एक्स्प्लोर

Maharashtra Assembly Elections 2024 : परंडा मतदारसंघात ट्विस्ट पे ट्विस्ट, राहुल मोटेंचा मार्ग क्लिअर झाल्याची बातमी पसरताच रणजीत पाटलांचा मोठा दावा, म्हणाले...

Paranda Assembly Constituency : राहुल मोटे हे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार असतील, अशी माहिती समोर येताच रणजीत पाटील यांनी मोठा दावा केला आहे.

धाराशिव : महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 ची (Maharashtra Assembly Elections 2024) रणधुमाळी सुरु झाली आहे. राज्यात महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) आणि महायुतीत (Mahayuti) लढत होत आहे. 20 नोव्हेंबरला मतदान पार पडणार असून 23 नोव्हेंबरला निवडणुकीचा निकाल लागणार आहे. तर आज उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा अखेरचा दिवस आहे. महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यापुढे बंडखोरांची मनधरणी करण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरु आहेत. धाराशिव जिल्ह्यातील परंडा मतदारसंघात (Bhum Paranda Vidhan Sabha) महाविकास आघाडीच्या दोन उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. ठाकरे गटाचे रणजीत पाटील (Ranjit Patil) आणि शरद पवार गटाकडून राहुल मोटे (Rahul Mote) यांनी उमेदवारी अर्ज भरला होता. ठाकरे गटाचे रणजीत पाटील हे परंडा विधानसभा मतदारसंघातून माघार घेणार, अशी माहिती समोर आली होती. मात्र, उमेदवारी मागे घेण्याची चर्चा शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार रणजीत पाटील यांनी फेटाळली आहे. 
 
शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरेंचे कडवट शिवसैनिक अशी ओळख असलेल्या माजी आमदार ज्ञानेश्वर पाटील यांचे नुकतेच निधन झाले होते. त्यांचे पुत्र रणजीत पाटील यांना उद्धव ठाकरे यांनी संधी दिली. शिवसेना ठाकरे गटाकडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या 65 उमेदवारांच्या पहिल्या यादीत परंडा मतदारसंघातून रणजीत पाटील यांची उमेदवारी घोषित करण्यात आली. तर परंडा मतदारसंघातून शरद पवार गटाचे राहुल मोटे हे तानाजी सावंत यांना चांगली टक्कर देऊ शकतात, असा दावा शरद पवार गटाकडून करण्यात आला होता. त्यानंतर  शरद पवार गटाकडून राहुल मोटे यांनी उमेदवारी अर्ज भरला होता. मात्र, ठाकरे गट आणि राष्ट्रवादीतील चर्चेनंतर राहुल मोटे हे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार असतील, अशा चर्चांना उधाण आले होते. 

उमेदवारी मागे घेण्याची चर्चा रणजित पाटलांनी फेटाळली  

आता याबाबत रणजीत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. निवडणुकीतून मी माघार घेतलेली नाही अफवांवर विश्वास ठेवू नका. विरोधकांकडून जाणीवपूर्वक अफवा पसरवल्या जात आहेत. पक्षाकडून अद्याप कुठलंही बोलणं झालेलं नाही. परंडा विधानसभेसाठी महाविकास आघाडीचा अधिकृत उमेदवार म्हणून माझा उमेदवारी अर्ज कायम आहे., असे म्हणत उमेदवारी मागे घेण्याची चर्चा शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार रणजीत पाटील यांनी फेटाळली. 

इतर महत्त्वाच्या बातम्या 

Chhagan Bhujbal : मनोज जरांगेंची निवडणुकीतून माघार, कट्टर विरोधक छगन भुजबळांनी दिलेल्या प्रतिक्रियेनं भूवया उंचावल्या

मोठी बातमी : अखेर रश्मी शुक्ला यांना पोलीस महासंचालक पदावरुन हटवलं, मविआच्या मागणीला मोठं यश

