एक्स्प्लोर

मोठी बातमी! संपावर गेलेल्या संभाजीनगरच्या 440 आशा सेविका निलंबित; मनपा आयुक्तांचे आदेश

Chhatrapati Sambhaji Nagar : आरोग्य विभागाला वेठीस धरू नाही आणि 24 तासात कामावर हजर होण्याची नोटीस अशा सेविकांना देण्यात आले होते.

Chhatrapati Sambhaji Nagar : छत्रपती संभाजीनगर महापालिकेच्या (Chhatrapati Sambhaji Nagar Municipal Corporation) 440 आशा स्वयंसेवीका (Asha Sevika) निलंबित करण्यात आले आहेत. मनपा आयुक्त जी श्रीकांत यांनी याबाबत आदेश काढले आहेत. संभाजीनगर महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाच्या आशा स्वयंसेविकांनी संप पुकारला होता. दरम्यान, आरोग्य विभागाला वेठीस धरू नाही आणि 24 तासात कामावर हजर होण्याची नोटीस अशा सेविकांना देण्यात आले होते. मात्र, या नोटीसकडे दुलर्क्ष केल्याने आणि कामावर हजर न झाल्याने मनपा आयुक्तांनी तब्बल 440 आशा सेविकांच्या निलंबनाचे आदेश काढले आहेत. त्यामुळे महानगरपालिकेत खळबळ उडाली आहे. 

मानधन वाढीसह आपल्या प्रलंबित विविध मागण्यांसाठी आशा स्वयंसेवी संघटनेने राज्यव्यापी संप पुकारला आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील अशा सेविका देखील या संपात सहभागी झाले आहेत. दरम्यान, छत्रपती संभाजीनगर महापालिकेत कार्यरत असलेल्या 511 आशा स्वयंसेविकाही सुद्धा या संपात सहभागी आहेत. मात्र, याच संपाचे परिणाम आरोग्य विभागावर होतांना पाहायला मिळत आहे. त्यामुळे, अशा सेविकांनी तात्काळ कामावर हजर राहण्याबाबत दोन वेळेस आरोग्य वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना नोटिसा बजावल्या होत्या. मात्र, आपल्या मागण्यांवर ठाम असलेल्या अशा सेविकांनी या नोटीसची कोणतेही दखल घेतली नाही. नोटीस बजावल्यावर 511 आशा सेविकांपैकी केवळ 71 जणी कामावर हजर झाल्या होत्या. 

अशा सेविका आपल्या मागण्यावर ठाम...

मानधन वाढीसह आपल्या प्रलंबित विविध मागण्यांसाठी आशा स्वयंसेवी संघटनेने राज्यव्यापी संप पुकारला आहे. छत्रपती संभाजीनगर महापालिकेत कार्यरत असलेल्या 511 आशा स्वयंसेविका सुद्धा या संपत सहभागी झाल्या होत्या. यातील71 जणी कामावर हजर झाल्या आहेत. मात्र, कामावर हजर न झालेल्या महापालिकेच्या 440 आशा स्वयंसेवीका निलंबित करण्यात आले आहेत. मात्र, या कारवाईनंतर देखील अशा सेविका आपल्या मागण्यावर ठाम असल्याची माहिती मिळत आहे. 

राज्यभरात अशा सेविका संपावर...

आपल्या प्रलंबित मागण्यासाठी राज्यभरात अशा सेविका संपावर गेल्या असून, ठिकठिकाणी त्यांच्याकडून आंदोलन देखील करण्यात येत आहे. दरम्यान, शुक्रवारी ठाण्यातील कोर्ट नका परिसरात राज्यभरातील अनेक अशा सेविका येऊन धडकल्याचे पाहायला मिळाले. यावेळी अशा सेविकांनी आक्रमक पवित्रा घेत जोरदार घोषणाबाजी देखील केली. यावेळी महिला पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. त्यामुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. यावेळी आंदोलक अशा सेविका यांनी मंत्रालयापर्यंत पदयात्रा काढण्याचा निर्णय घेतला होता. मात्र. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आश्वासनानंतर पदयात्रा काढण्याचा निर्णय मागे घेण्यात आला. मात्र, राज्यभरातील आंदोलन सुरूच राहणार असल्याचा इशारा यावेळी अशा सेविका यांच्याकडून देण्यात आला आहे. 

इतर महत्वाच्या बातम्या : 

Chhatrapati Sambhaji Nagar Crime : मैत्रीणीला दवाखान्यात घेऊन जाताना तरुणीला बुलेटस्वार तरुणांकडून पळवून नेण्याचा प्रयत्न

