Abdul Sattar : चार महिने उलटूनही कृषिमंत्र्यांच्या जिल्ह्यातील 62 टक्के शेतकरी अतिवृष्टीच्या मोबदल्यापासून वंचित
Chhatrapati Sambhaji Nagar : चार महिने उलटूनही सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यातील अतिवृष्टीमुळे (Heavy Rain) झालेल्या नुकसानीचा मोबदला मिळाला नसल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
Chhatrapati Sambhaji Nagar News: राज्यात अवकाळी पावसामुळे (Unseasonal Rain) मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून, शेतकरी (Farmer) संकटात सापडला आहे. तर नुकसानग्रस्त भागाची पंचनामे करण्यात येत असून, 25 मार्चपर्यंत शेतकऱ्यांना मदत जाहीर केली जाणार असल्याची घोषणा कृषिमंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांनी केली आहे. मात्र असे असताना कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांच्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील 62 टक्के शेतकऱ्यांना चार महिने उलटूनही सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यातील अतिवृष्टीचा (Heavy Rain) मोबदला मिळाला नसल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
गतवर्षी सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये अतिवृष्टी शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. त्यामुळे सरकराने पंचनामे करून नुकसानभरपाईची घोषणा केली होती. अतिवृष्टीने बाधित झालेल्या जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना 300 कोटींच्या आसपास मदत शासनाने जाहीर केली, परंतु ही मदत ऑनलाइन पाठविण्याचा निर्णय घेण्यात आला. परंतु चार महिन्यांत केवळ 28 टक्केच शेतकऱ्यांपर्यंत मदत पोहोचली असून, अजूनही 62 टक्के शेतकरी नुकसानभरपाई पासून वंचित आहेत. यासंदर्भात मंगळवारी शासनाच्या वतीने व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे आढावा घेण्यात आला. तसेच 31 मार्चपर्यंत सर्व याद्या सॉफ्टवेअरमध्ये प्रमाणित करून सादर करण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत.
अजूनही 62 टक्के शेतकरी नुकसानभरपाई पासून वंचित
यंदा नुकसानभरपाई देण्याबाबत सरकराने काही नवीन नियमावली तयार केली होती. मोबदला देताना भ्रष्टाचार टाळण्यासाठी सरकराने ऑनलाइन शेतकऱ्यांची यादी अपलोड करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यामुळे या सर्व प्रक्रियेला तीन महिने लागले. आता ऑनलाइन केलेल्या याद्या तहसीलदार आणि निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांनी प्रमाणित करून संबंधित खात्याकडे पाठविल्या, परंतु जिल्ह्यातील सुमारे दीड लाख शेतकऱ्यांच्या खात्यांवरच मदत आली आहे. म्हणजेच केवळ 28 टक्केच शेतकऱ्यांपर्यंत मदत पोहोचली असून, अजूनही 62 टक्के शेतकरी नुकसानभरपाई पासून वंचित आहेत.
अवकाळीची नुकसानभरपाई कधी मिळणार?
मार्च महिन्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्याप्रमाणावर नुकसान झाले होते. त्यामुळे सरकराने पंचनामे करण्याचे आदेश दिले. मात्र शासकीय कर्मचारी संपावर असल्याने अल्पप्रमाणात पंचनामे झाले. त्यातच आता संप मिटला असून, 25 मार्चपर्यंत शेतकऱ्यांना मदत जाहीर केली जाणार असल्याची घोषणा कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी केली आहे. परंतु अतिवृष्टीचीच नुकसानभरपाई अजून शेतकऱ्यांना मिळाली नसल्याने आता अवकाळीची नुकसानभरपाई कधी मिळणार असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे.
इतर महत्वाच्या बातम्या :
Unseasonal Rain : विभागीय आयुक्तांचे निर्देश अन् जिल्हाधिकारी पोहचले बांधावर; नुकसानीची केली पाहणी