(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Chhatrapati Sambhaji Nagar: रात्रीच्या किर्रर्र अंधारात टोळकं गुप्तधन शोधायला बाहेर पडलं, पिशवीत तंत्रमंत्र विद्येचं साहित्य; शेतकऱ्यांनी पाठलाग करुन पकडलं
Maharashtra Crime news: छत्रपती संभाजीनगरच्या कन्नड तालुक्यातील घटना. डोंगरगावात गुप्तधनाच्या शोधात फिरणारी टोळी शेतकऱ्यांच्या ताब्यात. पोलिसांकडून चौकशी सुरु. ट्रॅक्टर येणार असल्याची खोटी माहिती. पण शेतकऱ्यांना संशय आल्याने बिंग फुटलं.
छत्रपती संभाजीनगर: छत्रपती संभाजीनगरच्या कन्नड तालुक्यातील डोंगरगाव गावात गुप्तधनाच्या (Secret Wealth) लालसेने मध्यरात्री शेतशिवारांत फिरणाऱ्या सहा जणांना शेतकऱ्यांनी (Farmer) पकडले आहे. नाचनवेल,डोंगरगाव आणि मोहरा गावांच्या शिव हद्दीतील शेतात मध्यरात्री आठ ते नऊ जण विजेऱ्या घेऊन संशयास्पदरित्या फिरत असल्याचे शेती वस्तीवर राहणाऱ्या शेतकऱ्यांच्या नजरेस पडले. आजूबाजूच्या शेतकऱ्यांना कॉल करून घटनास्थळी बोलावले असता संशयितांनी शेत नांगरायला ट्रॅक्टर येणार असल्याचा बनाव केला. (Maharashtra Crime News)
मात्र, नागरिकांनी खाक्या दाखवताच सर्व संशयितांचे पितळ उघडे पडले . त्यांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला.अर्धा ते एक किमी पाठलाग करून सर्वांना पकडल्यानंतर पिशोर पोलीस ठाण्यात घटनेची माहिती देण्यात आली. पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत एक दुचाकी आणि गुप्तधन शोधण्यासाठी आणलेलं साहित्यासह दोघांना ताब्यात घेतले. शेख बशीर शेख खेरू आणि अब्दुल रहीम शेख अशी त्यांची नावे आहेत.
रात्रीच्या अंधारात सहा ते सात जणांचे टोळके शेतांमधून फिरत होते. त्यांच्याकडून गुप्तधनाच्या पूजाविधीसाठी लागणारे साहित्यही जप्त करण्यात आले. शेतकऱ्यांनी या सगळ्यांना पकडल्यानंतर एका ठिकाणी जमिनीवर बसवून ठेवले. सध्या या सगळ्यांना पोलिसांच्या हवाली करण्यात आले आहे. पोलीस चौकशीतून आता काय निष्पन्न होणार, हे पाहावे लागेल.
यवतमाळमध्ये गुप्तधन शोधणाऱ्या टोळीला अटक
काही दिवसांपूर्वीच पोलिसांनी यवतमाळमध्ये गुप्तधनाच्या शोधात फिरणाऱ्या एका टोळीला अटक केली होती. पोलिसांनी त्यांच्याकडून पाच मोबाईल, तीन मोटरसायकल, डीप सर्च मेटल डिटेक्टर, एक चाकू असा एकूण 2 लाख 8 हजारांचा मुद्देमाल जप्त केला होता. महाराष्ट्री नरबळी आणि इतर अमानुष अनिष्ट व अघोरी प्रथा, जादूटोणा यांना प्रतिबंध करण्याबाबत आणि त्यांचे समूळ उच्चाटन करण्याबाबत अधिनियम 2013 प्रमाणे त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आणखी वाचा
"तुमच्या घरातील गुप्तधन मी काढून देतो", 80 वर्षाच्या वृद्धाला सात लाखाला फसवले
बालकाच्या मदतीने गुप्तधन शोधणारी टोळी ताब्यात; अमरावती पोलिसांची कारवाई