एक्स्प्लोर

Chhagan Bhujbal : मनोज जरांगेंची निवडणुकीतून माघार, कट्टर विरोधक छगन भुजबळांनी दिलेल्या प्रतिक्रियेनं भूवया उंचावल्या

Chhagan Bhujbal on Manoj Jarange : मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी विधानसभा निवडणुकीतून माघार घेतली आहे. याबाबत छगन भुजबळांनी प्रतिक्रिया दिली आहे.

नाशिक : मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी विधानसभा निवडणुकीतून (Maharashtra Assembly Elections 2024) माघार घेतली आहे. एकाही जागेवर उमेदवार उभा करणार नाहीत. सोबत घेतलेल्या पक्ष, घटकांनी आतापर्यंत आपल्या उमेदवारांची यादी न दिल्यामुळे हा निर्णय घेतल्याचं मनोज जरांगे यांनी जाहीर केले. पण मराठा समाजाने ज्याला पाडायचं आहे, त्याला पाडावं, असंही त्यांनी म्हटले आहे. मनोज जरांगे पाटील यांनी निवडणुकीतून माघार घेतल्यानंतर राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते आणि मंत्री छगन भुजबळ यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. 

छगन भुजबळ म्हणाले की, मनोज जरांगे यांनी जो निर्णय घेतला त्याचं मी स्वागत करतो. देर आए दुरुस्त आए, एका समाजावर निवडणूक लढता येत नाही. मराठा समाजाचे लोक आता मोकळेपणाने राहतील. कुठलेही दडपण येणार नाही. मराठा समाजाचे 60 ते 70 टक्के उमेदवार आहेत. जरांगे यांचा निर्णय अतिशय योग्य आहे.

सर्व धर्मीयांचा पाठींबा हवा हेच यातून ध्वनित

दलित आणि मुस्लीम उमेदवारांची यादी न आल्याने निर्णय घेतल्याचे मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले. याबाबत विचारले असता छगन भुजबळ म्हणाले की, त्यांनी बोलल्यावर मी काय बोलणार, सर्व धर्मीय आणि सर्व समाजाचा पाठींबा हवा आहे हेच यातून ध्वनित होते. राजकीय पक्षाचा प्रयत्न असाच असतो की, सर्व धर्मीय आणि सर्व समाजामध्ये काम करणे आणि त्यातून निवडून येणे हेच सर्व पक्ष करत असतात. 

आरक्षणाचे आंदोलन हा एक सामाजिक प्रश्न

मनोज जरांगे यांनी निवडणुकीनंतर काय होईल हे सांगता येणार नाही. एकनाथ शिंदे आणि शरद पवार यांच्यात काहीतरी सुरु आहे, असे वक्तव्य केले. याबाबत विचारले असता छगन भुजबळ म्हणाले की, त्यांना जसे सांगता येत नाही तसे मला देखील सांगता येत नाही. मनोज जरांगे यांनी माघार जरी घेतली असली तर आंदोलन सुरूच राहणार असेही म्हटले. याबाबत छगन भुजबळ म्हणाले की, आरक्षणाचे आंदोलन हा एक सामाजिक प्रश्न आहे. मी समता परिषदेच काम अनेक वर्षांपासून करत आहे. पण आम्ही समता परिषदेच्या माध्यमातून निवडणूक लढवत नाही आणि लढू शकत नाही. कारण  निवडणूक लढण्यासाठी त्या उमेदवाराने तिथल्या मतदारांचा विश्वास संपादन करावा लागतो. मी कुठल्यातरी सामाजिक संस्थेचा आहे म्हणून मला मतदान करा, असे होत नाही. त्यामुळे जरांगे यांचे काम सुरु राहील, असे त्यांनी म्हटले. 

आणखी वाचा 

Manoj Jarange: मनोज जरांगे काल रात्री ढसाढसा रडले, उमेदवार देणार म्हणाले; आज थेट निवडणुकीतून माघार, नेमकं काय घडलं?

