एक्स्प्लोर

Sharad Pawar : एका खराब आंब्यामुळे संपूर्ण आडी खराब होणार नाही याची खबरदारी घेईन; परत येण्याची इच्छा असलेल्या आमदारांवर शरद पवारांची प्रतिक्रिया

Sharad Pawar : आपण वाट चुकलोय असं अनेकांना वाटतंय, त्यामुळे काहींची परत येण्याची इच्छा आहे. पण त्याबद्दल सरसकट निर्णय घेण्याची मानसिकता आमची नाही असं शरद पवार म्हणाले. 

छत्रपती संभाजीनगर : आंब्याच्या आडीतील एकच आंबा खराब असतो, पण तो इतर सर्व आंबे खराब करतो, त्यामुळे आंब्याची आडी खराब होणार नाही याची मी खबरदारी घेईन असं मोठं वक्तव्य शरद पवारांनी (Sharad Pawar) केलं. अजित पवारांसोबत गेलेले विधानपरिषदेचे आमदार बाबाजानी दुर्रानी (Babajani Durrani) यांनी छत्रपती संभाजीनगरमध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीत पुन्हा प्रवेश केला.

अजित पवारांसोबत गेलेले आमदार पुन्हा शरद पवारांसोबत येण्यास उत्सुक असल्याच्या राजकीय चर्चा आहेत. त्यापैकी बाबाजानी दुर्रानी हे आता परत आले आहेत. त्यांच्या पक्षप्रवेशावेळी शरद पवार म्हणाले की, पक्षप्रवेश होताना कोणीतरी म्हटलं की सर्वांना पुन्हा घेऊ नका. पण मला माहीत आहे की आंब्याच्या आडीतला एकच आंबा खराब असतो, तो इतर सर्व आंबे खराब करतो. त्यामुळे आडी खराब होणार नाही याची मी खबरदारी घेईल. 

अजित पवारांसोबत गेलेल्या आमदारांना निवडणुकीच्या तोंडावर पुन्हा पक्षात घेणार का असा प्रश्न विचारला असता शरद पवार म्हणाले की, अनेकांना वाटत आहे रस्ता चुकला आहे, त्यामुळे परत यावं असे वाटत असेल. काही लोकांनी पक्षात येण्याची इच्छा व्यक्त केली आहे. पण त्याबद्दल सरसकट निर्णय घेण्याची मानसिकता आमची नाही. ज्यांनी टोकाची भूमिका घेतली त्यांच्याबाबत विचार करणे सुरू आहे. 

मोदींना देशाचा इतिहास बदलायचा आहे

आज देशाचं नेतृत्व चुकीच्या लोकांच्या  हातात आहे असं सांगत शरद पवार म्हणाले की, गेल्या 10 वर्षात आपण पाहिलं, यांना देशाचा इतिहास बदलायचा आहे. स्वातंत्र्याच्या आंदोलनात यांचा थोडाही वाटा नाही. गेल्या निवडणूकमध्ये मोदींनी काय केले .या देशाच्या संविधानावर घाला घालण्याची तयारी त्यांनी केली होती. संविधानावर हल्ला करण्याचं काम त्यांनी केले. समाज एकसंघ राहिला पाहीजे हे सूत्र त्यांना मान्य नाही. त्यामुळे यांच्या हातात सत्ता जाणं हे मान्य नाही.

गेल्या 10 वर्षात देशात जातीवाद

राष्ट्रवादी शरद पवारांच्या पक्षात परतलेले आमदार बाबाजानी दुर्रानी म्हणाले की, साहेबाना सोडून गेलेले अनेकजण पुन्हा विधानभवनात दिसले नाहीत, ते शून्य झालेत. बरं झालो मी शून्य होण्याआधी परत आलो. गेल्या 10 वर्षात देशात जातीवाद पसरवला. आज शरद पवार यांच्याकडे मुस्लिम समाज मोठ्या अपेक्षने पाहत आहे. शरद पवारांच्या नेतृत्वाखाली सत्तापरिवर्तन होणार आहे. आम्ही कुठेही असलो तरीही आतून शरद पवार यांच्यासोबत होतो आणि त्यांना मदत देखील केली.  जोपर्यंत देशात परिवर्तन होत नाही तोपर्यंत आपणास दीर्घायुष्य मिळावे. 

