(Source: ECI/ABP News/ABP Majha)
औरंगाबाद शहराच्या रस्त्यावर पोलिसच पोलीस, तब्बल 7270 पोलिसांचा बंदोबस्त
Aurangabad : औरंगाबाद शहरात पुढील चार दिवसांसाठी 7 हजार 270 पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
औरंगाबाद : मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन (Marathwada Liberation Day) , मंत्रिमंडळाची बैठक आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांचा दौरा पाहता पुढील चार दिवस औरंगाबाद (Aurangabad) शहरात रस्त्यावर पोलिसच पोलीस पाहायला मिळणार आहे. कारण एकट्या औरंगाबाद शहरात पुढील चार दिवसांसाठी 7 हजार 270 पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. विशेष म्हणजे यासाठी इतर जिल्ह्यातून देखील पोलिसांचा फौजफाटा मागविण्यात आला आहे. विशेष म्हणजे या पोलीस बंदोबस्तात 10 पोलीस अधीक्षक व अप्पर अधीक्षक, 30 उपअधीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांचा समावेश असणार आहे.
काय आहे शहरात?
पुढील चार दिवस औरंगाबाद शहरात विविध कार्यक्रम होत आहे. जात 16 सप्टेंबरला मंत्रिमंडळाची बैठक होणार आहे, 17 सप्टेंबरला मराठवाडा मुक्तीसंग्रामाचा अमृतमहोत्सव आहे. सोबतच 17 तारखेला केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि भारताचे सरन्यायाधीश डी वाय चंद्र नायडू, सर्वोच्च न्यायालयाचे मुंबई, कर्नाटक, मद्रास खंडपीठातील न्यायमूर्ती, देशाचे अतिरिक्त महाअधिवक्ता शहरात असणार आहे. तर, मंत्रिमंडळाची बैठक असल्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह दोन्ही उपमुख्यमंत्री आणि संपूर्ण मंत्रिमंडळ शहरात असणार आहे. या सोबतच सर्व आमदार आणि उच्चपदस्थ अधिकारी देखील शहरात असणार आहे. या सर्व पार्श्वभूमीवर औरंगाबाद सह इतर सहा जिल्ह्यातून पोलीस बंदोबस्त मागविण्यात आला आहे.
बाहेरून आलेला पोलीस बंदोबस्त?
- या सर्व पार्श्वभूमीवर औरंगाबाद शहरात पुढील चार दिवस तगडा बंदोबस्त असणार आहे.
- केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना झेड प्लस सुरक्षा पुरवली जाणार आहे.
- यासाठी बुलेटप्रूफ वाहन, अन्य दहा वाहने, जामर, एनएसजी कमांडो, यासह 55 कर्मचाऱ्यांचा सुरक्षा कवच असणार आहे.
- सोबतच इतर जिल्ह्यातून देखील पोलीस बंदोबस मागवण्यात आला आहे.
- ज्यात 10 पोलीस अधीक्षक आणि अप्पर पोलीस अधीक्षक
- 30 सहाय्यक आयुक्त/उपाधीक्षक, 160 पोलीस निरीक्षक
- 400 सहाय्यक निरीक्षक/उपनिरीक्षक असणार आहे.
- 2800 महिला पुरुष पोलीस कर्मचाऱ्यांचा बंदोबस्त असणार आहे.
- यासोबत 20 वाहतूक कर्मचारी, 150 होमगार्ड, 500 एसआरपीच्या 4 तुकड्या,6 बॉम्बशोधक नाशक पथक बंदोबस्तावर राहणार आहेत.
स्थानिक पोलिसांचा बंदोबस्त?
- औरंगाबाद शहर पोलीस आयुक्त मनोज लोहिया यांच्या मार्गदर्शनाखाली तीन उपायुक्त बंदोबस्तावर असणार आहे.
- पाच सहाय्यक पोलीस आयुक्त बंदोबस्तावर असणार आहे.
- 25 वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांचा देखील बंदोबस्तात सहभाग असणार आहे.
- 96 पोलीस सहाय्यक निरीक्षक, पोलीस उपनिरीक्षक यांचा समावेश.
- सोबतच औरंगाबाद शहर पोलीस दलातील 3 हजार 200 पोलीस सलग तीन दिवस बंदोबस्तात असणार आहे.
रस्त्यांवर 'पोलिस आणि पोलिसचं...'
आज पासून पुढील चार दिवस औरंगाबाद शहरातील वेगवेगळ्या भागात पोलिसांचा बंदोबस्त असणार आहे. कारण या चार दिवसात शहरात वेगवेगळ्या कार्यक्रमानिमित्त व्हीआयपी शहरात असणार आहे. सोबतच मंत्रिमंडळात बैठक असल्याने अनेक आंदोलन होण्याची देखील शक्यता आहे. त्यामुळे पोलिसांचा फौजफाटा वाढवण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर पुढील चार दिवस शहरात रस्त्या रस्त्यावर 'पोलीस आणि फक्त पोलीसच' पाहायला मिळणारा आहे.
इतर महत्वाच्या बातम्या: