चांद्रयान 3 मोहिमेत बुलढाण्याचाही खारीचा वाटा; खामगावच्या चांदी आणि थर्मल फॅब्रिक्सचा वापर
खामगाव येथील चांदी ही संपूर्ण देशात प्रसिद्ध आहे. म्हणून खामगावला रजत नगरी म्हणून सुद्धा ओळखलं जातं. या ठिकाणची चांदी ही शुद्ध असल्यानं चांद्रयान 3 मध्ये स्टर्लिंग ट्युबमध्ये ही चांदी वापरण्यात आल्याची माहिती मिळत आहे.
Maharashtra Buldhana News: भारतीयांसाठी कालचा दिवस परमोच्च आनंदाचा होता. चांद्रयान-3 (Chandrayaan-3) यशस्वीरित्या अवकाशात झेपावलं. देशासाठी महत्त्वकांक्षी आणि अभिमानास्पद असलेलं चांद्रयान - 3 या मोहिमेत राज्यातील बुलढाणा जिल्ह्यातील (Buldhana District) खामगाव (Khamgaon) येथील दोन वस्तूंचा खारीचा वाटा आहे. खामगाव येथील प्रसिद्ध असलेली चांदी आणि खामगाव येथीलच प्रसिद्ध असलेलं फॅब्रिक्स या चांद्रयान 3 मोहिमेत वापरण्यात आलं असल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे आता खामगावसह राज्यासाठी ही अभिमानास्पद गोष्ट समोर आली आहे.
खामगाव येथील चांदी ही संपूर्ण देशात प्रसिद्ध आहे. म्हणून खामगावला रजत नगरी म्हणून सुद्धा ओळखलं जातं. या ठिकाणची चांदी ही शुद्ध असल्यानं चांद्रयान 3 मध्ये स्टर्लिंग ट्युबमध्ये ही चांदी वापरण्यात आल्याची माहिती मिळत आहे. चांदी ही वजनानं हलकी असल्यानं चांदीचा वापर करण्यात आल्याची माहिती खामगाव येथील प्रसिद्ध चांदीचे व्यावसायिक श्रद्धा रिफायनरी यांनी दिली आहे. चांदीचे 'स्टर्लिंग ट्यूब' चांद्रयान 3 मध्ये वापरण्यात आल्याची माहिती दिली आहे आणि त्यामुळे खामगावसह राज्यासाठी ही अभिमानाची बाब आहे.
खामगाव येथील विक्रमशी फॅब्रिक्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीनं चांद्रयान तीनसाठी लागणाऱ्या थर्मल शील्डचा पुरवठा केला आहे. चांद्रयानाला उष्णतेपासून वाचवण्यासाठी आवश्यक असणारा रबराईज्ड फॅब्रिक खामगाव येथील भिकमची फॅब्रिक्सनं तयार करून त्याचा पुरवठा इस्रोला केला आहे. त्यामुळे चांद्रयान-3 या मोहिमेत खामगाव शहरातील दोन वस्तूंचा पुरवठा करण्यात आला आहे. ही बाब राज्यासह सर्वांसाठीच अभिमानाची आहे.
गोदरेज समुहानं इंजिनासह, काही पार्ट्स पुरवले
गोदरेज समूहाच्या गोदरेज एरोस्पेस कंपनीने इंजिन सह महत्त्वपूर्ण भाग पुरविले आहेत. कंपनीने अंतराळ प्रकल्पांसाठी लिक्विड प्रोपल्शन इंजिन, सॅटेलाइट थ्रस्टर्स आणि कंट्रोल मॉड्यूल या भागांसह इंजिनचे काही भाग पुरविले.गोदरेज एरोस्पेस च्या या योगदानांनी चांद्रयान आणि मंगळयान यांसारख्या प्रतिष्ठित मोहिमांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावली आहे.या चांद्रयानमध्ये बसविण्यात आलेल्या भागाची माहिती आज गोदरेज मार्फत विक्रोळी च्या प्लांट मध्ये देण्यात आली.या वेळी गोदरेज एरोस्पेसचे बिझनेस हेड मानेक बेहरामकामदीन यांनी इस्रोच्या चांद्रयान-3 मोहिमेतील आमच्या योगदानाचा आम्हाला प्रचंड अभिमान वाटत असल्याचे सांगितले.तसेच ही मोहीम आता यशस्वी होईल आणि देशाचे नाव उंचावले जाईल अशी आशा व्यक्त केली.
महत्त्वाच्या इतर बातम्या :