Samruddhi Expressway Damage : समृद्धी महामार्गावर पुलाचा लोखंडी रॉड अचानक आला वर; वाहनचालकाच्या समयसूचकतेमुळे टळला मोठा अपघात
Samruddhi Mahamarg: समृद्धी महामार्गावरील सिंदखेडराजा येथे एका पुलावरचा लोखंडी भाग अचानक तुटून वर आला. मात्र एका वाहन चालकाने प्रसंगावधान राखत या बाबत संबंधितांना माहिती दिल्याने मोठा अपघात टळला आहे.
बुलढाणा : समृद्धी महामार्ग (Balasaheb Thackeray Samruddhi Mahamarg) नेहमी चर्चेत असतो तो यावर होणाऱ्या अपघातांमुळे. (Accident) महाराष्ट्राच्या विकासाची भाग्यरेषा ठरणाऱ्या या महामार्गाला आता जेमतेम एक वर्ष बांधून पूर्ण झाल आहे. अशातच या समृद्धी महामार्गावर (Samriddhi Highway) कुठे खड्डे पडले आहेत तर कुठे पुलावरून लोखंडी भाग तुटून वर आल्याचे दिसत आहे. असाच एक प्रकार काल, 28 डिसेंबरच्या रात्री समृद्धी महामार्गावर असलेल्या सिंदखेडराजा येथील चॅलेंज 319 मुंबई कॉरिडॉर जवळ उघडकीस आला. या महामार्गावरच्या एका मोठ्या पुलावरचा लोखंडी भाग तुटून महामार्गावर आला. अचानक तुटून वर आलेल्या या लोखंडी भागामुळे मोठा अपघात होण्याची शक्यता बळावली होती . मात्र एका वाहन चालकाने प्रसंगावधान राखात या बाबत जवळच्या टोल नाक्यावर याची माहिती दिली. वेळीच ही गोष्ट लक्षात आल्याने मोठा अनर्थ टळला आहे.
वाहन चालकाच्या समयसूचकतेमुळे टळला मोठा अपघात
महाराष्ट्राच्या समृद्धीची भाग्यरेषा असलेल्या हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग प्रवाशांसाठी खुला झाला त्या दिवसापासून हा महामार्ग कायम चर्चेत राहिला आहे तो यावर होणाऱ्या अपघातांमुळे. या महामार्गावर सतत होणाऱ्या आपघत रोखण्याच्या अनुषंगाने विविध उपाययोजना राबविण्यात येत आहे. मात्र काही केल्या या महामार्गावरील अपघाताची मालिका काही थांबता थांबत नसल्याचे चित्र आहे. महामार्ग सुरू झाल्यापसून अनेक छोटे मोठे अपघात झाले. त्यात सर्वाधिक अपघात हे मध्यरात्री झाले आहे. अशीच एक घटना 28 डिसेंबरच्या रात्री उघडकीस आली. या महामार्गावरून प्रवास करणाऱ्या एक वाहनचालक सिंदखेडराजा येथील चॅलेंज 319 मुंबई कॉरिडॉर जवळ आला असता त्याला या पुलाचा एक लोखंडी भाग वर आल्याचे दिसले. या वाहन चालकाने तत्काळ समयसूचकता दाखवत गाडीचा वेग आवरला आणि मागील गाड्यांना देखील सावध केले. त्यानंतर या तुटलेल्या रॉडचा एक व्हिडिओ बनवून तात्काळ जवळच्या टोल नाक्यावर याची माहिती दिली. त्यामुळे अनेक वाहनांचे होणारे मोठे अपघात टळले आहे.
वाहतूक सुरळीत सुरू
घडलेल्या प्रकारची माहिती मिळताच या पूलावारील लोखंडी रॉडच्या दुरुस्तीची काम करण्यात आले असून त्यानंतर प्रवास सुरळीत सुरू आहे. मात्र आज एका वाहन चालकाच्या समय सुचकतेने हा प्रकार टळला आहे. समृद्धी महामार्गावर वेग मर्यादा ही 120 किलोमीटर प्रति तास असल्याने या महामार्गावरून धावणाऱ्या गाड्यांचा वेग अतिशय जास्त असतो. अशातच अशा लोखंडी भागाला जर वाहन धडकले तर मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. मात्र आज एका वाहन चालकाच्या समय सुचकतेने हा प्रकार टळला आहे.