एक्स्प्लोर

Chhatrapati Sambhaji Nagar : संभाजीनगरला हादरवून टाकणाऱ्या संकेत कुलकर्णी खून प्रकरणातील मुख्य आरोपीला जन्मठेप

Chhatrapati Sambhaji Nagar : या प्रकरणातील संकेतचे इतर साथीदार असलेल्या तिघांना संशयाचा फायदा देऊन निर्दोष मुक्त करण्यात आले आहे. 

Chhatrapati Sambhaji Nagar Crime News: मराठवाड्यासह छत्रपती संभाजीनगर शहराला (Chhatrapati Sambhaji Nagar City) हादरवून टाकणाऱ्या संकेत कुलकर्णी खून खटल्याची सुनावणी पूर्ण झाल्यावर अखेर आज न्यायालयाने निकाल सुनावला आहे. आज बुधवारी (31 मे) रोजी जिल्हा आणि सत्र न्यायालयाने मुख्य आरोपी संकेत जायभायला जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. तर या प्रकरणातील संकेतचे इतर साथीदार असलेल्या तिघांना संशयाचा फायदा देऊन निर्दोष मुक्त करण्यात आले आहे. 

23 मार्च 2018 रोजी कामगार चौकाजवळ भररस्त्यात संकेत कुलकर्णी नावाच्या तरुणाच्या अंगावर प्रेम प्रकरणावरून पाच ते सहा वेळा कार घालून, चिरडून त्याची हत्या करण्यात आली होती. भर दुपारी साडेतीन ते चार वाजता घडलेल्या या घटनेने छत्रपती संभाजीनगर शहर हादरून गेले होते. संकेत कुलकर्णी याला कारखाली चिरडल्यानंतर आरोपी संकेत जायभाय घटनास्थळावरून त्याच्या साथीदारासह पळून गेला होता. त्यानंतर संकेतला त्याच्या सोबतच्या मित्रांनी जखमी अवस्थेत घाटी रुग्णालयात दाखल केले असता त्याला डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले होते. विशेष म्हणजे ही सर्व घटना सीसीटीव्हीत कैद झाली होती. 

सरकारी पक्षाने 22 साक्षीदार तपासले

दरम्यान या घटनेतील मुख्य आरोपी संकेत जायभाये याच्यासह त्याचे साथीदार संकेत मचे, उमर पटेल आणि विजय जोग यांच्यावर पोलिसांनी गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली होती. पुढे पोलिसांनी त्यांच्याविरोधात न्यायालयात खटला भरला होता. मुकुंदवाडी पोलिसांनी तपास पूर्ण करून आरोपींविरोधात न्यायालयात आरोप पत्र दाखल केले होते. शहराला हादरून टाकणाऱ्या या खून प्रकरणात शासनाने विशेष सरकारी वकील ॲड. उज्ज्वल निकम यांची नियुक्ती केली होती. तेव्हापासून न्यायालयात यावर सुनावणी सुरु होती. तर सरकारी पक्षाने 22 साक्षीदार तपासले होते.

दरम्यान, या खटल्याची सुनावणी न्यायमूर्ती डी. एच. केळुसकर यांच्या समोर नुकतीच पूर्ण झाली होती आणि न्यायालयाने निकाल राखीव ठेवला होता. तर यावर आज निकाल देतांना न्यायालयाने मुख्य आरोपी संकेत जायभायला जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. तर या प्रकरणातील संकेतचे इतर साथीदार असलेल्या तिघांना संशयाचा फायदा देऊन निर्दोष मुक्त करण्यात आले आहे. ॲड. निकम यांना जिल्हा सरकारी वकील अविनाश देशपांडे, ॲड. सिद्धार्थ वाघ यांनी साहाय्य केले. तसेच बचाव पक्षाच्या वतीने ॲड. राजेश काळे, ॲड. नीलेश घाणेकर, ॲड. भाले, ॲड. दळवी यांनी बाजू मांडली होती. 

इतर महत्वाच्या बातम्या: 

औरंगाबाद शहराला हादरवून टाकणाऱ्या संकेत कुलकर्णी खून खटल्याची बुधवारी अंतिम सुनावणी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

