Ravikant Tupkar : मोठी बातमी : शेतकरी नेते रविकांत तुपकरांना बुलढाणा पोलिसांकडून अटक
Ravikant Tupkar : पीकविम्याच्या प्रश्नावर कृषी अधीक्षकांच्या कक्षात मुक्काम आंदोलनाला बसलेल्या रविकांत तुपकरांना पोलिसांना अटक करण्यात आलीये.
Ravikant Tupkar, बुलढाणा : शेतकरी नेते रविकांत तुपकर यांना पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. त्यांच्यावर कलम 353 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर रविकांत तुपकर पुन्हा आक्रमक झाले होते. पिक विम्याचे पैसे न मिळाल्याने रविकांत तुपकर यांचे कृषी कार्यालयात मुक्काम आंदोलन सुरु होते. याचवेळी त्यांना अटक करण्यात आली आहे.
बुलढाणा जिल्हा कृषी अधीक्षकांच्या कक्षात मुक्काम आंदोलन सुरु होते
शेतकरी नेते रविकांत तुपकर यांच्या नेतृत्वाखाली बुलढाणा जिल्हा कृषी अधीक्षकांच्या कक्षात मुक्काम आंदोलन सुरु होते. जोपर्यंत पीकविम्याचे शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होत नाही,तोपर्यंत जिल्हा कृषी अधीक्षक कक्षात तुपकर मुक्काम ठोकणार असल्याचा इशारा रविकांत तुपकर यांनी दिला होता.
मला गोळ्या घातल्या तरी शेतकऱ्यांसाठी लढत राहणार
रविकांत तुपकर बिस्तरा घेऊन कृषी अधीक्षक कार्यालयात पोहोचले होते. पिकविम्यासाठी रविकांत तुपकरांचे बुलढाणा जिल्हा कृषी अधीक्षकांच्या दालनात मुक्काम आंदोलन सुरु होतं. मला गोळ्या घातल्या तरी शेतकऱ्यांसाठी लढत राहणार आहे. सरकारच्या हुकूमशाहीचा आम्ही निषेध करतो, असं रविकांत तुपकर म्हणाले आहेत.
शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या कंपनीवर गुन्हा दाखल का करत नाहीत?
शेतकऱ्यांच्या हक्काचा पिकविमा मागणाऱ्या रविकांत तुपकरांवर गुन्हा दाखल करता मग शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या कंपनीवर गुन्हा दाखल का करत नाहीत? असा सवाल अॅड शर्वरी तुपकर यांनी केला आहे. त्यानंतर शेतकऱ्यांनी गावागावात आंदोलन सुरू करा, असं आवाहन शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी केलं आहे.
बुलढाणा अपडेट
रविकांत तुपकरांना बुलढाणा पोलिसांकडून अटक
353 अंतर्गत तुपकरांवर गुन्हा दाखल
पिकविम्यासाठी रविकांत तुपकरांचे बुलढाणा जिल्हा कृषी अधीक्षकांच्या दालनात सुरू होत मुक्काम आंदोलन
मला गोळ्या घातल्या तरी शेतकऱ्यांसाठी लढत राहणार...सरकारच्या हुकूमशाहीचा निषेध - रविकांत तुपकर
शेतकऱ्यांच्या हक्काचा पिकविमा मागणाऱ्या रविकांत तुपकरांवर गुन्हा दाखल करता...मग शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या कंपनीवर गुन्हा दाखल का करत नाही - शर्वरी तुपकरांचा सवाल.
शेतकऱ्यांनी गावागावात आंदोलन सुरू करा - रविकांत तुपकर यांचं आवाहन
शेतकऱ्यांच्या प्रश्नावर रविकांत तुपकर झाले होते आक्रमक.
पिक विम्याचे पैसे न मिळाल्याने रविकांत तुपकर यांचे कृषी कार्यालयात मुक्काम आंदोलन सुरु होते
बुलढाणा जिल्हा कृषी अधीक्षकांच्या कक्षात मुक्काम आंदोलन सुरु होते
जोपर्यंत पीकविम्याचे शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होत नाही तोपर्यंत जिल्हा कृषी अधीक्षक कक्षात तुपकर ठोकणार मुक्काम
रविकांत तुपकर बिस्तरा घेऊन कृषी अधीक्षक कार्यालयात पोहोचले.
इतर महत्वाच्या बातम्या