(Source: ECI/ABP News/ABP Majha)
माझ्यावर प्रेम केलं नाही तर..., बीएचएमएसच्या विद्यार्थिनीला वारंवार धमक्या, तरुणीचं भीतीपोटी टोकाचं पाऊल, संभाजीनगर हादरलं!
Chhatrapati Sambhajinagar : छत्रपती संभाजीनगरमध्ये तरुण एकतर्फी प्रेमातून बीएचएमएसच्या विद्यार्थिनीला वारंवार त्रास देत असल्याने विद्यार्थिनीने टोकाचे पाऊल उचलले आहे. यामुळे शहर पुन्हा एकदा हादरलं आहे.
छत्रपती संभाजीनगर : प्रेम विवाह केल्याने जावयाची हत्या केल्याचं प्रकरण ताज असतानाच छत्रपती संभाजीनगरमध्ये (Chhatrapati Sambhajinagar) एकतर्फी प्रेमातून त्रास देत असल्याने बीएचएमएसच्या (BHMS) विद्यार्थिनीने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. यामुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे.
काही दिवसांपूर्वी छत्रपती संभाजीनगरमधील इंदिरानगर परिसरात माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडली होती. आंतरधर्मीय प्रेमविवाह (Marriage) केल्याच्या रागातून मुलीचे वडील आणि चुलत भावाने जावयावर चाकूने गंभीर वार करून हत्या केली होती. बापानेच जातीभेदापोटी मुलीचे कुंकू पुसले. या घटनेमुळे छत्रपती संभाजीनगरमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात असतानाच आता बीएचएमएसच्या विद्यार्थिनीने टोकाचे पाऊल उचलल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
तरुणीचं भीतीपोटी टोकाचं पाऊल
माझ्यासोबत मैत्री कर, मला भेटायला ये असे म्हणून आरोपी विद्यार्थिनीला गेल्या वर्षभरापासून त्रास देत होता. माझ्यावर प्रेम केलं नाही तर आत्महत्या करेल, अशी धमकीही या तरुणाने या विद्यार्थिनीला दिली होती. त्यामुळे घाबरलेल्या बीएचएमएसच्या दुसऱ्या वर्षात शिकणाऱ्या (BHMS Student) गायत्री दाभाडे (Gayatri Dabhade) या तरुणीने हॉस्टेलमध्येच (Hostel) गळाफास घेऊन आत्महत्या केली आहे. या प्रकरणी सिडको पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी दत्तू गायके (Dattu Gaike) याला पोलिसांनी (Police) अटक केली आहे. या घटनेमुळे छत्रपती संभाजीनगरमध्ये एकच खळबळ उडाली आहे. पोलीस पुढील तपास करत आहेत.
भाजपच्या आमदारांच्या बॉडीगार्डने संपवली जीवनयात्रा
दरम्यान, चिखली विधानसभा मतदारसंघाच्या भाजपच्या आमदार श्वेता महाले (Shweta Mahale) यांचा बॉडीगार्ड अजय शंकर गिरी (Ajay Giri) यांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना बुधवारी सायंकाळी घडली आहे. त्याने स्वतःवर गोळ्या झाडल्या आणि जीवन संपवले. या घटनेमुळे चिखलीत मोठी खळबळ उडाली आहे. आमदार श्वेता महाले यांचे बॉडीगार्ड अजय गिरी हे बुधवारी त्यांच्यासोबत ड्युटीवर नव्हते. त्यांनी स्वतःवर गोळ्या झाडून आत्महत्या केली. अजय गिरी यांनी घरघुती कारणावरून ही आत्महत्या केल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. मात्र त्यांच्या आत्महत्येचे नेमके कारण अद्याप स्पष्ट नाही.
इतर महत्वाच्या बातम्या