(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Chhatrapati Sambhaji Nagar Crime : मैत्रीणीला दवाखान्यात घेऊन जाताना तरुणीला बुलेटस्वार तरुणांकडून पळवून नेण्याचा प्रयत्न
Chhatrapati Sambhaji Nagar Crime : संबंधित तरुणीने वेळीच प्रसंगावधान दाखवून आरडाओरडा केल्याने बुलेटस्वार तरुण पळून गेले. या प्रकरणी संबंधित तरुणीने बेगमपुरा पोलिसांत फिर्याद दाखल केली आहे.
छत्रपती संभाजीनगर : राज्यात गोळीबारांचा थरार सुरू असतानाच आता छत्रपती संभाजी नगरमध्ये (Chhatrapati Sambhaji Nagar) डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ परिसरातून (Dr. Babasaheb Ambedkar Marathwada University) तरुणीला पळवून नेण्याचा प्रयत्न झाल्याची धक्कादाय घटना घडली. तरुणी आपल्या मैत्रिणीला रुग्णालयात घेऊन जात असतानाच भर रस्त्यात अडवून बुलेटवर बुलेटवरून आलेल्या तरणांनी पळवून नेण्याचा प्रयत्न केला. मात्र संबंधित तरुणीने वेळीच प्रसंगावधान दाखवून आरडाओरडा केल्याने बुलेटस्वार तरुण पळून गेले. या प्रकरणी संबंधित तरुणीने बेगमपुरा पोलिसांत फिर्याद दाखल केली आहे. बेगमपुरा पोलिस ठाण्यात अज्ञात तीन तरुणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांकडून या तरुणांचा शोध सुरू करण्यात आला आहे.
विद्यापीठ परिसरात धक्कादायक प्रकार
संबंधित तरुणी छत्रपती संभाजीनगरमध्ये गेल्या 4 महिन्यांपासून एका संस्थेत शिक्षण घेत आहे. तरुणी महाविद्यालयाच्या वसतिगृहात राहते. आज (9 फेब्रुवारी) सायंकाळी सव्वा सहाच्या सुमारास संबंधित तरुणी आणि तिची मैत्रिण वसतीगृहातून बाहेर फिरण्यासाठी गेल्या होत्या. यावेळी मैत्रिणीच्या पोटात दुखू लागल्यानंतर पार्वती हॉस्पिटल, विद्यापीठ गेटजवळ आल्या. यानंतर तरुणीने मैत्रिणीच्या वडिलांनी फोन करून बोलावून घेतले.
गाडी आडवी मारून नाव विचारले
पार्वती हॉस्पिटलमध्ये आल्यानतंर संध्याकाळी साडे सातच्या सुमारास पीडित तरुणी, मैत्रिण आणि अन्य एका मैत्रिणीसह हाॅस्पिटलमधून परतून विद्यापीठ मेनगेटपासून जात असतान तीन तरुण बुलेटवरून जात होते. तेव्हा त्यांनी बुलेट थांबवून तरुणीला तुझं नाव स्नेहा आहे का? अशी विचारणा केली. यानंतर त्या तरुणीने माझं नाव स्नेहा नाही, असे सांगितले.
संबंधित तरुणी मैत्रिणींसह पुढे जात असातानाच त्या बुलेटस्वारांनी त्यांचा पाठलाग केला. विद्यापीठाच्या वाय कॉर्नरपर्यत आल्यानंतर पाठलाग करत आलेल्या तरुणांनी समोर आणून उभा करत गाडीवर बसण्यास सांगितले. यावेळी भेदरून गेलेल्या तरुणीने रत्यावरून जाणाऱ्या एका व्यक्तीला मुलं त्रास देत असल्याचे सांगितले. यावेळी त्यांनीही प्रसंगावधान दाखवून आरडाओरडा केला. यानंतर त्या तरुणांनी बुलेटवरून पळ काढला.
इतर महत्वाच्या बातम्या