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

SBI : आरबीआयनं रेपो रेट घटवला, स्टेट बँक ऑफ इंडियाचा मोठा निर्णय, कर्जांचे व्याज दर 25 बेसिस पॉईंटनं घटवले, कोणाला फायदा होणार? 
आरबीआयनं रेपो रेट घटवला, स्टेट बँक ऑफ इंडियाचा मोठा निर्णय, कर्जांचे व्याज दर 25 बेसिस पॉईंटनं घटवले
इंडिगोच्या गोंधळानंतर विमान तिकीट दर गगनाला भिडले, विमान प्रवासभाडे नियंत्रणाबाबत केंद्रीय मंत्र्यांचं स्पष्ट उत्तर, म्हणाले....
इंडिगोच्या गोंधळानंतर विमान तिकीट दर नियंत्रणावर केंद्रीय मंत्र्यांचं लोकसभेत उत्तर, नेमकं काय म्हणाले, जाणून घ्या
ट्रम्प यांनी टॅरिफ लादलं, भारतानं जुमानलं नाही, रशियाकडून तेल खरेदी सुरुच ठेवली, नोव्हेंबरमध्ये विक्रमी तेल खरेदी
ट्रम्प टॅरिफला न जुमानता भारताची रशियाकडून विक्रमी तेल खरेदी, नोव्हेंबरची आकडेवारी समोर
संतोष देशमुख हत्याप्रकरणात वाल्मिकच मुख्य सूत्रधार; सरकारी वकिलांचा हायकोर्टात युक्तिवाद
संतोष देशमुख हत्याप्रकरणात वाल्मिकच मुख्य सूत्रधार; सरकारी वकिलांचा हायकोर्टात युक्तिवाद

व्हिडीओ

Savarkar Statue Andaman : सावरकरांना वंदन, पुतळ्याचं अनावरण Special Report
Maratha Reservation Hyderabad gazette : हैदराबाद गॅझेटचा खरंच फायदा झाला का? Special Report
CBSE Syllabus : CBSE भोंगळ कारभारावर शिवप्रेमींचा संताप Special Report
Nashik Tapovan Kumbhmela :  तपोवनचा वाद, संतापला हरित लवाद Special Report
Shiv Sena-BJP Alliance : महानगर पालिका निवडणुकीसाठी भाजप-शिवसेना यांच्यात युती Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
SBI : आरबीआयनं रेपो रेट घटवला, स्टेट बँक ऑफ इंडियाचा मोठा निर्णय, कर्जांचे व्याज दर 25 बेसिस पॉईंटनं घटवले, कोणाला फायदा होणार? 
आरबीआयनं रेपो रेट घटवला, स्टेट बँक ऑफ इंडियाचा मोठा निर्णय, कर्जांचे व्याज दर 25 बेसिस पॉईंटनं घटवले
इंडिगोच्या गोंधळानंतर विमान तिकीट दर गगनाला भिडले, विमान प्रवासभाडे नियंत्रणाबाबत केंद्रीय मंत्र्यांचं स्पष्ट उत्तर, म्हणाले....
इंडिगोच्या गोंधळानंतर विमान तिकीट दर नियंत्रणावर केंद्रीय मंत्र्यांचं लोकसभेत उत्तर, नेमकं काय म्हणाले, जाणून घ्या
ट्रम्प यांनी टॅरिफ लादलं, भारतानं जुमानलं नाही, रशियाकडून तेल खरेदी सुरुच ठेवली, नोव्हेंबरमध्ये विक्रमी तेल खरेदी
ट्रम्प टॅरिफला न जुमानता भारताची रशियाकडून विक्रमी तेल खरेदी, नोव्हेंबरची आकडेवारी समोर
संतोष देशमुख हत्याप्रकरणात वाल्मिकच मुख्य सूत्रधार; सरकारी वकिलांचा हायकोर्टात युक्तिवाद
संतोष देशमुख हत्याप्रकरणात वाल्मिकच मुख्य सूत्रधार; सरकारी वकिलांचा हायकोर्टात युक्तिवाद
देशासाठी मरण्याची नाही, जगण्याची गरज; अंदमानात अमित शाहांचे उद्गार, वीर सावकरांचा पुतळा साकार
देशासाठी मरण्याची नाही, जगण्याची गरज; अंदमानात अमित शाहांचे उद्गार, वीर सावकरांचा पुतळा साकार
भारतात धुमाकूळ घालणाऱ्या अक्षय खन्नाच्या 'धुरंदर' सिनेमाला 6 देशात बंदी? काय आहे आंतरराष्ट्रीय राज'कारण'
भारतात धुमाकूळ घालणाऱ्या अक्षय खन्नाच्या 'धुरंदर' सिनेमाला 6 देशात बंदी? काय आहे आंतरराष्ट्रीय राज'कारण'
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 डिसेंबर 2025 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 डिसेंबर 2025 | शुक्रवार
इंडिगोवर कारवाईचा हातोडा, 4 फ्लाइट ऑपरेशन्स निरीक्षक निलंबित; दुसऱ्या दिवशी सीईओंची झाडाझडती, आजही बेंगळुरू विमानतळावरून 54 उड्डाणे रद्द
इंडिगोवर कारवाईचा हातोडा, 4 फ्लाइट ऑपरेशन्स निरीक्षक निलंबित; दुसऱ्या दिवशी सीईओंची झाडाझडती, आजही बेंगळुरू विमानतळावरून 54 उड्डाणे रद्द
Embed widget