एक्स्प्लोर

छत्रपती संभाजीनगरच्या कन्नडमध्ये दोन गटात वाद; अफवांवर विश्वास ठेवू नका, पोलीस अधीक्षकांचे आवाहन

Chhatrapati Sambhaji Nagar : या प्रकरणी आठ आरोपींना अटक करण्यात आली आहे आणि इतरांचा शोध कन्नड शहर पोलीस घेत आहेत.  

Chhatrapati Sambhaji Nagar News : छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhaji Nagar) जिल्ह्यातील कन्नड तालुक्यातील अंधानेर येथील एक व्यक्तीने संध्याकाळच्या सुमारास त्याच्या मोबाईलवरुन एका समूदायाच्या धार्मिक भावना दुखावतील अशा स्वरूपाचे आक्षेपार्ह व्हिडीओ तयार करून त्याच्या इंस्ट्राग्राम अकाऊंटवरून प्रसारित केला होता. यावरुन सदर व्यक्तीच्या विरोधात पोलीस ठाणे कन्नड शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर या प्रसारित केलेल्या पोस्टमुळे अंधानेर गावातील काही तरुणांचे आपसांमध्ये भांडण होऊन हाणामारी झाल्याने या भांडणातील 20 ते 25 व्यक्ती विरोधात देखील गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर या प्रकरणी आठ आरोपींना अटक करण्यात आली आहे आणि इतरांचा शोध कन्नड शहर पोलीस घेत आहेत.  

कन्नड येथील अंधानेर गावात दोन गटात वाद झाल्याची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक मनिष कलवानिया, अपर पोलीस अधीक्षक सुनिल लांजेवार यांनी तात्काळ या ठिकाणी भेट देऊन परिसरातील नागरिकांना शांततेच आवाहन केले आहे. सर्व धर्मीय नागरिकांची शांतता समितीची बैठक घेऊन सामाजिक सौहार्द बिघडवणाऱ्या विरूध्द कठोर कारवाई करण्यात येत असल्याबाबत सांगितले. तसेच पोलीस सर्व परिस्थितीला हाताळण्यास सक्षम असून, अशा प्रकारे दोन समजात तेढ निर्माण करणाऱ्या व्यक्ती किंवा संघटनांची गय केली जाणार नाही, त्यांच्याविरूध्द कठोर आणि सक्त कारवाई करण्याबाबतचा इशारा दिला आहे. सध्या गावात शांतता असून, पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. 

वादाचे लोण ग्रामीण भागातही...

छत्रपती संभाजीनगर शहरातील किराडपुरा भागात दोन गटात वाद झाल्याने, दगडफेक आणि जाळपोळ झाल्याची घटना समोर आली होती. त्यानंतर दोन दिवसांनी ओहर गावात देखील दोन गटात वाद झाल्याने तणावाचे वातावरण पाहायला मिळाले. त्यानंतर आता वादाचे लोण ग्रामीण भागात देखील पसरले असून, कन्नडमध्ये दोन गटात वाद झाल्याचे समोर आले आहे. दरम्यान पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने कोणतेही मोठी दुर्घटना होऊ दिली नसून, गावात सध्या शांतता आहे. तर स्वतः पोलीस अधीक्षक यांनी गावात जाऊन पाहणी करत गावकऱ्यांना शांतता ठेवण्याचे आवाहन केले आहे. 

अन्यथा कठोर कारवाई केली जाईल... 

सोशल मिडीयाचा जबाबदारीने वापर करून तेढ निर्माण होईल अशा प्रकारच्या पोस्ट बनवू नये, फॉरवर्ड करू नये,  तसेच कोणत्याही पोस्टला प्रतिक्रिया देताना संयम बाळगावा, घाईने प्रत्युत्तर देतांना अपशब्दांचा वापर झाल्यास हासुध्दा अपराध आहे. गावातील नागरिकांनी जबाबदारीने गावहिताच्या दृष्टीने आपले वर्तन ठेवणे अत्यंत महत्वाचे आहे. गावातील सामाजिक सलोखा अबाधित राखण्यास गावातील प्रतिष्ठित, जेष्ठ नागरिक, व्यावसायीक यांनी प्रमुख भुमिका बजावणे अत्यंत महत्वाचे आहे. कोणताही व्यक्ती हा धार्मिक भावना दुखावेल अशी पोस्ट करत असेल तर त्याबाबत तात्काळ स्थानिक पोलीस ठाण्यास माहिती द्यावी त्याच्या विरोधात कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल परंतु कोणत्याही गैरसमजातुन कायदा हातात घेवुन गावातील शांतता भंग होईल असे कृत्य करून नये, असे आवाहन पोलीस अधीक्षक मनिष कलवानिया यांनी केले आहे.

इतर महत्वाच्या बातम्या : 

छ.संभाजीनगरमध्ये 'त्या' रात्री काय घडलं? महिला पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितला अंगावर शहारे आणणारा अनुभव

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Nanded : जाळ्यात पाय अडकला, मासे पकडण्यासाठी गेलेले दोन तरुण तळ्यात बुडाले, एकाचा मृत्यू तर दुसरा बेपत्ता; नांदेडमधील घटना 
मासे पकडण्यासाठी गेलेले दोन तरुण तळ्यात बुडाले, एकाचा मृत्यू तर दुसरा बेपत्ता; नांदेडमधील घटना 
Rolta India : अंधेरीतील 'रोल्टा इंडिया' कंपनीने कर्मचाऱ्यांचे कोट्यवधींचे वेतन थकवले, PF देखील भरला नाही; कर्मचाऱ्यांचा आरोप
अंधेरीतील 'रोल्टा इंडिया' कंपनीने कर्मचाऱ्यांचे कोट्यवधींचे वेतन थकवले, PF देखील भरला नाही; कर्मचाऱ्यांचा आरोप
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावरच; खासदार अशोक चव्हाणांनी दिले स्पष्ट संकेत, म्हणाले.. 
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावरच; खासदार अशोक चव्हाणांनी दिले स्पष्ट संकेत, म्हणाले.. 
Pune Crime News: पुण्यात अवैध पिस्तुलांचे मध्यप्रदेशात कनेक्शन समोर; पुणे पोलिसांच्या पुणे शाखेकडून 9 आरोपींसह 7 पिस्टल जप्त
पुण्यात अवैध पिस्तुलांचे मध्यप्रदेशात कनेक्शन समोर; पुणे पोलिसांच्या पुणे शाखेकडून 9 आरोपींसह 7 पिस्टल जप्त
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Gurdian Minister Hold News : नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्री पदाला स्थगिती,महायुतीतील वाद चव्हाट्यावरABP Majha Marathi News Headlines 11PM TOP Headlines 11 PM 19 January 2024Women kho kho world cup 2025 : पहिल्याच खो खो विश्वचषकात भारतीय महिला संघ विश्वविजेताDhananjay Munde Shirdi : अभिमन्यू, अर्जून आणि आश्वासन! खदखद, विनवणी, मुंडेंची कहाणी..

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nanded : जाळ्यात पाय अडकला, मासे पकडण्यासाठी गेलेले दोन तरुण तळ्यात बुडाले, एकाचा मृत्यू तर दुसरा बेपत्ता; नांदेडमधील घटना 
मासे पकडण्यासाठी गेलेले दोन तरुण तळ्यात बुडाले, एकाचा मृत्यू तर दुसरा बेपत्ता; नांदेडमधील घटना 
Rolta India : अंधेरीतील 'रोल्टा इंडिया' कंपनीने कर्मचाऱ्यांचे कोट्यवधींचे वेतन थकवले, PF देखील भरला नाही; कर्मचाऱ्यांचा आरोप
अंधेरीतील 'रोल्टा इंडिया' कंपनीने कर्मचाऱ्यांचे कोट्यवधींचे वेतन थकवले, PF देखील भरला नाही; कर्मचाऱ्यांचा आरोप
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावरच; खासदार अशोक चव्हाणांनी दिले स्पष्ट संकेत, म्हणाले.. 
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावरच; खासदार अशोक चव्हाणांनी दिले स्पष्ट संकेत, म्हणाले.. 
Pune Crime News: पुण्यात अवैध पिस्तुलांचे मध्यप्रदेशात कनेक्शन समोर; पुणे पोलिसांच्या पुणे शाखेकडून 9 आरोपींसह 7 पिस्टल जप्त
पुण्यात अवैध पिस्तुलांचे मध्यप्रदेशात कनेक्शन समोर; पुणे पोलिसांच्या पुणे शाखेकडून 9 आरोपींसह 7 पिस्टल जप्त
Israel-Hamas ceasefire in Gaza : इस्रायल आणि हमासमध्ये तब्बल 14 महिन्यांनी युद्धविराम; हमासने 3 इस्रायली ओलीसांची नावे पाठवली, आज मुक्तता केली जाणार
इस्रायल आणि हमासमध्ये तब्बल 14 महिन्यांनी युद्धविराम; हमासने 3 इस्रायली ओलीसांची नावे पाठवली, आज मुक्तता केली जाणार
Deepak Kedar : सैफ अली खानसाठी दया नायक कमरेला बंदूक लावून गेला, मग आम्हाला न्याय का नाही? पँथर सेनेच्या अध्यक्षांचा सवाल, धनंजय मुंडेंनाही डिवचलं!
सैफ अली खानसाठी दया नायक कमरेला बंदूक लावून गेला, मग आम्हाला न्याय का नाही? पँथर सेनेच्या अध्यक्षांचा सवाल, धनंजय मुंडेंनाही डिवचलं!
Manoj Jarange Patil : तर मुख्यमंत्र्यांचा सामना आमच्याशी, राज्य बंद करू; मनोज जरांगे पाटलांचा जनआक्रोश मोर्चातून इशारा
तर मुख्यमंत्र्यांचा सामना आमच्याशी, राज्य बंद करू; मनोज जरांगे पाटलांचा जनआक्रोश मोर्चातून इशारा
Beed Accident News: पोलीस भरतीचं स्वप्न भंगलं, सराव करणाऱ्या तीन तरुणांचा दुर्दैवी अंत; मृतांच्या नातेवाईकांना एसटीतर्फे 10 लाखाची मदत
पोलीस भरतीचं स्वप्न भंगलं, सराव करणाऱ्या तीन तरुणांचा दुर्दैवी अंत; मृतांच्या नातेवाईकांना एसटीतर्फे 10 लाखांची मदत
Embed widget