एक्स्प्लोर

Ravikant tupkar : शेतकऱ्यांची पोरं मंत्र्यांच्या गाड्या अडवणार, सोयाबीनसह कापासाच्या दरावरुन स्वाभिमानी आक्रमक

सोयाबीन आणि कापसाच्या दरात घसरण झाली आहे. याचा मोठा आर्थिक फटका शेतकऱ्यांना बसत आहे. दरम्यान, याच मुद्यावरुन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर आक्रमक झालेत.

Ravikant tupkar : सध्या राज्यातील सोयाबीन आणि कापूस (soybean and Cotton) उत्पादक शेतकरी अडचणीत  आहेत. कारण, सोयाबीन आणि कापसाच्या दरात घसरण झाली आहे. याचा मोठा आर्थिक फटका शेतकऱ्यांना बसत आहे. दरम्यान, याच मुद्यावरुन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर आक्रमक झाले आहेत. आगामी काळात मंत्र्यांना आणि सरकारला कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रचंड रोषाला सामोरं जावं लागेल असा इशारा तुपकरांनी दिलाय. शेतकऱ्यांची पोरं मंत्र्यांच्या गाड्या अडवल्याशिवाय राहणार नाहीत असेही तुपकर म्हणाले. 

राज्यात सर्वात जास्त कापूस आणि सोयाबीन उत्पादन करणारे शेतकरी आहेत. यावर्षी सोयाबीन पिकाचा उत्पादन खर्च सहा हजार रुपयांच्या वर गेलेला आहे. मात्र, सोयाबीनला भाव मिळत नाही. सोयाबीनचे भाव पडलेले आहेत. ज्याप्रमाणं पश्चिम महाराष्ट्रात कांदा उत्पादक शेतकरी मंत्र्यांच्या गाड्या अडवत आहेत. त्याचप्रमाणं संपूर्ण महाराष्ट्रात आगामी काळात कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांची पोरं मंत्र्यांच्या गाड्या अडवल्याशिवाय राहणार नसल्याचा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी दिलाय. त्यामुळं केंद्र सरकार असू देत किंवा राज्य सरकार यांना कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रचंड रोषाला सामोर जाव लागणार असल्याचे रविकांत तुपकर म्हणाले.

शेतकऱ्यांच्या प्रश्नावरुन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर हे वेळोवेळी आवाज उठवत असतात. त्यंनी सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नासंदर्भात अनेकवेळा आंदोलने, मोर्चे काढले आहेत. तसेच पीक विम्याचा मुद्दा देखील त्यांनी चांगलाच लावून धरला होता. याचा शेतकऱ्यांना मोठा फायदा झाला होता.

अनेक ठिकाणी सोयाबीनवर यलो मोझॅकचा प्रादुर्भाव

सध्या सोयाबीन उत्पादक शेतकरी संकटात सापडले आहेत. कारण, सोयाबीनवर यलो मोझॅक रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे.विदर्भात सुमारे 60 ते 70 टक्के पीक वाया जाण्याची स्थिती निर्माण झाली आहे. येलो मोझॅक रोगाचा प्रादुर्भाव दरवर्षी वाढत चालला असून त्यासंदर्भात कृषी शास्त्रज्ञ, विद्यापीठ आणि शासन मिळून ठोस उपाययोजना आवश्यक असल्याचे मत शेतकरी व्यक्त करत आहेत. याबाबत पंचनामे करण्याचे आदेश दिलेले आहेत. संपूर्ण अहवाल हाती आल्यानंतर सरकारकडून काय नुकसान भरपाई देता येईल असे सांगण्यात आले आहे. दरम्यान, नुकसानग्रस्त शेतकरी सरकारकडे मदतीची मागणी करत आहेत. त्यामुळं आता यासंदर्भात सरकार काय निर्णाय घेणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. 

महत्त्वाच्या बातम्या:

Latur : लातुरातील सोयाबीन खरेदी केंद्रावरील काट्यातच घोळ, क्विंटल मागे 12 ते 14 किलोचा फरक आल्याने शेतकरी संतप्त

 बालरोग तज्ञ म्हणून कार्यरत , M.J. ( mass com ) नंतर गेल्या तीन वर्षापासून एबीपी माझा साठी कार्यरत.
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Buldhana Crime : सलग तीन वर्ष अवैधरित्या उत्खनन, महसूल विभागाकडून 30 कोटींचा दंड; भाजप आमदाराच्या आक्रमक पावित्र्यानंतर पुण्याच्या नामांकित कंपनीवर गुन्हा दाखल
बुलढाण्यात सलग तीन वर्ष अवैधरित्या उत्खनन, महसूल विभागाकडून 30 कोटींचा दंड; भाजप आमदाराच्या आक्रमक पावित्र्यानंतर पुण्याच्या कंपनीवर गुन्हा दाखल
Buldhana Crime News: बुलढाणा हादरलं! शिक्षिकेचा मोबाईल हॅक करून अश्लील फोटोद्वारे ब्लॅकमेल; व्हिडिओ कॉल करून विवस्त्र होण्याची अन् शरीर संबंधांसाठी धमकी
बुलढाणा हादरलं! शिक्षिकेचा मोबाईल हॅक करून अश्लील फोटोद्वारे ब्लॅकमेल; व्हिडिओ कॉल करून विवस्त्र होण्याची अन् शरीर संबंधांसाठी धमकी
सूर्य कोपला! विदर्भात उष्णतेची लाट, कोणत्या जिल्ह्यात किती तापमानाची नोंद, जाणून घ्या सविस्तर माहिती 
सूर्य कोपला! विदर्भात उष्णतेची लाट, कोणत्या जिल्ह्यात किती तापमानाची नोंद, जाणून घ्या सविस्तर माहिती 
उन्हाचा कडाका वाढला, शाळेची वेळ बदलली; ZP सीईओंनी काढला आदेश, सकाळच्या सत्रात वाजणार घंटा
उन्हाचा कडाका वाढला, शाळेची वेळ बदलली; ZP सीईओंनी काढला आदेश, सकाळच्या सत्रात वाजणार घंटा