ही बातमी वाचा: 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Indian Rupee : जगातल्या 'या' देशांमध्ये फिरायला जाल तर मज्जाच मज्जा, भारताच्या 1 रुपयाची किंमत होते 300 रुपये
जगातल्या 'या' देशांमध्ये फिरायला जाल तर मज्जाच मज्जा, भारताच्या 1 रुपयाची किंमत होते 300 रुपये
Devendra Fadnavis : आत्तापर्यंत किती महिलांना मिळाला लाडकी बहीण योजनेचा लाभ? देवेंद्र फडणवीसांनी दिली सविस्तर माहिती
आत्तापर्यंत किती महिलांना मिळाला लाडकी बहीण योजनेचा लाभ? देवेंद्र फडणवीसांनी दिली सविस्तर माहिती
Dharmaveer 2 : पडद्यावर पिक्चर, निवडणुकीचा ट्रेलर? धर्मवीर 2 मधून शिंदेंनी प्रचाराचा नारळ फोडला?
पडद्यावर पिक्चर, निवडणुकीचा ट्रेलर? धर्मवीर 2 मधून शिंदेंनी प्रचाराचा नारळ फोडला?
Ambani Family : अंबानी फॅमिली फक्त पैशांच्या बाबतीतच नाही तर प्रेमाच्या बाबतीतही श्रीमंत, कोणा कोणाचं झालंय लव्ह मॅरेज?
अंबानी फॅमिली फक्त पैशांच्या बाबतीतच नाही तर प्रेमाच्या बाबतीतही श्रीमंत, कोणा कोणाचं झालंय लव्ह मॅरेज?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Mumbai Senate Election : सिनेट निवडणुकीत आदित्य ठाकरेंकडून ABVP चा सुफडासाफDharmaveer 2 Review : धर्मवीर - 2! फर्स्ट डे... फर्स्ट शो, फर्स्ट रिव्ह्यूZero Hour Full : फडणवीसांच्या ऑफिसची तोडफोड तेधर्मवीर 2 चा रिव्ह्यू;सविस्तर चर्चाZero Hour Maharashtra Politics : अश्लाघ्य भाषा वापरणाऱ्यांचे कान कोण टोचणार?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Indian Rupee : जगातल्या 'या' देशांमध्ये फिरायला जाल तर मज्जाच मज्जा, भारताच्या 1 रुपयाची किंमत होते 300 रुपये
जगातल्या 'या' देशांमध्ये फिरायला जाल तर मज्जाच मज्जा, भारताच्या 1 रुपयाची किंमत होते 300 रुपये
Devendra Fadnavis : आत्तापर्यंत किती महिलांना मिळाला लाडकी बहीण योजनेचा लाभ? देवेंद्र फडणवीसांनी दिली सविस्तर माहिती
आत्तापर्यंत किती महिलांना मिळाला लाडकी बहीण योजनेचा लाभ? देवेंद्र फडणवीसांनी दिली सविस्तर माहिती
Dharmaveer 2 : पडद्यावर पिक्चर, निवडणुकीचा ट्रेलर? धर्मवीर 2 मधून शिंदेंनी प्रचाराचा नारळ फोडला?
पडद्यावर पिक्चर, निवडणुकीचा ट्रेलर? धर्मवीर 2 मधून शिंदेंनी प्रचाराचा नारळ फोडला?
Ambani Family : अंबानी फॅमिली फक्त पैशांच्या बाबतीतच नाही तर प्रेमाच्या बाबतीतही श्रीमंत, कोणा कोणाचं झालंय लव्ह मॅरेज?
अंबानी फॅमिली फक्त पैशांच्या बाबतीतच नाही तर प्रेमाच्या बाबतीतही श्रीमंत, कोणा कोणाचं झालंय लव्ह मॅरेज?
Dame maggie smith passed away: प्रसिद्ध हॉलिवूड अभिनेत्री डेम मॅगी स्मिथ यांचं निधन, 2 वेळा जिंकला होता ऑस्कर
Dame maggie smith passed away: प्रसिद्ध हॉलिवूड अभिनेत्री डेम मॅगी स्मिथ यांचं निधन, 2 वेळा जिंकला होता ऑस्कर
आभाळ फाटलं, ठिगळ लावणार कुठं! अतिवृष्टीच्या तडाख्यानं पाच एकरवरील सोयाबीनला फटका, सरकारकडे मदतीची मागणी 
आभाळ फाटलं, ठिगळ लावणार कुठं! अतिवृष्टीच्या तडाख्यानं पाच एकरवरील सोयाबीनला फटका, सरकारकडे मदतीची मागणी 
कोकणातून माघारी फिरताच पवारांना धक्का; आठ नगरसेवकांनी मांडली वेगळी चूल !
कोकणातून माघारी फिरताच पवारांना धक्का; आठ नगरसेवकांनी मांडली वेगळी चूल !
कुडाळमध्ये कट्टर वैरी आमने-सामने येणार, निलेश राणे वैभव नाईकांविरोधात निवडणूक लढवणार?
कुडाळमध्ये कट्टर वैरी आमने-सामने येणार, निलेश राणे वैभव नाईकांविरोधात निवडणूक लढवणार?
Embed widget