एक्स्प्लोर

Chhatrapati Sambhaji Nagar News:  छत्रपती संभाजीनगर प्रकरणात 'एसआयटी' पथकाची स्थापना; असे असणार पथक

Chhatrapati Sambhaji Nagar News:  छत्रपती संभाजीनगर प्रकरणाचा तपास करण्यासाठी विशेष तपास पथकाची स्थापना करण्याता आली आहे.

Chhatrapati Sambhaji Nagar News:  छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात बुधवारी मध्यरात्री शहरात दोन गटांमध्ये वाद झाल्याची घटना समोर आली होती. ज्यात मोठ्याप्रमाणात दगडफेक आणि वाहनांची जाळपोळ करण्यात आली होती. तर या प्रकरणी पोलिसांनी 400 पेक्षा अधिक लोकांवर गुन्हाही दाखल केला होता. दरम्यान या प्रकरणात आता पोलिसांनी मोठं पाऊल उचललं असून, शहर पोलीस आयुक्त निखिल गुप्ता यांनी 'एसआयटी'ची स्थापना केली आहे. किराडपुरा भागात झालेल्या या राड्याची एसआयटी पथकाकडून सखोल चौकशी केली जाणार आहे. सिडको पोलीस ठाण्याचे निरीक्षक संभाजी पवार हे या पथकाचे प्रमुख असणार आहे.

पोलीस आयुक्त निखिल गुप्ता यांनी स्थापन केलेल्या एसआयटी पथकात संभाजी पवार यांच्यासह जिन्सी ठाण्यातील सहायक निरीक्षक अनिल मगरे, सायबरचे उपनिरीक्षक राहुल चव्हाण, गुन्हे शाखेचे कल्याण शेळके, वेदांतनगर ठाण्याचे उत्रेश्वर मुंडे, सिटी चौक ठाण्याचे रोहित गांगुर्डे, मुकुंदवाडी ठाण्याचे बाळासाहेब आहेर या अधिकाऱ्यांसह हवालदार अरुण वाघ, संजय गावंडे, सुनील जाधव यांचा विशेष तपास पथकात समावेश आहे.

आतापर्यंत पोलिसांनी दाखल केलेल्या आरोपींचे नावं

बरकत शौकत शेख (वय 23 वर्षे रा. यासीन मस्जिद जवळ, कटकट गेट, औरंगाबाद), शेख अतिक शेख हारूण (वय 24 वर्षे रा. अरफात मशिद जवळ, कटकटगेट, औरंगाबाद), सद्दामशहा बिस्मिल्ला शहा (वय 33 वर्षे रा. अरफात मशिद जवळ, कटकटगेट, किराडपुरा, औरंगाबाद), शेख खाजा शेख रशिद (वय 25 वर्षे रा. खासगेट, औरंगाबाद), शारेख खान इरफान खान (वय 23 वर्षे रा. राजाबाजार शकिल भाई यांचे घरात, औरंगाबाद), शेख सलीम शेख अजीज (वय 25 वर्षे रा. सेंदुरजण, सिंदखेडराजा जि. बुलढाणा ),  सय्यद नूर सय्यद युसूफ ( वय 30 वर्षे रा. सिकंदर हॉल जवळ, ग.नं. 6, बायजीपुरा, औरंगाबाद), शेख नाजीम शेख अहेमद (वय 24 वर्षे रा.तुबा मस्जिद जवळ, किराडपुरा, औरंगाबाद)

छत्रपती संभाजीनगरजवळील ओहर गावात दोन गटात वाद

शहरापासून जवळच असलेल्या ओहर गावात (Ohar Village) देखील गटात वाद झाल्याचे पाहायला मिळाले. रात्री झालेल्या वादानंतर आज सकाळी या गावात दगडफेकीची घटना घडली आहे. यात सहा जण जखमी झाले असून, त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहे. पोलिसांनी तत्काळ गावात धाव परिस्थिती नियंत्रणात आणली असून, गावात सर्वत्र सध्या शांतता पाहायला मिळत आहे. तर खबरदारी म्हणून पोलिसांचा मोठा बंदोबस्त ओहर तैनात करण्यात आला आहे. ओहर गावात झालेल्या वादात दोन्ही गटातील दोन-दोन लोकं जखमी झाले आहेत. त्यांना शासकीय घाटी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहेत. सध्या गावात शांतता असून, कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली. अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे. 