व्हिडीओ

Religion Convergence : बेकायदा धर्मांतराला चाप, विधानसभेत धर्मस्वातंत्र्य सादर Special Report
Akola School : अकोल्यातल्या शाळेत थर्मिक फ्लुईड हिटर सिस्टीम Special Report
Tree Cutting For Car Race : रेसचं फॅड, झाडांवर कुऱ्हाड, स्थानिकांचा विरोध Special Report
Pune Drugs : पुण्यात ड्रग्जची टपरी, कासेवाडी परिसरात अवैध धंदे Special Report
Russia Oil : इराणवर हल्ले, रशियाचं बल्ले बल्ले, चढ्या दरानं तेल घ्यावं लागणार? Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Shirdi Sai Baba Temple : शिर्डीच्या साईबाबा संस्थानलाही गॅस टंचाईचा फटका, आजपासून भाविकांना एकच लाडू प्रसादाचे पाकीट मिळणार
शिर्डीच्या साईबाबा संस्थानलाही गॅस टंचाईचा फटका, आजपासून भाविकांना एकच लाडू प्रसादाचे पाकीट मिळणार
Iran War Live Update: तर 'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मधून मर्यादित तेलवाहू जहाजांना परवानगी! अवघं जग 'गॅस'वर आणून सोडताच इराणची ट्रम्पना ट्रॅप करण्यासाठी नवी चाल
तर 'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मधून मर्यादित तेलवाहू जहाजांना परवानगी! अवघं जग 'गॅस'वर आणून सोडताच इराणची ट्रम्पना ट्रॅप करण्यासाठी नवी चाल
Pune Crime News: पुण्यातील कुख्यात टिपू पठाण टोळीवर मोक्का कारवाई; टिप्याच्या साथीदाराला पोलिसांनी ठोकल्या बेड्या
पुण्यातील कुख्यात टिपू पठाण टोळीवर मोक्का कारवाई; टिप्याच्या साथीदाराला पोलिसांनी ठोकल्या बेड्या
अमेरिकेचा H-1B व्हिसा प्रक्रियेत बदल; भारतीयांची अडचण वाढणार? निवड कशी होणार ते सुद्धा ठरलं!
अमेरिकेचा H-1B व्हिसा प्रक्रियेत बदल; भारतीयांची अडचण वाढणार? निवड कशी होणार ते सुद्धा ठरलं!
Satara News: चीन सीमेवर कर्तव्य बजावताना पाटणचा सुपुत्र शहीद; 'ऑपरेशन स्नो लेपर्ड' दरम्यान वीरमरण
चीन सीमेवर कर्तव्य बजावताना पाटणचा सुपुत्र शहीद; 'ऑपरेशन स्नो लेपर्ड' दरम्यान वीरमरण
North Korea Ballistic missile: एकीकडे इराण Vs अमेरिका युद्ध शिगेला, दुसरीकडे किम जोंग उन मैदानात, उत्तर कोरियाने 10 बॅलेस्टिक मिसाईल सोडल्या
एकीकडे इराण Vs अमेरिका युद्ध शिगेला, दुसरीकडे किम जोंग उन मैदानात, उत्तर कोरियाने 10 बॅलेस्टिक मिसाईल सोडल्या
Iran War Live Update: इराणनं भारतासकट जगाला गॅसवर आणलेल्या होर्मुझच्या सामुद्रधुनीत काय घडणार? अमेरिकेतून 2200 मरीन सैनिक, 3 युद्धनौका फायटर जेटच्या साथीनं आखाती देशाकडे रवाना!
इराणनं भारतासकट जगाला गॅसवर आणलेल्या होर्मुझच्या सामुद्रधुनीत काय घडणार? अमेरिकेतून 2200 मरीन सैनिक, 3 युद्धनौका फायटर जेटच्या साथीनं आखाती देशाकडे रवाना!
इराणी क्षेपणास्त्रांचा सौदीतील अमेरिकन तळावर मोठा हल्ला; हवेत इंधन भरणाऱ्या पाच टँकर विमानांची दाणादाण! हजारो कोटींच्या मालमत्तेची राखरांगोळी; काल इराकमध्येही तेच विमान जमीनदोस्त
इराणी क्षेपणास्त्रांचा सौदीतील अमेरिकन तळावर मोठा हल्ला; हवेत इंधन भरणाऱ्या पाच टँकर विमानांची दाणादाण! हजारो कोटींच्या मालमत्तेची राखरांगोळी; काल इराकमध्येही तेच विमान जमीनदोस्त
Embed widget