(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Capricorn Weekly Horoscope 21 To 27 October 2024 : 21 ते 27 पर्यंतचा काळ मकर राशीसाठी कसा असणार? वाचा साप्ताहिक राशीभविष्य
Capricorn Weekly Horoscope 21 To 27 October 2024 : मकर राशीच्या लोकांसाठी ऑक्टोबर महिन्याचा चौथा आठवडा चांगला असणार आहे. या काळात तुम्ही उच्च ध्येय गाठू शकता.
Capricorn Weekly Horoscope 21 To 27 October 2024 : हिंदू कॅलेंडरनुसार, ऑक्टोबर महिन्यातला चौथा आठवडा आता सुरु होत आहे. हा नवीन आठवडा मकर राशीसाठी नेमका कसा असणार आहे? मकर राशीचं करिअर, शिक्षण, लव्ह लाईफ आणि आरोग्याच्या दृष्टीने नवीन आठवडा मकर राशीसाठी लाभदायी असणार आहे की नाही? हे जाणून घेण्यासाठी मकर राशीचे साप्ताहिक राशीभविष्य (Weekly Horoscope) जाणून घ्या.
मकर राशीची लव्ह लाईफ (Capricorn Love Horoscope)
तुमच्या जोडीदाराच्या भावना दुखवू नका. जेव्हा जेव्हा तुम्हाला असं वाटतं की, नात्यात दुरावा निर्माण होत आहे तेव्हा तुमच्या जोडीदाराशी मोकळेपणाने बोला. परिस्थिती नियंत्रणाबाहेर जाण्यापूर्वी त्यावर नियंत्रण ठेवा. लव्ह लाईफमध्ये आई-वडिलांचे सहकार्य मिळू शकते. नुकतेच ब्रेकअप झालेले लोक पुन्हा नात्यात येऊ शकतात, विशेषतः आठवड्याच्या शेवटच्या दिवसांत. विवाहित महिलांना कौटुंबिक जीवनात किरकोळ चढउतार दिसू शकतात, ते संवादाने सोडवणे शहाणपणाचे ठरेल.
मकर राशीचे करिअर (Capricorn Career Horoscope)
ऑफिसच्या महत्त्वाच्या मीटिंगला जाताना प्लॅन बी तयार ठेवा. याचा सहकारी आणि वरिष्ठांबर चांगला परिणाम होईल. परदेशी विद्यापीठांमध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी त्यांचे तपशील अपडेट करावेत आणि विद्यापीठाच्या कॉलची प्रतीक्षा करावी. कार्यालयीन राजकारणापासून सावध राहावं. नेमून दिलेली सर्व कामं तत्परतेने पूर्ण करा. काही लोकांना व्यवसायात फायदा होईल. नोकरी शोधणाऱ्यांना आठवडा संपण्यापूर्वी चांगली बातमी मिळेल.
मकर राशीची आर्थिक स्थिती (Capricorn Wealth Horoscope)
तुमची संपत्ती वाढवण्यासाठी आणखी पर्याय एक्सप्लोर करा. पैसा मिळवण्याच्या संधी मिळतील. तुम्हाला फक्त योग्य योजना बनवायची आहे. तज्ञांचे मार्गदर्शन खूप मदत करू शकते. काही मकर राशीच्या लोकांना पूर्वी केलेल्या गुंतवणुकीतून चांगला परतावा मिळेल. काही मकर राशीचे लोक देखील बँकेचे कर्ज फेडण्यास सक्षम असतील. या आठवड्यात अनोळखी व्यक्तींना ऑनलाईन पेमेंट करताना काळजी घ्यावी.
मकर राशीचे आरोग्य (Capricorn Health Horoscope)
तुमचं आरोग्य चांगलं राहील याची काळजी घ्या. तुमच्या भावनांवर नियंत्रण ठेवा, कारण यामुळे मानसिक ताण कमी होईल. काही मकर राशीचे लोक दातांच्या दुखण्याची तक्रार करतील, ज्यासाठी त्यांना डॉक्टरांशी बोलावं लागेल. ज्या लोकांना झोप येत नसल्याची समस्या आहे, त्यांनी योगा आणि ध्यानाची मदत घ्यावी.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा: