एक्स्प्लोर
Advertisement
धुळ्यातील शेतकऱ्याचा दानशूरपणा, अल्पभूधारकांना कांद्याचं बियाणं मोफत देणार
धुळे : राज्यात एकीकडे शेतकरी संपावर जाण्याच्या तयारीत आहेत, शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्यासाठी राज्यातील विरोधी पक्ष गावोगावी जाऊन संघर्ष यात्रेच्या माध्यमातून सरकारच्या ध्येय धोरणांवर टीका करत आहेत, असं सगळं असताना तिकडे धुळे जिल्ह्यातील कुंडाणे-नगांव शिवारातील प्रगतशील शेतकऱ्यानं अल्पभूधारक, गरजू शेतकऱ्यांना कांद्याचं बियाणं मोफत देण्याचा निर्णय जाहीर केला आहे. प्रगतशील शेतकऱ्याने गरजू शेतकऱ्यांना दिलेला मदतीचा हात नक्कीच एक आदर्श म्हणावाला लागेल.
धुळे जिल्ह्यातील कुंडाणे-नगांव शिवारातील प्रगतशील शेतकरी गोपाळ केले यांचं शिक्षण एमएस्सी अॅग्री झालं आहे. नोकरीच्या मागे न लागता त्यांनी आपली शेती विकसित केली.
डाळिंब, शेवगा, पपई या फळबागवर्गीय शेती बरोबरच पारंपरिक पीक देखील ते सेंद्रिय शेतीचा अवलंब करून घेतात. पावसाळ्यात कमी पाऊस झाला, परिणामी शेताजवळ करण्यात आलेला सिमेंट बांध कोरडा ठाक झाला, विहरींची पाणी पातळी घटली, शेतातील पीक वाचण्यासाठी गोपाळ केले यांनी पाण्यावर पाण्यासारखा पैसा खर्च करून पांझरा नदी पात्र ते शेती या पाच किलोमीटर अंतरापर्यंत पाईप लाईन टाकून पीक वाचवली.
आपल्यासारखा खर्च इतर शेतकरी करू शकत नाही. शिवाय ज्या शेतकऱ्यांना कांदा लागवड करायची इच्छा आहे. मात्र आर्थिक परिस्थिती अभावी कांदा बियाणं घेणं जिकरीचं झालं आहे. अशा शेतकऱ्यांना आपल्या शेतात एक एकर क्षेत्रावर तयार झालेलं कांद्याचं बियाणं मोफत देण्याचा निर्णय प्रगतशील शेतकरी गोपाळ केले यांनी जाहीर केला आहे.
पैश्यांअभावी बियाणं घेऊ न शकणाऱ्या शेतकऱ्यांना कांद्याचं मोफत बियाणं देण्याचा निर्णय जाहीर करणाऱ्या गोपाळ केले यांचं हे कार्य म्हणजे शेतकऱ्यांप्रती कळवळा दाखवणाऱ्या प्रवृतींना झणझणीत अंजन म्हटलं तर वावगं ठरू नये.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
शिक्षण
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement