(Source: ECI/ABP News/ABP Majha)
मोठी बातमी! पैठण बाजार समिती मंत्री भुमरेंच्या ताब्यात, संपूर्ण 18 जागांवर विजय
Chhatrapati Sambhaji Nagar : पैठण तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या 18 संचालक पदासाठी झालेल्या निवडणुकीत सर्वच जागांवर शिवसेनेचे (शिंदे गट) उमेदवार निवडून आले आहे.
Chhatrapati Sambhaji Nagar : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण बाजार समितीचे निकाल जवळपास स्पष्ट झाले आहे. पैठण तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या 18 संचालक पदासाठी झालेल्या निवडणुकीत सर्वच जागांवर शिवसेनेचे (शिंदे गट) उमेदवार निवडून आले आहे. तर महाविकास आघाडीला 18 पैकी एकही जागा निवडून आणता आली नाही. त्यामुळे पैठण तालुक्यातील शिवसेनेचा बालेकिल्ला रोहयो मंत्री संदिपान भुमरे (Sandipan Bhumre) यांनी कायम ठेवला आहे. तर विरोधकांना पुन्हा एकदा मोठा धक्का दिला आहे.
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील एकूण सात बाजार समितीसाठी मतदान झाले होते. ज्यातील 6 जागांचे निकाल यापूर्वीच लागले आहे. तर पैठण कृषी उत्पन्न बाजार समितीसाठी झालेल्या निवडणुकीचे आज मतमोजणी झाली. यावेळी शिंदे गटाच्या शिवसेनेने बाजी मारली आहे. ज्यात सर्वच 18 जागांवर मंत्री संदिपान भुमरे यांच्या पॅनलचा विजय झाला आहे. त्यामुळे महाविकास आघाडीचा दारुण पराभव झाला आहे. विशेष महाविकास आघाडीतील तीनही पक्षाला एकही जागा जिंकता आली नाही.
भुमरेंसाठी विजय महत्वाचा
शिवसेनेत झालेल्या बंडखोरीनंतर पैठण तालुका सतत चर्चेत राहिला आहे. विशेष म्हणजे या मतदारसंघात आतापर्यंत तीन वेळा आदित्य ठाकरेंच्या सभा झाल्या आहेत. तर खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची देखील सभा झाली आहे. त्यातच गेल्यावेळी झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत दोन महत्वाच्या आणि मोठ्या ग्रामपंचायतमध्ये भुमरे यांना पराभव स्वीकारावा लागला होता. त्यामुळे कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक त्यांच्यासाठी प्रतिष्ठेची बनली होती. त्यामुळे भुमरे यांनी संपूर्ण ताकद लावत अखेर, बाजार समिती आपल्या ताब्यात आणली आहे. विशेष म्हणजे संपूर्ण 18 जागांवर त्यांना यश मिळाले आहे. त्यामुळे त्यांच्यासाठी हा विजय महत्वाचा समजला जात आहे.
विजयी उमेदवार...
सेवा सहकारी संस्था मतदारसंघ
- एरंडे राम कोंडीराम (सर्वसाधारण)
- तवार संभाजी शिवाजी (सर्वसाधारण)
- तांबे राजेंद्र एकनाथ (सर्वसाधारण)
- दोरखे विठ्ठल लक्ष्मण (सर्वसाधारण)
- नरके शरद अशोक (सर्वसाधारण)
- बोंबले बद्रीनाथ धोंडीराम (सर्वसाधारण)
- मुळे सुभाष माणिकराव (सर्वसाधारण)
- घनवट गंगासागर भिमराव
- हजारे शशिकलाबाई परसराम (महिला राखीव)
- जाधव शिवाजी नाथा (इतर मागासवर्गीय)
- व्होरकटे साईनाथ विष्णु (विमुक्त जाती-भटक्या जमाती)
ग्रामपंचायत मतदारसंघ
- भुमरे राजू आसाराम (सर्वसाधारण)
- मोगल सचिन भाऊसाहेब (सर्वसाधारण)
- खराद मनिषा नामदेव (आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक)
- कारके भगवान सर्जेराव (अनु. जाती-जमाती)
व्यापारी मतदारसंघ
- काला महावीर मदनलाल
- मुंदडा महेश रामनारायण
हमाल मापाडी मतदारसंघ
- टेकाळे राजू उत्तमराव
इतर महत्वाच्या बातम्या:
पैठण बाजार समितीसाठी झालेल्या निवडणुकीचे आज निकाल; मंत्री भुमरेंची प्रतिष्ठा पणाला