आधी उद्धव ठाकरे, नंतर शिंदेंची शिवसेना अन् अजितदादांच्या राष्ट्रवादीने गद्दारी केली, संभाजीराजेंचा हल्लाबोल, महायुतीसह मविआला सुनावलं
आधी उद्धव ठाकरे, नंतर शिंदेंची शिवसेना अन् अजितदादांच्या राष्ट्रवादीने गद्दारी केली, संभाजीराजेंचा हल्लाबोल, महायुतीसह मविआला सुनावलं
The Nobel Prize Nihon Hidankyo : हिरोशिमा आणि नागासाकी अण्वस्त्र हल्ल्यात वाचलेल्यांचा अण्वस्त्रांविरोधात लढा! 'हिबाकुशां'च्या अविरत लढ्याला नोबेलच्या 'शांततेचं' कोंदण
हिरोशिमा आणि नागासाकी अण्वस्त्र हल्ल्यात वाचलेल्यांचा अण्वस्त्रांविरोधात लढा! 'हिबाकुशां'च्या अविरत लढ्याला नोबेलच्या 'शांततेचं' कोंदण
Bopdev Ghat Incident: बोपदेव घाटात मुलीवर सामूहिक अत्याचार करणारे तिन्ही नराधम पोलिसांच्या ताब्यात, 9 दिवसांनी पोलिसांना मोठं यश
बोपदेव घाटात मुलीवर सामूहिक अत्याचार करणारे तिन्ही नराधम पोलिसांच्या ताब्यात, 9 दिवसांनी पोलिसांना मोठं यश
मरावे परी किर्तीरुपी उरावे....  रतन टाटांच्या अंत्यविधीला 24 तास उलटण्यापूर्वी कामगारांना दिवाळी बोनस
मरावे परी किर्तीरुपी उरावे.... रतन टाटांच्या अंत्यविधीला 24 तास उलटण्यापूर्वी कामगारांना दिवाळी बोनस
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Ajit Pawar Press Conference Update : अजितदादांच्या पत्रकार परिषदेत कुणाचा पक्षप्रवेश होणार?ABP Majha Marathi News Headlines 3PM TOP Headlines 3 PM 09 October 2024Majha Krushi Vision : युवकांना खुणावतोय शेती स्टार्टअपचा पर्याय : ABP MajhaABP Majha Headlines :  2 PM : 11 ऑक्टोबर 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
आधी उद्धव ठाकरे, नंतर शिंदेंची शिवसेना अन् अजितदादांच्या राष्ट्रवादीने गद्दारी केली, संभाजीराजेंचा हल्लाबोल, महायुतीसह मविआला सुनावलं
आधी उद्धव ठाकरे, नंतर शिंदेंची शिवसेना अन् अजितदादांच्या राष्ट्रवादीने गद्दारी केली, संभाजीराजेंचा हल्लाबोल, महायुतीसह मविआला सुनावलं
The Nobel Prize Nihon Hidankyo : हिरोशिमा आणि नागासाकी अण्वस्त्र हल्ल्यात वाचलेल्यांचा अण्वस्त्रांविरोधात लढा! 'हिबाकुशां'च्या अविरत लढ्याला नोबेलच्या 'शांततेचं' कोंदण
हिरोशिमा आणि नागासाकी अण्वस्त्र हल्ल्यात वाचलेल्यांचा अण्वस्त्रांविरोधात लढा! 'हिबाकुशां'च्या अविरत लढ्याला नोबेलच्या 'शांततेचं' कोंदण
Bopdev Ghat Incident: बोपदेव घाटात मुलीवर सामूहिक अत्याचार करणारे तिन्ही नराधम पोलिसांच्या ताब्यात, 9 दिवसांनी पोलिसांना मोठं यश
बोपदेव घाटात मुलीवर सामूहिक अत्याचार करणारे तिन्ही नराधम पोलिसांच्या ताब्यात, 9 दिवसांनी पोलिसांना मोठं यश
मरावे परी किर्तीरुपी उरावे....  रतन टाटांच्या अंत्यविधीला 24 तास उलटण्यापूर्वी कामगारांना दिवाळी बोनस
मरावे परी किर्तीरुपी उरावे.... रतन टाटांच्या अंत्यविधीला 24 तास उलटण्यापूर्वी कामगारांना दिवाळी बोनस
Praniti Shinde : हरियाणामध्ये जे झालं ते महाराष्ट्रात अजिबात होणार नाही; खासदार प्रणिती शिंदेंनी सांगितला मास्टरप्लॅन!
हरियाणामध्ये जे झालं ते महाराष्ट्रात अजिबात होणार नाही; खासदार प्रणिती शिंदेंनी सांगितला मास्टरप्लॅन!
मोठी बातमी ! यंदाचा शांततेचा नोबेल पुरस्कार जाहीर; निहॉन हिदानक्यो या जपानी संस्थेला बहुमान
मोठी बातमी ! यंदाचा शांततेचा नोबेल पुरस्कार जाहीर; निहॉन हिदानक्यो या जपानी संस्थेला बहुमान
Rohit Pawar: अजितदादांकडून पाठीवर कौतुकाची थाप पडताच रोहित पवार म्हणाले...
Rohit Pawar: अजितदादांकडून पाठीवर कौतुकाची थाप पडताच रोहित पवार म्हणाले...
दीक्षाभूमीकडे येणाऱ्या अनुयायांकडून टोल घेऊ नका; प्रकाश आंबेडकरांचे मुख्यमंत्री शिंदेंना पत्र
दीक्षाभूमीकडे येणाऱ्या अनुयायांकडून टोल घेऊ नका; प्रकाश आंबेडकरांचे मुख्यमंत्री शिंदेंना पत्र
Embed widget