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

नाव गोऱ्हे पण काम काळे, शिव्या घालायच्या लायकीची नाही, मातोश्रीवर बसलेली असायची, सतत बोलायची थांबावं लागेल; किशोरी पेडणेकरांनी गोऱ्हेंची 'मातोश्री'वरील कुंडलीच बाहेर काढली
नाव गोऱ्हे पण काम काळे, शिव्या घालायच्या लायकीची नाही, मातोश्रीवर बसलेली असायची, सतत बोलायची थांबावं लागेल; किशोरी पेडणेकरांनी गोऱ्हेंची 'मातोश्री'वरील कुंडलीच बाहेर काढली
Maratha Reservation : 'मराठा समाजाच्या परिषदेसाठी मुख्यमंत्र्यांनी 10 मार्चपर्यंत वेळ द्यावी, अन्यथा' राज्यभरातील 42 संघटनांचा जाहीर इशारा
'मराठा समाजाच्या परिषदेसाठी मुख्यमंत्र्यांनी 10 मार्चपर्यंत वेळ द्यावी, अन्यथा...' राज्यभरातील 42 संघटनांचा जाहीर इशारा
'धनंजय मुंडे माझे दैवत..वाल्मिक कराड माझे नेते म्हणणारा बाळाजी तांदळे..' संतोष देशमुख प्रकरणी अंजली दमानियांची पोस्ट चर्चेत
'धनंजय मुंडे माझे दैवत..वाल्मिक कराड माझे नेते म्हणणारा बाळाजी तांदळे..' संतोष देशमुख प्रकरणी अंजली दमानियांची पोस्ट चर्चेत
ठाकरेंचा काँग्रेसला 'दे धक्का', अहिल्यानगरच्या जिल्हाध्यक्षांनी हाती घेतली मशाल; म्हणाले, पडत्या काळात...
ठाकरेंचा काँग्रेसला 'दे धक्का', अहिल्यानगरच्या जिल्हाध्यक्षांनी हाती घेतली मशाल; म्हणाले, पडत्या काळात...
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Top 100 Headlines : टॉप शंभर बातम्यांचा वेगवान आढावा : 23 Feb 2025 : ABP Majha : 6 PmUday Samant On Ravindra Dhangekar : रवींद्र धंगेकर शिवसेनेची ऑफर स्वीकारणार?Rahul Narvekar On Manikrao Kokate : कोर्टाची अधिकृत प्रत मिळाल्यानंतर ७ दिवसांमध्ये निर्णय घेणारUddhav Thackeray Gat On Neelam Gorhe : नीलम गोऱ्हेंविरोधात ठाकरेंच्या शिवसेनेचं आंदोलन

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
नाव गोऱ्हे पण काम काळे, शिव्या घालायच्या लायकीची नाही, मातोश्रीवर बसलेली असायची, सतत बोलायची थांबावं लागेल; किशोरी पेडणेकरांनी गोऱ्हेंची 'मातोश्री'वरील कुंडलीच बाहेर काढली
नाव गोऱ्हे पण काम काळे, शिव्या घालायच्या लायकीची नाही, मातोश्रीवर बसलेली असायची, सतत बोलायची थांबावं लागेल; किशोरी पेडणेकरांनी गोऱ्हेंची 'मातोश्री'वरील कुंडलीच बाहेर काढली
Maratha Reservation : 'मराठा समाजाच्या परिषदेसाठी मुख्यमंत्र्यांनी 10 मार्चपर्यंत वेळ द्यावी, अन्यथा' राज्यभरातील 42 संघटनांचा जाहीर इशारा
'मराठा समाजाच्या परिषदेसाठी मुख्यमंत्र्यांनी 10 मार्चपर्यंत वेळ द्यावी, अन्यथा...' राज्यभरातील 42 संघटनांचा जाहीर इशारा
'धनंजय मुंडे माझे दैवत..वाल्मिक कराड माझे नेते म्हणणारा बाळाजी तांदळे..' संतोष देशमुख प्रकरणी अंजली दमानियांची पोस्ट चर्चेत
'धनंजय मुंडे माझे दैवत..वाल्मिक कराड माझे नेते म्हणणारा बाळाजी तांदळे..' संतोष देशमुख प्रकरणी अंजली दमानियांची पोस्ट चर्चेत
ठाकरेंचा काँग्रेसला 'दे धक्का', अहिल्यानगरच्या जिल्हाध्यक्षांनी हाती घेतली मशाल; म्हणाले, पडत्या काळात...
ठाकरेंचा काँग्रेसला 'दे धक्का', अहिल्यानगरच्या जिल्हाध्यक्षांनी हाती घेतली मशाल; म्हणाले, पडत्या काळात...
Rohit Sharma : 'साला यह दुःख काहे ख़त्म नहीं होता बे'! 15 नोव्हेंबर 2023 ते 23 फेब्रुवारी 2025! रोहित शर्माची पणवती सुटता सुटेना
'साला यह दुःख काहे ख़त्म नहीं होता बे'! 15 नोव्हेंबर 2023 ते 23 फेब्रुवारी 2025! रोहित शर्माची पणवती सुटता सुटेना
Telangana Tunnel Accident : तेलंगणा बोगदा दुर्घटना, 8 मजुरांसाठी बचाव कार्य सुरू सुरुच; हाक दिली, पण प्रतिसाद नाही, पाणी चिखल काढण्यासाठी हेव्ही पंप मागवला
तेलंगणा बोगदा दुर्घटना, 8 मजुरांसाठी बचाव कार्य सुरू सुरुच; हाक दिली, पण प्रतिसाद नाही, पाणी चिखल काढण्यासाठी हेव्ही पंप मागवला
Beed: मनोज जरांगेंच्या ताफ्यातील वाहनाचा महिलेच्या दुचाकीला धक्का, नंतर महिलेला घरात घूसून मारहाण, नेमकं प्रकरण काय?
मनोज जरांगेंच्या ताफ्यातील वाहनाचा महिलेच्या दुचाकीला धक्का, नंतर महिलेला घरात घूसून मारहाण, नेमकं प्रकरण काय?
Old kasara Ghat : मुंबई-नाशिक महामार्गावरून प्रवास करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी, सहा दिवस जुना कसारा घाट बंद, पर्यायी मार्ग कोणता?
मुंबई-नाशिक महामार्गावरून प्रवास करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी, सहा दिवस जुना कसारा घाट बंद, पर्यायी मार्ग कोणता?
Embed widget