चौथ्या टी-20 मॅचवर जीबीएसचे सावट; पुण्यातील एमसीएचे मैदानावर कोणती खबरदारी घेतली जात आहे?
Success Story: नैसर्गिक शेतीनं उत्पादन 50 टनांहून 400 टनांवर गेलं, यवतमाळच्या 73 वर्षांच्या शेतकऱ्याला पद्मश्री मिळाला, कशी केली त्यांनी शेती?
नैसर्गिक शेतीनं उत्पादन 50 टनांहून 400 टनांवर गेलं, यवतमाळच्या 73 वर्षांच्या शेतकऱ्याला पद्मश्री मिळाला, कशी केली त्यांनी शेती?
Dhananjay Munde PC : संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींना फाशी द्या, धनंजय मुंडे यांची मागणी
Dhananjay Munde PC : संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींना फाशी द्या, धनंजय मुंडे यांची मागणी
Cidco Lottery 2025 : सिडकोच्या 26000 घरांसाठी किती जणांनी बुकिंग शुल्क भरलं? सोडतीची तारीख ठरली...
सिडकोच्या 26000 घरांसाठी बुकिंग शुल्क किती अर्जदारांनी भरलं? सोडतीचं वेळापत्रक जाहीर 
Ibrahim Ali Khan Debut:
"याच्या तर रक्तातच अॅक्टिंग..."; करण जोहरकडून इब्राहिम अली खानला डेब्यू फिल्म ऑफर...
Embed widget