एक्स्प्लोर

निसर्गाने तर अन्याय केलाच, आता सरकारही सूड घेतंय : देवेंद्र फडणवीस

राज्यात अतिवृष्टीमुळे पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि कोकणात झालेल्या नुकसानीसाठी भरपाई म्हणून 10 हजार कोटी रुपये जाहीर करत असल्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली.यावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी टीका केली आहे.

मुंबई : राज्यात अतिवृष्टीमुळे पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि कोकणात झालेल्या नुकसानीसाठी भरपाई म्हणून 10 हजार कोटी रुपये राज्य सरकारने जाहीर केले आहेत. यावर विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी टीका केली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपला शब्द फिरवत आज जाहीर केलेले पॅकेज हे अतिशय फसवे असल्याचा आरोप फडणवीस यांनी केला आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून आजच्या पॅकेजवर फडणवीस यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

बळीराजाला अतिशय तोकडी मदत देताना, त्यांनी निव्वळ बहाणे शोधले. शेतकर्‍यांचे झालेले प्रचंड नुकसान पाहता त्यांनी जाहीर केलेली मदत ही तोंडाला पाने पुसणारी आहे. यापूर्वी ₹25,000 आणि 50,000 रूपये हेक्टरी मदतीची मागणी त्यांनीच केली होती. फळबागांसाठी तर एक लाखांपर्यंत मदत त्यांनी मागितली होती. पण, आता ती मदत द्यायची नाही, म्हणून केंद्र सरकारवर जबाबदारी ढकलण्याचा केविलवाणा प्रयत्न ते करीत आहेत.

अतिवृष्टीग्रस्तांसाठी 10 हजार कोटींची मदत, मुख्यमंत्र्यांची घोषणा

नियमित अर्थसंकल्पातील आकड्यांनाच पॅकेज भासवून मलमपट्टी केल्याचा आव सरकार आणू पाहत आहे. पण, केवळ देखावा निर्माण करून शेतकर्‍यांना अजिबात मदत मिळणार नाही. बहाणेबाजी करून महाविकास आघाडी सरकारने शेतकर्‍यांची घोर निराशा केली, फसवणूक केली. किमान शेतकर्‍यांच्या बाबतीत तरी आणि झालेल्या नुकसानीची तीव्रता पाहता अशा काल्पनिक आकड्यांची धूळफेक मुख्यमंत्री करतील, असे वाटले नव्हते. हा शेतकर्‍यांसोबत झालेला मोठा विश्वासघात आहे. निसर्गाने तर अन्याय केलाच, आता सरकारही सूड घेत आहे.

सरकारने तुटपुंजी मदत जाहीर केली : चंद्रकांत पाटील

कधी नव्हे ते मुख्यमंत्री उद्धव ठाकरे बाहेर पडले होते, भरीव मदत मिळेल असं वाटलं होतं. पण सरकारने तुटपुंजी मदत जाहीर केली आहे. सरकारच्या अपुऱ्या मदतीने शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली म्हणत राज्य सरकारवर चंद्रकांत पाटील यांनी टीका केली आहे. केंद्राकडून जीएसटी भरपाई किती रक्कम मिळणार आहे हे आधी ठरवा, महाविकास आघाडीत एकवाक्यता नाही, कुणी म्हणतंय 38 हजार कोटी, कुणी 60 हजार कोटी. पण जीएसटी भरपाई, शेतकरी मदत ही तुलना बरोबर नाही, अशी टीकाही त्यांनी केली.

सरकारच्या दहा हजार कोटी रुपयांमध्ये शेती, घरांसाठी, रस्ते-पुलाचं बांधकाम, पाणी पुरवठा याचा समावेश आहे.

रस्ते- पूल - 2635 कोटी नगर विकास - 300 कोटी महावितरण ऊर्जा - 239 कोटी जलसंपदा - 102 कोटी ग्रामीण रस्ते व पाणीपुरवठा - 1000 कोटी कृषी-शेती-घरासाठी - 5500 कोटी

Relief Package for Rain-Hit Areas | अतिवृष्टीग्रस्तांसाठी सरकारकडून 10 हजार कोटींची मदत जाहीर

