एक्स्प्लोर

मंदिराला वाचवण्यासाठी नव्हे तर स्वत:ला वाचवण्यासाठीच खासदार इम्तियाज मंदिरात; सकल हिंदू एकीकरण समितीचा दावा

Chhatrapati Sambhaji Nagar : सकल हिंदू एकीकरण समितीने पत्रकार परिषेद घेऊन आता नवीन दावा केला आहे.

Chhatrapati Sambhaji Nagar News : रामनवमीच्या आदल्या दिवशी किराडपुरा भागात झालेल्या दोन गटातील वादावर सकल हिंदू एकीकरण समितीने पत्रकार परिषद घेऊन आता नवीन दावा केला आहे. एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील (Imtiyaz Jaleel) हे त्या रात्री राममंदिर वाचवण्यासाठी प्रयत्न करत असल्याचा दावा चुकीची असून, ते स्वत:ला वाचवण्यासाठी मंदिरात गेले होते अशी माहिती सकल हिंदू एकीकरण समितीकडून देण्यात आली आहे. तर त्या दिवशी झालेला राडा आपसातील दोन गटांतील लोकांमुळे झाला होता. त्यामुळे याला हिंदू-मुस्लिम वाद म्हणता येणार नाही, असे शिंदे गटाच्या शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र जंजाळ यांनी म्हटले आहे. सकल हिंदू एकीकरण समितीतर्फे मंगळवारी (4 मार्च)  रोजी पत्रकार परिषद घेण्यात आली. यावेळी मराठा आरक्षण याचिकाकर्ते विनोद पाटील, शिवसेना जिल्हाध्यक्ष राजेंद्र जंजाळ, भाजप नगरसेवक शिवाजी दांडगे, मनसे जिल्हाध्यक्ष सुमित खांबेकर आदींची उपस्थिती होती.

दरम्यान यावेळी बोलताना जंजाळ म्हणाले की, बुधवारी रात्री किराडपुरा येथे झालेला वाद आपसातील दोन गटांतील लोकांमुळे झाला होता. सुरवातीला झालेला वाद तत्काळ मिटवला गेला होता. तर त्यावेळी तिथे उपस्थित असलेले खासदार जलील यांना त्यांचाच जमाव दगड मारायला लागला, म्हणून ते राममंदिर परिसरातील पोलिस चौकीत पळाले होते. तसेच राममंदिर पोलिसांनी वाचवले, जलील यांनी नाही. तर राडा सुरु असताना आपण जलील यांना आपण फोन करून, ‘तुम्ही मंदिरात काय करताय? तिथे काय झालंय?’ हे मी विचारले तर, ते म्हणाले, ‘मंदिराला धक्का नाही. मात्र बाहेर वाद सुरूय, असे जलील यांनी उत्तर दिले होते असेही जंजाळ म्हणाले. 

आरोपींची धरपकड सुरु...

दरम्यान छत्रपती संभाजीनगरच्या किराडपुरा भागात झालेल्या राड्याप्रकरणी पोलिसांनी 400 पेक्षा अधिक लोकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर आतापर्यंत 80 पेक्षा अधिक लोकांची ओळख पटली असून, 42 हल्लेखोरांना ताब्यात घेण्यात आले आहे. तर इतर आरोपींच्या शोधात तब्बल 22 पथक नियुक्त करण्यात आले आहे. तर सीसीटीव्हीच्या माध्यमातून आरोपींची ओळख पटवण्याचे काम सुरु असून, त्यानुसार आरोपींना अटक करण्यात येत आहे. तर अनेक आरोपी भूमिगत झाले आहेत. परंतु जिल्ह्याबाहेर गेलेल्या आरोपींना देखील शोधून बेड्या ठोकण्याचे काम पोलीस पथकाकडून सुरु आहे. तर लवकरच मोठ्याप्रमाणावर आरोपी ताब्यात घेण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे. 

इतर महत्वाच्या बातम्या : 

Chhatrapati Sambhaji Nagar : छत्रपती संभाजीनगरच्या कन्नडमध्ये दोन गटात वाद; अफवांवर विश्वास ठेवू नका, पोलीस अधीक्षकांचे आवाहन