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Ladki Bahin Yojana : कोल्हापुरात महायुतीच्या नेत्यांमध्ये पंधराशेसाठी लाडक्या बहिणींना धमकावण्याची अन् 500 रुपयात घर चालवायला 'बौद्धिक क्लास' देण्याची स्पर्धाच लागली!
कोल्हापुरात महायुतीच्या नेत्यांमध्ये पंधराशेसाठी लाडक्या बहिणींना धमकावण्याची अन् 500 रुपयात घर चालवायला 'बौद्धिक क्लास' देण्याची स्पर्धाच लागली!
उद्धव ठाकरेंच्या नाशिक दौऱ्याआधीच पोलिसांचा मोठा निर्णय; ठाकरे गटात प्रवेश करणाऱ्या बड्या नेत्यांना थेट तडीपारीची नोटीस
उद्धव ठाकरेंच्या नाशिक दौऱ्याआधीच पोलिसांचा मोठा निर्णय; ठाकरे गटात प्रवेश करणाऱ्या बड्या नेत्यांना थेट तडीपारीची नोटीस
Chandwad Vidhan Sabha Constituency : चांदवडमध्ये राहुल आहेर गड राखणार की केदा आहेर, शिरीष कोतवाल धक्का देणार? 
चांदवडमध्ये राहुल आहेर गड राखणार की केदा आहेर, शिरीष कोतवाल धक्का देणार? 
Ajit Pawar: फडणवीसांना काय वाटतं मला माहिती नाही, पण मला 'बटेंगे तो कटेंगे' पसंत नाही; अजितदादांनी स्पष्टच सांगितलं
फडणवीसांना काय वाटतं मला माहिती नाही, पण मला 'बटेंगे तो कटेंगे' पसंत नाही; अजितदादांनी स्पष्टच सांगितलं
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines :  12 PM : 15 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सDevendra Fadanvis Interview : भारत जोडो ते संविधान; महायुती ते मविआ; फडणवीसांची स्फोटक मुलाखतCity 60 : सिटी सिक्स्टी : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा :11 AM :15 नोव्हेंबर  2024 :  ABP MajhaABP Majha Headlines :  11 AM : 15 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ladki Bahin Yojana : कोल्हापुरात महायुतीच्या नेत्यांमध्ये पंधराशेसाठी लाडक्या बहिणींना धमकावण्याची अन् 500 रुपयात घर चालवायला 'बौद्धिक क्लास' देण्याची स्पर्धाच लागली!
कोल्हापुरात महायुतीच्या नेत्यांमध्ये पंधराशेसाठी लाडक्या बहिणींना धमकावण्याची अन् 500 रुपयात घर चालवायला 'बौद्धिक क्लास' देण्याची स्पर्धाच लागली!
उद्धव ठाकरेंच्या नाशिक दौऱ्याआधीच पोलिसांचा मोठा निर्णय; ठाकरे गटात प्रवेश करणाऱ्या बड्या नेत्यांना थेट तडीपारीची नोटीस
उद्धव ठाकरेंच्या नाशिक दौऱ्याआधीच पोलिसांचा मोठा निर्णय; ठाकरे गटात प्रवेश करणाऱ्या बड्या नेत्यांना थेट तडीपारीची नोटीस
Chandwad Vidhan Sabha Constituency : चांदवडमध्ये राहुल आहेर गड राखणार की केदा आहेर, शिरीष कोतवाल धक्का देणार? 
चांदवडमध्ये राहुल आहेर गड राखणार की केदा आहेर, शिरीष कोतवाल धक्का देणार? 
Ajit Pawar: फडणवीसांना काय वाटतं मला माहिती नाही, पण मला 'बटेंगे तो कटेंगे' पसंत नाही; अजितदादांनी स्पष्टच सांगितलं
फडणवीसांना काय वाटतं मला माहिती नाही, पण मला 'बटेंगे तो कटेंगे' पसंत नाही; अजितदादांनी स्पष्टच सांगितलं
Raj Thackeray: उबाठाच्या जाहीरनाम्यातील आश्वासनावर राज ठाकरेंनी बोट ठेवलं, म्हणाले, 'शिवाजी महारांजांची मंदिरं सगळीकडे नकोत....'
उबाठाच्या जाहीरनाम्यातील आश्वासनावर राज ठाकरेंनी बोट ठेवलं, म्हणाले, 'शिवाजी महारांजांची मंदिरं सगळीकडे नकोत....'
Raj Thackeray : शिवाजी पार्कवर 17 नोव्हेंबरला सभा घेणार नाही, त्या दिवशी करणार, राज ठाकरे म्हणाले...
मनसेची शिवाजी पार्कवर 17 नोव्हेंबरला सभा होणार नाही, राज ठाकरेंनी कारण सांगितलं...
हिंदुत्वाच्या गप्पा मारणं बंद करा अन् सिल्व्हर ओकची माळ जपत बसा; शिंदे गटाचा उद्धव ठाकरेंवर घणाघात
हिंदुत्वाच्या गप्पा मारणं बंद करा अन् सिल्व्हर ओकची माळ जपत बसा; शिंदे गटाचा उद्धव ठाकरेंवर घणाघात
Priyanka Gandhi In Kolhapur : कोल्हापुरात उद्या गांधी मैदानात 'महाराष्ट्र स्वाभिमान' गरजणार; प्रियांका गांधी पहिल्यांदाच करवीरनगरीत!
कोल्हापुरात उद्या गांधी मैदानात 'महाराष्ट्र स्वाभिमान' धडाडणार; प्रियांका गांधी पहिल्यांदाच करवीरनगरीत!
Embed widget