महत्त्वाच्या बातम्या

Horoscope Today 20 October 2026: आज दसऱ्याचा दिवस 7 राशींसाठी भाग्याचा! दुर्मिळ योग जुळले, कोणाचं नशीब चमकणार? आजचे राशीभविष्य..
आज दसऱ्याचा दिवस 7 राशींसाठी भाग्याचा! दुर्मिळ योग जुळले, कोणाचं नशीब चमकणार? आजचे राशीभविष्य..
Gokul Election Result 2026 : गोकुळ कोल्हापूरची अस्मिता, त्याचे निर्णय कोल्हापूरमध्येच झाले पाहिजेत, गोकुळ निवडणूक जिंकताच सतेज पाटील म्हणाले...
98 मतं बाद झाली नसती तर आमचे 20 उमेदवार जिंकले असते, गोकुळ निवडणूक जिंकताच सतेज पाटील काय म्हणाले?
आमचा रांगडा पाटील जिंकला, धैर्यशील मोहिते पाटील म्हणाले; आता, शिक्षक-पदवीधरचं सोनंही आम्हीच लुटणार
आमचा रांगडा पाटील जिंकला, धैर्यशील मोहिते पाटील म्हणाले; आता, शिक्षक-पदवीधरचं सोनंही आम्हीच लुटणार
ABP Majha Top 10, 19 October 2026 : आजच्या ठळक बातम्या, Breaking News Today, संध्याकाळच्या ताज्या बातम्या, वाचा एबीपी माझाच्या संध्याकाळच्या टॉप १० हेडलाईन्स - Evening
ABP Majha Top 10, 19 October 2026 : आजच्या ठळक बातम्या, Breaking News Today, संध्याकाळच्या ताज्या बातम्या, वाचा एबीपी माझाच्या संध्याकाळच्या टॉप १० हेडलाईन्स - Evening

व्हिडीओ

Mumbai Police PC On Tiger Shroff Firing : टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरण, पोलिसांची ईनडिटेल प्रेस | ABP Majha
Kolhapur Gokul : गोकुळ दूध संघाच्या मतमोजणीला वेग; दुसरी फेरी सुरू
Anandache Paan : 'आठवणींची साठवण' आणि 'सहवास प्रतिभावंतांचा', लेखक अशोक कोठावळे यांच्यासोबत संवाद
Mann Suddha Tujha Season 3 : युरेका...युरेका | मन सुद्ध तुझं | Episode 3 | ABP Majha
Shetitil Navdurga | Seema Chavan | पिकं बदलत गेली… पण भरघोस उत्पन्नाचा तिचा ध्यास कधीच बदलला नाही!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Satej Patil : गोकुळच्या निवडणुकीत महायुतीला फटका, सतेज पाटलांच्या विजयाची इनसाईड स्टोरी, सहा प्रमुख मुद्दे
गोकुळच्या निवडणुकीत महायुतीला फटका, सतेज पाटलांच्या विजयाची इनसाईड स्टोरी, सहा प्रमुख मुद्दे
Elon Musk : इलॉन मस्क यांची मोठी घोषणा, अमेरिकेतील प्रत्येक मुलाला SpaceX चा एक शेअर देणार, मस्क यांच्या घोषणेचं नेमकं कारण काय?
इलॉन मस्क यांची मोठी घोषणा, अमेरिकेतील प्रत्येक मुलाला SpaceX चा एक शेअर देणार 
Gokul Election Result: कोल्हापूरकरांचा विषयच हार्ड! जयंत पाटील यांची गोकुळच्या निकालावर पोस्ट, सतेज पाटील यांचं अभिनंदन
कोल्हापूरकरांचा विषयच हार्ड! जयंत पाटील यांची गोकुळच्या निकालावर पोस्ट, सतेज पाटील यांचं अभिनंदन
आमचा रांगडा पाटील जिंकला, धैर्यशील मोहिते पाटील म्हणाले; आता, शिक्षक-पदवीधरचं सोनंही आम्हीच लुटणार
आमचा रांगडा पाटील जिंकला, धैर्यशील मोहिते पाटील म्हणाले; आता, शिक्षक-पदवीधरचं सोनंही आम्हीच लुटणार
'गोकुळ'मध्ये महायुतीचा पराभव, मुलगाही पडला; मंत्री हसन मुश्रीफांची प्रतिक्रिया, सांगितलं परभवाचं राज'कारण'
'गोकुळ'मध्ये महायुतीचा पराभव, मुलगाही पडला; मंत्री हसन मुश्रीफांची प्रतिक्रिया, सांगितलं परभवाचं राज'कारण'
JIO IPO : जिओच्या आयपीओसाठी अँकर इन्वेस्टर्सची 30 पट मागणी, 8110 कोटींसाठी अडीच लाख कोटींची बोली, विदेशी आणि भारतीय फंड हाऊसेसचा दमदार प्रतिसाद
जिओच्या आयपीओसाठी अँकर इन्वेस्टर्सची 30 पट मागणी, विदेशी आणि भारतीय फंड हाऊसेसचा दमदार प्रतिसाद
“दहा हजार मते जर बाद होत असतील, तर अशा पदवीधर आणि शिक्षकांना पदवी कोणी दिली, हे तपासावे लागेल''; फडणवीसांची मश्किल टिपण्णी
“दहा हजार मते जर बाद होत असतील, तर अशा पदवीधर आणि शिक्षकांना पदवी कोणी दिली, हे तपासावे लागेल''; फडणवीसांची मश्किल टिपण्णी
Gokul Election Result Live: गोकुळच्या निवडणुकीत उलटफेर सुरुच, आता महायुतीचा उमेदवार फेरमतमोजणीत विजयी, एक जागा वाढली
Gokul Election Result Live: गोकुळच्या निवडणुकीत उलटफेर सुरुच, आता महायुतीचा उमेदवार फेरमतमोजणीत विजयी, एक जागा वाढली
Embed widget