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

विधानसभेची खडाजंगी: सोलापूर मध्यमधून काँग्रेसची जादू चालणार की आडम मास्तरांना मताधिक्य मिळणार? कोण मारणार बाजी
विधानसभेची खडाजंगी: सोलापूर मध्यमधून काँग्रेसची जादू चालणार की आडम मास्तरांना मताधिक्य मिळणार? कोण मारणार बाजी
Rohit Pawar : शरद पवार राजकारणातील वस्तादांचे वस्ताद,  रोहित पवारांचं आजोबांसमोर धडाकेबाज भाषण, राम शिंदेंवर डागली तोफ
शरद पवार राजकारणातील वस्तादांचे वस्ताद, रोहित पवारांचं आजोबांसमोर धडाकेबाज भाषण, राम शिंदेंवर डागली तोफ
नाशिकमध्ये नामांकित हॉटेलवर निवडणूक अधिकाऱ्यांचा छापा, कोऱ्याकरकरीत नोटांच्या बंडलांनी भरलेली बॅग सापडली
नाशिकमध्ये नामांकित हॉटेलवर निवडणूक अधिकाऱ्यांचा छापा, कोऱ्याकरकरीत नोटांच्या बंडलांनी भरलेली बॅग सापडली
Sanjay Raut: 23 तारखेनंतर फडणवीस-शिंदेंना पोलीस ठाण्यात हेलपाटे मारावे लागतील, दयामाया दाखवणार नाही: संजय राऊत
23 तारखेनंतर देवेंद्र फडणवीस-एकनाथ शिंदेंचा वेळ पोलीस ठाण्यात हेलपाटे घालण्यात जाईल: संजय राऊत
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Bala Nandgaonkar Full Speech : भर उन्हात बसून राज ठाकरेंनी ऐकलं बाळा नांदगावकर यांचं भाषणABP Majha Headlines : 01 PM : 18 नोव्हेंबर 2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सRahul Gandhi Mumbai PC : धारावी ते अदानी; मुंबईच्या पत्रकार परिषदेत राहुल गांधी काय म्हणाले?Abdul Sattar यांना धक्का, MIDC तील भूखंड सत्तारांच्या संस्थेला देण्याचा प्रस्ताव प्रशासनाने फेटाळला

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
विधानसभेची खडाजंगी: सोलापूर मध्यमधून काँग्रेसची जादू चालणार की आडम मास्तरांना मताधिक्य मिळणार? कोण मारणार बाजी
विधानसभेची खडाजंगी: सोलापूर मध्यमधून काँग्रेसची जादू चालणार की आडम मास्तरांना मताधिक्य मिळणार? कोण मारणार बाजी
Rohit Pawar : शरद पवार राजकारणातील वस्तादांचे वस्ताद,  रोहित पवारांचं आजोबांसमोर धडाकेबाज भाषण, राम शिंदेंवर डागली तोफ
शरद पवार राजकारणातील वस्तादांचे वस्ताद, रोहित पवारांचं आजोबांसमोर धडाकेबाज भाषण, राम शिंदेंवर डागली तोफ
नाशिकमध्ये नामांकित हॉटेलवर निवडणूक अधिकाऱ्यांचा छापा, कोऱ्याकरकरीत नोटांच्या बंडलांनी भरलेली बॅग सापडली
नाशिकमध्ये नामांकित हॉटेलवर निवडणूक अधिकाऱ्यांचा छापा, कोऱ्याकरकरीत नोटांच्या बंडलांनी भरलेली बॅग सापडली
Sanjay Raut: 23 तारखेनंतर फडणवीस-शिंदेंना पोलीस ठाण्यात हेलपाटे मारावे लागतील, दयामाया दाखवणार नाही: संजय राऊत
23 तारखेनंतर देवेंद्र फडणवीस-एकनाथ शिंदेंचा वेळ पोलीस ठाण्यात हेलपाटे घालण्यात जाईल: संजय राऊत
Sanjay Raut : संजय राऊत गटारातला बेडूक, मोदी-शाहांना गाडण्याची भाषा करणाऱ्या राऊतांवर भाजपचा हल्लाबोल
संजय राऊत गटारातला बेडूक, मोदी-शाहांना गाडण्याची भाषा करणाऱ्या राऊतांवर भाजपचा हल्लाबोल
Vidhan Sabha 2024 : यंदाच्या विधानसभा निवडणुकीत शरद पवारांना यश मिळणार? कुंडली पाहून ज्योतिषाचार्यांनी भविष्य सांगितलं
यंदाच्या विधानसभा निवडणुकीत शरद पवारांना यश मिळणार? ज्योतिषाचार्यांचं भाकित
Sanjay Raut on Raj Thackeray : मला तुमची खुर्ची नको, मी तुमची खाट टाकेन! राज ठाकरेंची राजकीय अंत्ययात्रा काढू : संजय राऊत
मला तुमची खुर्ची नको, मी तुमची खाट टाकेन! राज ठाकरेंची राजकीय अंत्ययात्रा काढू : संजय राऊत
Viral Video : इंग्लिश बोलताना सगळं भूर्रर्रर्र.... पाकिस्तानी कॅप्टनची दांडी गुल; भाऊ काय बोलला कोणाला कळलच नाय! व्हिडीओ पाहाच
इंग्लिश बोलताना सगळं भूर्रर्रर्र.... पाकिस्तानी कॅप्टनची दांडी गुल; भाऊ काय बोलला कोणाला कळलच नाय! व्हिडीओ पाहाच
Embed widget