Naxal Leader Bhupati : 6 कोटींचं बक्षीस, नक्षल चळवळीचा मास्टरमाईंड; पोलिसांना शरण आलेला माओवाद्यांचा टॉप माओवादी नेता भूपती नेमका कोण?
गडचिरोली पोलीस मुख्यालयमध्ये माओवाद्यांच्या शरणागती संदर्भातली तयारी पूर्ण झाली असून पोलीस मुख्यालयमध्ये मुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या समक्ष 61 माओवाद्यांचा आत्मसमर्पण पार पडणार आहे.

Who is Naxal Leader Bhupati : माओवाद विरोधातल्या लढ्यात एक मोठा विजय गडचिरोली पोलिसांना मिळाला आहे. कुठल्याही रक्तपाता शिवाय 61 माओवाद्यांनी शास्त्र खाली ठेवत पोलीसांपुढे आत्मसमर्पणाचा मार्ग निवडला आहे. गडचिरोलीत (Gadchiroli) माओवादी नेता मल्लोजुला वेणुगोपाल राव (Mallojula Venugopal Rao) याच्या मोठ्या आत्मसमर्पणानंतर महाराष्ट्रातून सशस्त्र माओवाद लवकरच हद्दपार होण्याची शक्यता आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) हे आज या आत्मसमर्पण कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. 'सशस्त्र माओवादाचा मार्ग सोडून सरकारसोबत शांतता वार्ता करून मुख्य प्रवाहात यावे', अशी भूमिका माओवादी नेता सोनू उर्फ भूपतीने मांडली होती. अशातच आज त्याच्यासह 60 हून अधिक सहकाऱ्यांनी गडचिरोली पोलिसांसमोर (Gadchiroli Police) आत्मसर्मपण केले आहे.
Mallojula Venugopal Rao Surrender: गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या समक्ष 61 माओवाद्यांचा आत्मसमर्पण
दरम्यान, गडचिरोली पोलीस मुख्यालय मध्ये माओवाद्यांच्या शरणागती संदर्भातली तयारी पूर्ण झाली असून गडचिरोली पोलीस मुख्यालय मध्ये मुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या समक्ष 61 माओवाद्यांचा आत्मसमर्पण पार पडणार आहे, या वेळेस शरण आलेले माओवादी मोठ्या संख्येने त्यांचा शस्त्रसाठा सुद्धा मुख्यमंत्र्यांसमोर खाली ठेवणार आहे. भूपती उर्फ सोनू सोबत दोन जहाल माओवादी ही आज त्यांचे शस्त्र खाली ठेवणार आहे. त्यामुळे माओवाद विरोधातल्या लढ्यात एक मोठा विजय गडचिरोली पोलिसांनी कुठल्याही रक्तपाता शिवाय मिळवला आहे.
Mallojula Venugopal Rao : 6 कोटींचं बक्षीस, नक्षल चळवळीचा मास्टरमाईंड
मिळलेल्या माहितीनुसार, काल (14 ऑक्टोबर) रात्री दक्षिण गडचिरोली जिल्ह्यातील घनदाट जंगलात छत्तीसगड सीमेलगत महाराष्ट्राच्या बाजूने हे सामूहिक आत्मसमर्पण झाले आहे. परिणामी गडचिरोलीच्या इतिहासातील हि आजवरची सर्वांत मोठी शरणागती असल्याचे बोललं जात आहे. माओवाद्यांचा पॉलिट ब्युरो मेंबर तसेच सेंट्रल कमिटी मेंबर मल्लोजूला वेणुगोपाल राव (Venugopal Rao) उर्फ सोनू उर्फ भूपती हा नक्षल चळवळीतील मेंदू समाजाला जातो. त्याने 2 नोव्हेंबर 1980 रोजी गडचिरोली जिल्ह्यातील मोयाबिनपेठा येथे सीआरपीएफ आणि माओवाद्यांमध्ये पहिली चकमक झाली होती. तेव्हा तत्कालीन सीरपूर दलमचा पेद्दी शंकर हा माओवादी कमांडर ठार झाला होता. आणि तेव्हाच माओवाद्यांविरोधातला पहिला गुन्हा दाखल झाला होता. त्यानंतर 1982 मध्ये गडचिरोली जिल्ह्यातील सिरोंचा जवळील अमरादी या गावात माओवाद्यांनी पहिल्यांदा सामान्य व्यक्ती वर हल्ला केला होता. तेव्हा त्या भागातील शिक्षक राजू मास्टर यांचा उजवा हात माओवाद्यांनी कापला होता.
1980 पासून 2025 पर्यंत महाराष्ट्रातील माओवादाची आकडेवारी
आजवर 4213 माओवादी यांना अटक करण्यात आली आहे.
तर 1522 माओवादी पोलिसांना शरण आले आहे.
तर 347 माओवाद्यांना ठार मारण्यात पोलिसांना यश आले आहे.
आणखी वाचा























