Chandrapur Accident : चंद्रपुरात ट्रक-दुचाकीचा भीषण अपघात, आजी-आजोबासह नातीने जीव गमावला
Chandrapur Accident : चंद्रपुरात ट्रक-दुचाकीचा भीषण अपघात झालाय, यामध्ये आजी-आजोबासह नातीने जीव गमावलाय.
Chandrapur Accident : चंद्रपुरात ट्रक आणि दुचाकीचा भीषण अपघात झालाय. या अपघातात आजी-आजोबासह नातीने म्हणजेच एकाच कुटुंबातील तिघांनी जीव गमावल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे. भद्रावती शहराजवळील डाली पेट्रोल पंप येथील यु-टर्न जवळ हा अपघात झालाय. यामध्ये मंजुषा नागपुरे (47) वर्षे, सतीश नागपुरे (51) आणि माहिरा नागपुरे (2) या तिघांचा मृत्यू झालाय.
एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू
अधिकची माहिती अशी की, जिल्ह्यातील वणी तालुक्यात असलेल्या रासाघोणसा येथील हे सर्व भद्रावती येथे आपल्या नातेवाईकाकडे आले होते. नातेवाईकाच्या मालकीच्या हॉटेलमध्ये जेवण केल्यानंतर हे कुटुंब दुचाकीने घराकडे परत जात असताना हायवेवर यू टर्न घेताना समोरून येणाऱ्या ट्रकने दुचाकीला जोरदार धडक दिली. अपघातात मंजुषा नागपुरे यांचा जागीच तर सतीश नागपुरे आणि माहिरा नागपुरे यांचा उपचारासाठी नेताना मृत्यू झाला. ट्रक चालक नंदू चव्हाण याला पोलिसांनी ताब्यात घेतले असून घटनेचा पुढील तपास भद्रावती पोलीस करीत आहे.
सोलापूर- धुळे मार्गावर ट्रक दुचाकीचा भीषण अपघात चौघांचा मृत्यू
जालन्यातील सोलापूर धुळे महामार्गावर महाकाळा येथे उभ्या ट्रकला कार धडकून भीषण अपघात झालाय .आज दुपारी साडेबारा वाजेच्या दरम्यान हा अपघात झालाय.या अपघातामध्ये एकाच कुटुंबातील चौघेजण जागीच ठार झाले असून दोघेजण गंभीर जखमी झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. सोलापूर धुळे महामार्गावर महाकाळा येथे उभा असलेल्या ट्रकला बीडकडून संभाजीनगर कडे जाणाऱ्या कार वाहनाने पाठीमागून धडक दिल्याने हा भीषण अपघात झाला आहे.दरम्यान घटनास्थळी जालन्यातील गोंदी पोलीस दाखल झाले असून या अपघातात जखमी झालेल्यांना छत्रपती संभाजीनगर येथे पुढील उपचारासाठी हलवण्यात आल्याची देखील माहिती मिळत आहे...
इतर महत्त्वाच्या बातम्या