Exclusive: नागपूर-मुंबई प्रवास सुसाट! बुलेट ट्रेन प्रकल्पाची DPR मधील काही वैशिष्ट्ये 'एबीपी माझा'च्या हाती
Nagpur-Mumbai High Speed Bullet Train: नागपूर-मुंबई बुलेट ट्रेन प्रकल्पाची DPR मधील काही वैशिष्ट्ये एबीपी माझाच्या हाती... पाहुयात सविस्तर...
Buldhana News Updates: समृद्धी महामार्गाचा (Maharashtra Samruddhi Mahamarg) समांतर असा नागपूर-मुंबई हायस्पीड बुलेट ट्रेन (Nagpur-Mumbai High Speed Bullet Train) मार्ग प्रस्तावित आहे. हा 741 किलोमीटरचा उन्नत हाय स्पीड रेल्वे मार्ग असणार आहे. सध्या या महामार्गाचा डीपीआर तयार झाला आहे. हा डीपीआर रेल्वे बोर्डाकडे नुकताच सादर करण्यात आलेला आहे. रेल्वे बोर्ड या डीपीआरचा सविस्तर अभ्यास करून हा प्रस्ताव केंद्राकडे पाठवणार आहे. केंद्र सरकार या प्रस्तावाला कधी मान्यता देणार? यावर या प्रस्तावित बुलेट ट्रेन मार्गाच्या कामाची सुरुवात अपेक्षित आहे. मात्र नागपूर-मुंबई बुलेट ट्रेन मार्गाचा डीपीआर तयार झालेला असून या डीपीआरवर आता रेल्वे बोर्ड अभ्यास करत आहे. अशी माहिती नॅशनल हाय स्पीड रेल्वे कार्पोरेशनच्या मुख्य जनसंपर्क अधिकारी सुषमा गौर यांनी एबीपी माझाला दिली आहे. त्यामुळे नागपूर-मुंबई हायस्पीड बुलेट ट्रेनच्या प्रस्तावित कामाला गती मिळाल्याचंही त्यांनी सांगितलं आहे.
नागपूर-मुंबई बुलेट ट्रेन प्रकल्पाची DPR मधील काही वैशिष्ट्ये एबीपी माझाच्या हाती...
एकूण लांबी : 742 किमी.
समृद्धी महामार्गाच्या समांतर असल्यानं कमी जमीन अधिग्रहण
जमीन अधिग्रहण आवश्यकता फक्त 1250 हेक्टर
हा प्रकल्प 10 जिल्ह्यातून जाणार तर इतर 13 जिल्ह्यांना अप्रत्यक्ष फायदा होणार
या मार्गावर 15 स्थानकं प्रस्तावित आहेत.
मुंबई, ठाणे, शहपूर, घोटी, नाशिक, शिर्डी, औरंगाबाद, जालना, मेहकर, मालेगाव, कारंजा लाड, पुलगाव, वर्धा, खापरी, अजनी
सध्या प्रवासाला 12 ते 15 तास लागतात, प्रकल्प पूर्ण झाल्यावर हा प्रवास साडे तीन तासात होईल
या मार्गावर बुलेट ट्रेनचा वेग ताशी 320 किमी असेल प्रत्यक्षात 250 किमी प्रति तास मिळेल
या प्रकल्पाचा खर्च प्रतिकिमी 200 कोटी रुपये इतका येणार आहे.
एकूण खर्च एक ते दीड लाख कोटी रुपये
या प्रकल्पाचा प्रस्ताव 2019 ला तयार झाला होता.
मार्च 2021 ला या प्रकल्पाचा हवाई लीडर सर्व्हे देखील झाला.
नोहेंबर 2021 ला या प्रकल्पाचा सविस्तर प्रकल्प अहवाल अर्थात DPR बनविण्याची सुरुवात झाली होती.
मार्च 2022 ला DPR तयार करून रेल्वे बोर्डाकडून सादर करण्यात आला असून यावर लवकरच रेल्वे बोर्ड सविस्तर अभ्यास करून हा अहवाल केंद्र सरकार कडे सादर करणार आहे.
या प्रकल्पामुळे राज्यातील 11 जिल्ह्याच्या विकासाला चालना मिळणार आहे.
त्यामुळे राज्यातील अनेक खासदारांनी या रेल्वे मार्गाला लवकरात लवकर मंजुरी देण्याची मागणी केंद्र सरकार आणि रेल्वे मंत्र्यांकडे केली आहे.
नागपूर-मुंबई हायस्पीड बुलेट ट्रेन मार्ग 'या' शहरांमधून जाणार
नागपूर-मुंबई हायस्पीड बुलेट ट्रेन मार्ग सुमारे 766 किलोमीटर लांबीचा असेल. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ बांधत असलेल्या मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गाच्या बरोबरीनं तो बांधण्यात येणार आहे. प्रस्तावित हायस्पीड बुलेट ट्रेन दहा जिल्ह्यांतून जाणार आहे. 250 किमी वेगानं धावणारी ही ट्रेन चौदा स्थानकांवर केवळ एक मिनिटासाठी थांबेल. बुलेट ट्रेनचा हा मार्ग वर्धा, खापरी डेपो, पुलगाव, मालेगाव जहांगीर, जालना, कारंजा लाड, मेहकर, शिर्डी, नाशिक, औरंगाबाद, इगतपुरी आणि शहापूरमधून जाणार आहे.