छत्रपती संभाजीनगरमध्ये बस आणि मोपेडचा समोरासमोर अपघात, पोलीस कर्मचाऱ्यांच्या दोन तरण्याबांड मुलांचा मृत्यू
Chhatrapati Sambhajinagar : छत्रपती संभाजीनगरमधील कन्नड तालुक्यात बस आणि मोपेडचा समोरासमोर अपघात झालाय. यामध्ये दोन मुलांचा मृत्यू झाला.
Chhatrapati Sambhajinagar : छत्रपती संभाजीनगरच्या कन्नड येथे अपघातात दोन तरुणांच्या जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. कन्नड शहरातील मधुर डेअरी समोर हा अपघात झाला आहे. दुपारी एक वाजता हे दोन्ही तरुण मोपेडवरून जात असतानाच एसटी बसचा आणि मोपेडचा समोरासमोर अपघात झाला. ज्यात 17 वर्षीय आदिनाथ राहीज आणि 23 वर्षीय ओम तायडे गंभीर जखमी झाल्याने त्यांना शासकीय घाटी रुग्णालयात नेण्यात आले. मात्र डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केले. अपघातात मयत झालेले दोन्ही तरुण पोलीस कर्मचाऱ्यांचे मुलं असल्याचे देखील माहिती समोर येत आहे.
पुण्यातील इंदापुरात खासगी बसचा अपघात, 10 ते 11 प्रवासी जखमी
पुणे -सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर इंदापूर शहरापासून दोन ते अडीच किलोमीटर अंतरावर खाजगी प्रवाशी बसला अपघात झाला. पुण्याच्या दिशेने ही बस निघाली होती आणि इंदापूर बाह्यवळणापासून पुढे दोन ते अडीच किलोमीटर अंतरावरती आल्यानंतर या बसचे दोन्ही टायर फुटल्याने अपघात झाला आहे. टायर फुटल्याने लोखंड वाहतूक करणाऱ्या एका ट्रकला या बसने धडक दिली आणि ही बस पुणे सोलापूर महामार्ग ओलांडून जवळपास 25 ते 30 फूट खाली जाऊन आदळलीय. या बस मध्ये नेमकी किती प्रवासी होते याची माहिती अद्याप मिळाली नाही.
मात्र या बसमधील 10 ते 11 प्रवासी जखमी झाले असून या जखमींना इंदापूर पोलिसांनी शासकीय रुग्णालयात उपचार कमी दाखल केलयं. या घटनेची माहिती मिळताच इंदापूर पोलिस आणि एन एच ए आय चे पथक या ठिकाणी दाखल झाले आहे. खाजगी बस सोलापूर जिल्ह्यातील सांगोला मधून पुण्याच्या दिशेने ही बस निघाली होती. सुदैवानं या दुर्घटनेत कोणतीही जीवित हानी झाली नसली तरी मात्र बसचा आणि या खाजगी मालवाहू ट्रकच्या मोठ्या नुकसान झालाय तर 10 ते 11 प्रवासी जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. इंदापूर पोलीस महामार्गावर अपघात ग्रस्त असणारा ट्रक बाजूला घेण्याचे काम करत असून पोलिसांनी वाहतूक देखील सुरळीत केली आहे.
इतर महत्वाच्या बातम्या