इतर महत्त्वाच्या बातम्या:

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मोठी बातमी! संजय राऊत राज्यसभेत भिडले, पण वक्फ बोर्ड विधेयकाच्या मतदानाला शरद पवार अनुपस्थितीत
मोठी बातमी! संजय राऊत राज्यसभेत भिडले, पण वक्फ बोर्ड विधेयकाच्या मतदानाला शरद पवार अनुपस्थितीत
Venture Debt : भारताच्या स्टार्टअप्सनी 1.23 अब्ज डॉलरचा निधी मिळवला, स्ट्राइड वेंचर्सच्या रिपोर्टमध्ये मोठा दावा
भारताच्या स्टार्टअप्सनी 1.23 अब्ज डॉलरचा निधी मिळवला, स्ट्राइड वेंचर्सच्या रिपोर्टमध्ये मोठा दावा
पुण्यात हॉस्पिटलने माणूसकी सोडली, जुळ्यांना जन्म देऊन आईने जीव सोडला; आमदाराची पोलिसांत धाव, चौकशी सुरू
पुण्यात हॉस्पिटलने माणूसकी सोडली, जुळ्यांना जन्म देऊन आईने जीव सोडला; आमदाराची पोलिसांत धाव, चौकशी सुरू
Video: बीडप्रमाणेच माझ्याबाबतही कट रचला, पण मी वाचलो; मोबाईलमध्ये आजही पुरावे, मंत्री जयकुमार गोरेंचा गौप्यस्फोट
Video: बीडप्रमाणेच माझ्याबाबतही कट रचला, पण मी वाचलो; मोबाईलमध्ये आजही पुरावे, मंत्री जयकुमार गोरेंचा गौप्यस्फोट
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Donald Trump tariff Special Report :डोनाल्ड ट्रम्प यांचा जगावर 'टॅरिफ बॉम्ब' भारतावर 26 % आयात शुल्कSpecial Report Waqf Property Politics : महाराष्ट्रातील किती मंदिरांवर वक्फ बोर्डाचा दावा?Special Report Thackeray VS Shinde : वक्फच्या आडून'ऑपरेशन टायगर'ची खेळी?दोन्ही शिवसेना भिडल्याZero Hour | वक्फ, ठाकरे आणि हिंदुत्व; भाजप Vs ठाकरे गटात पुन्हा जुंपली

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मोठी बातमी! संजय राऊत राज्यसभेत भिडले, पण वक्फ बोर्ड विधेयकाच्या मतदानाला शरद पवार अनुपस्थितीत
मोठी बातमी! संजय राऊत राज्यसभेत भिडले, पण वक्फ बोर्ड विधेयकाच्या मतदानाला शरद पवार अनुपस्थितीत
Venture Debt : भारताच्या स्टार्टअप्सनी 1.23 अब्ज डॉलरचा निधी मिळवला, स्ट्राइड वेंचर्सच्या रिपोर्टमध्ये मोठा दावा
भारताच्या स्टार्टअप्सनी 1.23 अब्ज डॉलरचा निधी मिळवला, स्ट्राइड वेंचर्सच्या रिपोर्टमध्ये मोठा दावा
पुण्यात हॉस्पिटलने माणूसकी सोडली, जुळ्यांना जन्म देऊन आईने जीव सोडला; आमदाराची पोलिसांत धाव, चौकशी सुरू
पुण्यात हॉस्पिटलने माणूसकी सोडली, जुळ्यांना जन्म देऊन आईने जीव सोडला; आमदाराची पोलिसांत धाव, चौकशी सुरू
Video: बीडप्रमाणेच माझ्याबाबतही कट रचला, पण मी वाचलो; मोबाईलमध्ये आजही पुरावे, मंत्री जयकुमार गोरेंचा गौप्यस्फोट
Video: बीडप्रमाणेच माझ्याबाबतही कट रचला, पण मी वाचलो; मोबाईलमध्ये आजही पुरावे, मंत्री जयकुमार गोरेंचा गौप्यस्फोट
... तर 3 वर्षात महावितरण बंद पडेल; वीज दर कपातीच्या निर्णयावरुन उडाले खटके; विश्वास पाठक यांचा खळबळजनक दावा
... तर 3 वर्षात महावितरण बंद पडेल; वीज दर कपातीच्या निर्णयावरुन उडाले खटके; विश्वास पाठक यांचा खळबळजनक दावा
जिन्नांचा आत्मा तुमच्यात बसलाय, संजय राऊतांचा हल्लाबोल, म्हणाले हिंदुत्वाच्या नव्या मुल्लांनी मला शिकवू नये
हिंदुत्वाच्या नव्या मुल्लांनी मला शिकवू नये, संजय राऊतांचा हल्ला, म्हणाले, जिन्नांचा आत्मा तुमच्यात बसलाय!
Dhananjay Munde : धनंजय मुंडेंची लेकीच्या फॅशन शोला हजेरी, आई, वडील आणि बहिणीसोबत फोटो, वैष्णवीची भारावलेली पोस्ट!
धनंजय मुंडेंची लेकीच्या फॅशन शोला हजेरी, आई, वडील आणि बहिणीसोबत फोटो, वैष्णवीची भारावलेली पोस्ट!
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 3 एप्रिल 2025 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 3 एप्रिल 2025 | बुधवार
Embed widget