(Source: ECI | ABP NEWS)
Devendra Fadanvis : देवेंद्र फडणवीसांनी शब्द पाळला, नक्षलवादी भूपती शरण आला, 60 नक्षलवाद्यांच्या समर्पणाची इनसाईड स्टोरी
Devendra Fadnavis on Gadchiroli Naxal Surrender : भूपती याने त्याच्या 60 सहकाऱ्यांसह आज गडचिरोलीत आत्मसमर्पण केलंय. मात्र भूपतीने शरणागती पत्करण्यापूर्वी एक अट घातली होती.

Gadchiroli Naxalites News : माओवाद विरोधातील लढ्याला आज (15 ऑक्टोबर ) मोठं यश प्राप्त झाले आहे. माओवाद्यांचा पॉलिट ब्युरो मेंबर तसेच सेंट्रल कमिटी मेंबर मल्लोजूला वेणुगोपाल राव (Venugopal Rao) उर्फ सोनू उर्फ भूपती याने त्याच्या 60 सहकाऱ्यांसह आज गडचिरोलीत आत्मसमर्पण केलंय. राज्याचे गृहमंत्री आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या उपस्थितीत हा औपचारिक आत्मसमर्पण सोहळा गडचिरोलीत पार पडला आहे. असे असताना, भूपतीने शरणागती पत्करण्यापूर्वी एक अट घातली होती, की तो शरणागती फक्त महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांच्या समोर पत्करेल आणि मुख्यमंत्र्यांनीही आज त्यांचे सर्व प्रमुख कार्यक्रम बाजूला ठेवले आणि जो शब्द भूपतीला दिला होता, तो शब्द आज मुख्यमंत्र्यानी गडचिरोलीला (Gadchiroli) येऊन पाळला आहे.
Devendra Fadnavis : मुख्यमंत्र्यांनी भूपतीला दिलेला शब्द पाळला
भूपती शरण येऊ शकतो, मात्र तो तेलंगणाला शरण जाईल किंवा छत्तीसगडला तो शरणागती पत्करेल, अशी शक्यता व्यक्त केली जात असताना, भूपतीने महाराष्ट्र पोलिसांसमोर शरण जाणे मान्य केले. गेले काही दिवस मध्यस्तांच्या माध्यमातून भूपती आणि त्यांच्या सहकाऱ्यांसोबत चर्चा सुरू होती. शासनाला शरण गेल्याने आणि शस्त्रे खाली ठेवून समाजाच्या मुख्य प्रवाहात गेल्याने काय फायदे होतील हे समजवण्यात पोलीस आणि त्यांचे मध्यस्थ यशस्वी ठरले. मात्र, भूपतीने शरणागती पत्करण्यापूर्वी एक अट घातली होती, की तो शरणागती फक्त महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांच्या समोरास पत्करेल आणि मुख्यमंत्र्यांनीही भूपतीने शरणगतीचा निर्णय घेतल्यानंतर आज त्यांचे सर्व प्रमुख कार्यक्रम बाजूला ठेवले आणि महाराष्ट्राच्या वतीने पोलीस आणि त्यांच्या मध्यस्थांनी जो शब्द भूपतीला दिला होता, तो शब्द आज मुख्यमंत्री गडचिरोलीला येऊन पाळला आहे.
Who is Naxal Leader Bhupati: माओवाद्यांचा टॉप माओवादी नेता भूपती नेमका कोण?
माओवाद्यांचा पॉलिट ब्युरो मेंबर तसेच सेंट्रल कमिटी मेंबर मल्लोजूला वेणुगोपाल राव (Venugopal Rao) उर्फ सोनू उर्फ भूपती हा नक्षल चळवळीतील मेंदू समाजाला जातो. त्याने 2 नोव्हेंबर 1980 रोजी गडचिरोली जिल्ह्यातील मोयाबिनपेठा येथे सीआरपीएफ आणि माओवाद्यांमध्ये पहिली चकमक झाली होती. तेव्हा तत्कालीन सीरपूर दलमचा पेद्दी शंकर हा माओवादी कमांडर ठार झाला होता. आणि तेव्हाच माओवाद्यांविरोधातला पहिला गुन्हा दाखल झाला होता. त्यानंतर 1982 मध्ये गडचिरोली जिल्ह्यातील सिरोंचा जवळील अमरादी या गावात माओवाद्यांनी पहिल्यांदा सामान्य व्यक्ती वर हल्ला केला होता. तेव्हा त्या भागातील शिक्षक राजू मास्टर यांचा उजवा हात माओवाद्यांनी कापला होता.
1980 पासून 2025 पर्यंतमहाराष्ट्रातील माओवादाची आकडेवारी
दरम्यान, 1980 पासून गडचिरोलीत सुरू झालेल्या माओवाद सशस्त्र चळवळीत आजवर माओवाद्यांनी 538 सामान्य नागरिकांचे जीव घेतले आहे.
आजवर 4213 माओवादी यांना अटक करण्यात आली आहे.
तर 1522 माओवादी पोलिसांना शरण आले आहे.
तर 347 माओवाद्यांना ठार मारण्यात पोलिसांना यश आले आहे.
आणखी वाचा
























