(Source: ECI/ABP News/ABP Majha)
पैठण बाजार समितीसाठी झालेल्या निवडणुकीचे आज निकाल; मंत्री भुमरेंची प्रतिष्ठा पणाला
Paithan Market Committee Election : पैठण तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या 18 संचालक पदासाठी रविवारी (30 एप्रिल) रोजी निवडणूक झाली.
Paithan Market Committee Election : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील (Chhatrapati Sambhaji Nagar District) एकूण सात बाजार समितीसाठी दोन वेगवेगळ्या टप्प्यात मतदान प्रकिया पार पडली असून, त्यापैकी 6 बाजार समित्यांचे निकाल देखील लागले आहे. मात्र शेवटच्या सातव्या पैठण बाजार समितीचे निकाल आज स्पष्ट होणार आहेत. पैठण तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या 18 संचालक पदासाठी रविवारी (30 एप्रिल) रोजी निवडणूक झाली. ज्यात 3 हजार 838 मतदारांपैकी 3 हजार 642 म्हणजेच 95 टक्के मतदान झाले. दरम्यान आज (1 मे) दुपारी 2 वाजेपर्यंत मतमोजणीचा निकाल घोषित होणार आहे. त्यामुळे विजयी गुलाल कोणत्या पॅनलवर पडणार याबाबत राजकीय गणित लावणे सुरू आहे. विशेष म्हणजे, या ठिकाणी रोहयो मंत्री तथा छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचे पालकमंत्री संदिपान भुमरे (Sandipan Bhumre) यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.
शिंदे गट विरुद्ध महाविकास आघाडीचा थेट सामना...
पैठण कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शिवसेना (शिंदे गट) विरुद्ध महाविकास आघाडी असा थेट सामना पाहायला मिळाला. शिंदे गटाकडून भाजपला अपेक्षाप्रमाणे जागा मिळाला नसल्याने त्यांनी शेवटच्या दिवशी निवडणुकीतून थेट माघार घेतली. मात्र निवडणुकीच्या प्रचारात शिंदे गटाच्या सोबत भाजप नेतेमंडळी पाहायला मिळाली. तर दुसरीकडे ठाकरे गट, राष्ट्रवादीसह काँग्रेस यांची महाविकास आघाडी मैदानात होती. त्यामुळे शिंदे गट विरुद्ध महाविकास आघाडी या सामन्यात कोणाचा विजय होणारा हे पाहणं महत्वाचे ठरणार आहे.
महाविकास आघाडी उमेदवार...
सेवा सहकारी संस्था मतदारसंघ
- कागदे सुदाम लक्ष्मण (सर्वसाधारण)
- गवांदे बबनराव तुकाराम (सर्वसाधारण)
- तांबे विनोद श्रीकृष्ण (सर्वसाधारण)
- थोटे पांडुरंग रायभान (सर्वसाधारण)
- पिवळ गणेश नामदेव (सर्वसाधारण)
- मोरे आबासाहेब शेषराव (सर्वसाधारण)
- वाघचौरे विशाल संजयराव (सर्वसाधारण)
- निळ संगिता प्रभाकर ((महिला राखीव)
- बोबडे शांताबाई बापु (महिला राखीव)
- चव्हाण विजय अंबादास (विमुक्त जाती / भटक्या जाती)
- कातवने विष्णु भाऊसाहेब (इतर मागासवर्ग)
ग्रामपंचायत मतदार संघ
- गोर्डे विकास कृष्णाराव (सर्वसाधारण)
- नरके प्रदिप भास्कर (सर्वसाधारण)
- घोडके मुक्ताबाई सर्जेराव (अनुसूचित जाती-जमाती)
- लिपाने मारोती मुरलीधर (आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक)
व्यापारी मतदारसंघ
- गोर्डे गोपीकिसन हरिचंद्र
- मुंदडा विष्णुकांत ओमप्रकाश
हमाल मापाडी मतदारसंघ
- सपकाळ ज्ञानेश्वर नामदेव
शिवसेना (शिंदे गट)
सेवा सहकारी संस्था मतदारसंघ
- एरंडे राम कोंडीराम (सर्वसाधारण)
- तवार संभाजी शिवाजी (सर्वसाधारण)
- तांबे राजेंद्र एकनाथ (सर्वसाधारण)
- दोरखे विठ्ठल लक्ष्मण (सर्वसाधारण)
- नरके शरद अशोक (सर्वसाधारण)
- बोंबले बद्रीनाथ धोंडीराम (सर्वसाधारण)
- मुळे सुभाष माणिकराव (सर्वसाधारण)
- घनवट गंगासागर भिमराव
- हजारे शशिकलाबाई परसराम (महिला राखीव)
- जाधव शिवाजी नाथा (इतर मागासवर्गीय)
- व्होरकटे साईनाथ विष्णु (विमुक्त जाती-भटक्या जमाती)
ग्रामपंचायत मतदारसंघ
- भुमरे राजु आसाराम (सर्वसाधारण)
- मोगल सचिन भाऊसाहेब (सर्वसाधारण)
- खराद मनिषा नामदेव (आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक)
- कारके भगवान सर्जेराव (अनु. जाती-जमाती)
व्यापारी मतदारसंघ
- काला महावीर मदनलाल
- मुंदडा महेश रामनारायण
हमाल मापाडी मतदारसंघ
- टेकाळे राजू उत्तमराव
महत्वाच्या इतर बातम्या: