मोठी बातमी! मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या पत्रकार परिषदेचा संजय राऊतांना पास मिळाला पण....
Marathwada Cabinet Meeting : आता संजय राऊत मुख्यमंत्री यांच्या पत्रकार परिषदेत उपस्थित राहणार का?
Marathwada Cabinet Meeting : औरंगाबादमध्ये आज मंत्रिमंडळाची बैठक (Marathwada Cabinet Meeting) होत आहे. या बैठकीनिमित्ताने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्यासह संपूर्ण मंत्रिमंडळ शहरात दाखल झाला आहे. तर, या बैठकीनंतर होणाऱ्या पत्रकार परिषदेत संजय राऊत (Sanjay Raut) देखील पत्रकार म्हणून उपस्थित राहणार आहे. विशेष म्हणजे संजय राऊत यांना पोलिसांनी पत्रकार परिषदेत उपस्थित राहण्यासाठी पास दिला असल्याची माहिती पोलीस आयुक्त मनोज लोहिया यांनी दिली आहे. त्यामुळे आता संजय राऊत मुख्यमंत्री यांच्या पत्रकार परिषदेत उपस्थित राहणार का? आणि पोलीस त्यांना आतमध्ये सोडणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
संजय राऊत काय म्हणाले?
पोलिसांकडून देण्यात आलेल्या पासबद्दल विचारल्यावर संजय राऊत म्हणाले की, मी संपादक आहे. या महाराष्ट्रातला ज्येष्ठ संपादक आहे. माझी इच्छा झाली तर मी जाईन. पण मी गेलो तर गोंधळ निर्माण होईल आणि मला तो नकोय, असे राऊत म्हणाले आहेत.